जाणून घ्या १३ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

 13 September Dinvishes 

मित्रांनो, आजचा दिवस इतिहासात घडलेल्या अनेक कारणांसाठी ओळखला जातो. इतिहासात घडलेल्या घटनांनुसार देशांत १३ सप्टेंबर या दिवशी अनेक सुखद आणि दु:खद घटना घडल्या आहेत.  त्याच घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १३ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 13 September Today Historical Events in Marathi

13 September History Information in Marathi
13 September History Information in Marathi

१३ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 September Historical Event

 • इ.स. १५९८ साली फ्रांस चे शासक हेनरी चतुर्थ (Henry IV) यांनी इसाई धर्माचा नांत चा प्रख्यात आदेश जारी केला.
 • इ.स. १७८४ साली रेगुलेटिंग ॲक्टच्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ब्रिटीश संसदेने पिट्स इंडिया ॲक्ट (PITS INDIA ACT) पास केला.
 • सन १९१३ साली ब्रिटीश धातुशास्त्रज्ञ हॅरी ब्रेअर्ली (Harry Brearley) यांनी स्टेनलेस स्टीलचा आविष्कार केला.
 • सन १९४८ साली हैदराबाद येथील निजाम सत्तेचे  भारतात विलीनीकरण करण्यासाठी भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन पोलो’  ही लष्करी मोहीम राबवली.
 • सन २००० साली चीनच्या शेनयांग येथे 1 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2000 दरम्यान खेळण्यात आलेली 24-खेळाडूंची श्रेणी XVI ची बुद्धिबळ स्पर्धा म्हणजेच फिड वर्ल्ड कप (FIDE) विश्वनाथ आनंद यांनी जिंकला.
 • सन २००८ साली  दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.

१३ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८४५ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ब्रिटीश अध्यक्ष हेनरी कॉटन (Henry Cotton) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८५७ साली अमेरिकन चॉकलेट व्यावसायिक ‘द हर्शे चॉकलेट’  कंपनीचे संस्थापक मिल्टन एस॰ हर्शे (Milton S. Hershey) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८६ साली नोबल पारितोषिक विजेते ब्रिटीश सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट रॉबिन्सन(Robert Robinson) यांचा जन्मदिन.
 • सन १९२६ साली ब्रिटीश कालीन भारतातील पहिल्या महिला क्रांतिकारक नागेंद्र बाला यांचा जन्मदिन.
 • सन १९३२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय किराणा घराण्यातील शास्त्रीय गायिका, संगीतकार व लेखक डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्मदिन.
 • सन १९३९ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी व निबंधकार भागवत रावत यांचा जन्मदिन.
 • सन १९४६ साली परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित भारतीय सैन्य दलाचे अधिकारी मेजर रामास्वामी परमेश्वरन यांचा जन्मदिन.
 • सन १९६७ साली अमेरिकन निवृत्त धावपटू माइकल जॉनसन(Michael Johnson) यांचा जन्मदिन.
 • सन १९६९ साली दिग्गज ऑस्ट्रेलियन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व  क्रिकेट भाष्यकार शेन वॉर्न (Shane Warne) यांचा जन्मदिन.
 • सन १९७३ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री महिमा चौधरी यांचा जन्मदिन.

१३ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 September Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८९३ साली भारतीय पत्रकार, विचारवंत आणि प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक मामा परमानंद यांचे  निधन.
 • सन १९२८ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी कवी, तसचं, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीधर पाठक यांचे निधन.
 • सन १९२९ साली थोर भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्य कार्यकर्ते तसचं, भगतसिंग यांचे सहकारी जतिंद्रनाथ दास उर्फ जतीन दास यांचे ६३ दिवसाच्या उपोषणानंतर लाहोर कारागृहात त्यांचे निधन झाले.
 • सन १९७१ साली महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमी कलाकार  व नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन.
 • सन १९९७ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय उर्फ अंजान यांचे निधन.
 • सन २०१२ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी २१ मुख्य न्यायाधीश व भारतीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष रंगनाथ मिश्रा यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top