• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 14, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंदचा जीवन परिचय

Viswanathan Anand Mahiti in Marathi

आनंद विश्वनाथन एक अद्भुत प्रतिभेचा बुद्धिबळपटू असून चाणाक्ष खेळाडू म्हणून जगद्विख्यात आहे. आपल्या एका खेळीने तो बुद्धिबळाची बाजी पलटवून प्रतिस्पर्ध्यावर दबाव वाढवून त्याला चुक करण्यास भाग पाडतो. म्हणूनच त्याला बुद्धिबळाचा शहंशहा आणि बुद्धिबळाचा जादुगार म्हंटलं जातं.

क्रीडा क्षेत्रात मिळणारा सर्वोत्तम असा राजीव गांधी पुरस्कार मिळवणारा तो पहिला खेळाडू आहे. तब्बल 5 वेळा वर्ल्ड चेस चैम्पियनशिप आपल्या नावावर करून त्याने आपल्यातील प्रतिभा सिद्ध केलीये. चला तर या लेखात त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवण्याकरता सज्ज व्हा…

बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंदचा जीवन परिचय – Viswanathan Anand Information in Marathi

Viswanathan Anand Information in Marathi

विश्वनाथन आनंद विषयी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती -Viswanathan Anand Biography in Marathi

नाव (Name)विश्वनाथन आनंद
जन्म (Birthday) 11 डिसेंबर 1969 माइलादुत्रयी, तामिळनाडू
वडील (Father Name)  विश्वनाथन अय्यर
आई (Mother Name) सुशीला
पत्नी (Wife Name) अरुणा आनंद
मुलगा (Children ) अखिल
शिक्षण (Education)  पदवीधर

विश्वनाथन आनंदचा जन्म आणि प्रारंभिक जीवन  –  Vishwanathan Anand History

11 डिसेंबर 1969 ला तामिळनाडू येथील मयिलाडूथराई या लहानश्या शहरात आनंद चा जन्म झाला पण त्याचं बालपण मात्र चेन्नई इथं झालं. त्याचे वडील विश्वनाथन अय्यर दक्षिण रेल्वेतील निवृत्त मैनेजर तर आई सुशीला देवी बुद्धिबळ प्रशिक्षक आणि प्रभावी समाज सुधारक होत्या. आईमुळेच आनंद बुद्धीबळाकडे आकर्षिला गेला.

विश्वनाथन आनंद ला त्याच्या आईने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षापासून बुद्धिबळाचे धडे देण्यास सुरुवात केली. विश्वनाथन आनंद ला मोठा भाऊ शिवकुमार आणि बहिण अनुराधा देखील आहेत. विश्वनाथन आनंद ने आपले सुरुवातीचे शिक्षण चेन्नईच्या एग्मोरे येथील डॉन बॉस्को मैट्रीक्यूलेशन हायर सेकंडरी स्कूल मधून पूर्ण केलं व कॉमर्स विषयाची पदवी चेन्नई येथीलच लोयोला कॉलेज मधून पूर्ण केली.

विश्वनाथन आनंद चा विवाह आणि मुलं – Vishwanathan Anand Marriage 

विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदने अरुणा आनंद समवेत विवाह  केला. विवाहानंतर त्यांना 2011 साली पुत्ररत्न प्राप्त झाले, ज्याचे नाव त्यांनी अखिल असे ठेवले.

विश्वनाथन आनंदची कारकीर्द – Vishwanathan Anand Career

  • विश्वनाथन आनंदने 2000 ते 2002 पर्यंत फिडे बुद्धिबळ चैम्पियनशिप ( Fide World Chess Championship ) चा किताब आपल्या नावावर करत आपल्यातील अद्वितीय प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं.
  • 2007 साली विश्वनाथन आनंद ने World Chess Championshipजिंकून अखिल विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं, यानंतर बुद्धीच्या या खेळाचा तो निर्विवाद शहंशाह बनला होता.
  • 2008 साली आयोजित World Chess Championship मध्ये विश्वनाथन आनंद ने ब्लादिमीर क्रैमनिक ला हरवून आपल्या यशाची घौडदौड कायम ठेवली. या विजयामुळे तो Chess Championship चा नॉकआउट, टूर्नामेंट आणि मैच जिंकणारा जागतिक बुद्धिबळ इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.
  • 2010 साली विश्वनाथन आनंद चा सामना बुल्गारिया च्या दिग्गज वेसेलिन टोपालोव समवेत झाला, आणि या स्पर्धेत World Chess Championship चा किताब विश्वनाथन आनंद ने आपल्या नावावर केला.
  • लागोपाठ आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने यश संपादन करणाऱ्या विश्वनाथन आनंद ने 2012 साली देखील आपले दमदार प्रदर्शन कायम ठेवले आणि बोरिस गेलफैंड ला पराभूत करून पुन्हा एकदा World Chess Championship आपल्या खिशात घातली.
  • 2013-2014 ही वर्षं विश्वनाथन आनंद करता निराशाजनक राहीलीत. या दरम्यान त्याला मैग्नस कार्ललन विरुद्ध दोनदा पराजय पत्करावा लागला.
  • 2018 साली विश्वनाथन आनंद ने कोलकाता येथे पहिला टाटा स्टील बुद्धिबळ भारत ब्लिट्ज टूर्नामेंट किताब जिंकला. या टूर्नामेंट मध्ये आनंद पहिल्या फेरीनंतर चौथ्या स्थानावर होते, पण अखेरच्या दिवशी त्याने 6 फेऱ्या जिंकत तीनदा बरोबरी राखली. परिणामी तो विश्वातील  तिसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकी नाकामुरा च्या बरोबरीत पोहोचला.
  • यानंतर विजेता ठरवण्यासाठी दोन फेऱ्यांचा प्लेऑफ खेळला गेला. या फेऱ्या ब्लिट्ज पेक्षा देखील वेगवान असतात. आनंद ने पांढऱ्या सोंगट्यांनी यश मिळविले, त्यानंतर काळ्या सोंगट्यांनी बरोबरी राखत  1.5-०.5 ने विजय प्राप्त केला. हा सामना अत्यंत उत्कंठावर्धक ठरला होता.

विश्वनाथन आनंदला कारकिर्दीत मिळालेले यश आणि सन्मान – Vishwanathan Anand Records

  • 1988 साली विश्वनाथन आनंद भारताचा पहिला ग्रैंडमास्टर बनला.
  • 2000 साली फिडे World Chess Championship जिंकणारा विश्वनाथन आनंद पहिला भारतीय ठरला.
  • विश्वनाथन आनंद ने आपल्या कारकिर्दीत 1997, 1998, 2003, 2004, 2007, आणि 2008, मध्ये 6 वेळा बुद्धिबळ ऑस्कर जिंकला आहे.
  • विश्वनाथन आनंद 2000, 2007, 2008, 2010 आणि 2012 मधे 5 वेळा World Chess Champion राहीला आहे.
  • त्याच्या कारकिर्दीतील हे मोठं यश आहे.

पुरस्कार आणि सन्मान – Vishwanathan Anand Awards

  • 1985 साली विश्वनाथन आनंद ला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.
  • 1987 साली आनंद ला भारतातील सर्वोच्च सन्मानातील एक समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलंय.
  • या शिवाय 1987 साली त्याला राष्ट्रीय नागरीक पुरस्काराने व सोवियत लैंड नेहरू पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे.
  • 1991-92 साली विश्वनाथन आनंद ला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार मिळविणारा विश्वनाथन आनंद हा पहिला मानकरी ठरलाय.
  • 2000 साली विश्वनाथन ला बुद्धिबळातील आपल्या अनोख्या प्रतीभेकरता पद्म पुरस्कार देखील देण्यात आला आहे.
  • 1998 साली विश्वनाथन आनंद ला स्पोर्ट्स स्टार मिलेनियम अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.
  • 2007 साली भारत सरकारच्या वतीनं विश्वनाथन आनंद ला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बुद्धिबळाचा जादुगार समजला जाणारा विश्वनाथन आनंद आज कित्येक खेळाडूंचा आदर्श आहे… विश्वातील लाखो बुद्धिबळप्रेमी त्याच्या खेळातील अद्भुत शैलीने भारावलेले आहेत…

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved