12 September Dinvishes
मित्रांनो, आज १२ सप्टेंबर आजच्या इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी देश विदेशात अनेक घटना घडल्या त्या घटनांची संपूर्ण माहिती तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन व निधन पावणाऱ्या व्यक्तींबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १२ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 12 September Today Historical Events in Marathi
१२ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 September Historical Event
- इ.स. १७८६ साली ब्रिटीश इस्ट इंडियाचे अधिकारी लॉर्ड कॉर्नवॉलिस(Charles Cornwallis) हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले.
- इ.स. १८७३ साली टाइपराइटर पहिल्यांदा ग्राहकांना विकण्यात आले.
- सन १९५९ साली रशियन मानवरहित चांद्रयान ल्युना २ हे लूना 8 के 72 एस / एन आय 1-7 बी रॉकेटच्या साह्याने प्रक्षेपित करण्यात आले.
- सन १९६६ साली भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी डार्डानेल्स खाडी पार केली.
- सन २००५ साली हाँगकाँग मध्ये डिस्नेलँड पार्क सुरु करण्यात आला.
- सन २०११ साली हल्ल्यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एक समर्पण समारंभ पार पडल्यानंतर न्यूयॉर्क शहरातील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु करण्यात आलं.
१२ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८९४ साली भारतीय आधुनिक बंगाली साहित्यातील प्रतिष्ठित लेखक व कादंबरीकार बिभूतिभूषण बंधोपाध्याय यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९७ साली रेडियम धातूचा शोध लावणाऱ्या प्रख्यात अमेरिकन नोबल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ इरीन ज्योलियो-क्युरी(Irène Joliot-Curie) यांचा जन्मदिन.
- सन १९१२ साली देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे पती व भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार तसचं, नॅशनल हेराल्ड आणि नवजीवन या वृत्तपत्राचे प्रकाशक फिरोज गांधी यांचा जन्मदिन.
- सन १९३० साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय मल्ल्याळ भाषिक कवी, साहित्यिक समिक्षक तसचं, प्राचीन भारतीय सौंदर्यशास्त्र आणि साहित्य परंपरा क्षेत्रांचे अभ्यासक डॉ. के. अयप्पा पाणिकर यांचा जन्मदिन.
- सन १९६६ साली भारतीय-अमेरिकन संगणक वैज्ञानिक व हार्वर्ड जॉन ए. पॉलसन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड एप्लाइड सायन्सेसमध्ये गॉर्डन मॅकके कॉम्प्यूटर सायन्सचे प्राध्यापक मधु सूदन यांचा जन्मदिन.
१२ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 September Death / Punyatithi /Smrutidin
- सन १९२६ साली महाराष्ट्रीयन मराठी साहित्यसंशोधन आणि ग्रंथाकार. महाराष्ट्र सारस्वत ह्या प्राचीन मराठी साहित्येतिहासग्रंथाचे कर्ते तसचं, ठाणे येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संस्थापक विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.
- सन १९५२ साली लोकप्रिय भारतीय कर्नाटकी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्यातील गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांचे निधन.
- सन १९७१ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध शंकर-जयकिशन जोडीतील एक लोकप्रिय संगीत दिग्दर्शक जयकिशन द्याभाई पंचाल यांचे निधन.
- सन १९८० साली महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट सृष्टीतील व रंगमंच अभिनेते सतीश दुभाषी यांचे अपघाती निधन झाले.
- सन १९९२ साली पद्मविभूषण पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय जयपूर येथील अत्रोली घराण्यातील शास्त्रीय गायक मल्लिकार्जुन बी मंसूर यांचे निधन.
- सन १९९६ साली भारतीय चित्रपट, दूरदर्शन व रंगमंच अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन.