Tuesday, May 6, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 17 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, सन २००८ साली चीन ची राजधानी बिजींग येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्स यांनी नवीन इतिहास रचला. त्यांनी जलतरण या एकाच खेळ प्रकारात सुमारे आठ सुवर्ण पदक आपल्या नावे केले. अशी कामगिरी करणारे ते एकमेव व्यक्ती होत. याशिवाय, आज आपण इतर तारखेला घडलेल्या घटना जाणून घेऊया.

जाणून घ्या १७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 17 August Today Historical Events in Marathi

17 August History Information in Marathi
17 August History Information in Marathi

१७ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 August Historical Event

  • इ.स. १६६६ साली छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संबाजी राजे आग्रा येथून औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
  • इ.स. १८३६ साली ब्रिटनच्या संसदेने जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा कायदा ‘रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ ॲक्ट’ ला मान्यता दिली.
  • सन १९४५ साली इंडोनेशिया राष्ट्राला नेदरलँड्स राष्ट्राकडून स्वातंत्र्य मिळालं.
  • सन १९८२ साली पहिली सी. डी. (COMPACT DISK) जपानमध्ये बाजारात विक्रीस उपलब्ध झाली.
  • सन १९८८ साली पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद ज़िया-उल-हक़ आणि पाकिस्तानमधील अमेरिकेचे 18 वे राजदूत अरनॉल्ड लुईस राफेल(Arnold Lewis Raphel) हे विमान अपघातात ठार झाले.
  • सन १९९७ साली उस्ताद अली अखबर खाँ यांना अमेरिकेचा ‘नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • सन २००८ साली अमेरिकेचे दिग्गज जलतरणपटू मायकेल फेल्प्स (Michael Phelps) यांनी बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरण या एकच खेळ प्रकारात आठ सुवर्ण पदके जिंकून इतिहास रचला.

१७ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७६१ साली  मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ तसचं, बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार ख्रिस्ती धर्मोपदेशक मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार विल्यम केरी(William Carey) यांचा जन्मदिन.
  • सन १९०५ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक, ग्रंथसूचिकार शंकर गणेश दाते यांचा जन्मदिन.
  • सन १९१६ साली भारतीय दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार, आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे यांचा जन्मदिन.
  • सन १९१६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक व साहित्य क्षेत्रांतील उत्कृष्ट कादंबरीकार अमृतलाल नागर यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली साहित्यातील नोबल पारितोषिक विजेता, तसचं, बुकर पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध त्रिनिदादी-भारतीय लेखक विद्याधर सूरजप्रसाद नैपाल यांचा जन्मदिन.
  • सन १९४१ साली भारतीय रिजर्व बँकेचे माजी एकविसावे गव्हर्नर वॉय. वी. रेड्डी यांचा जन्मदिन.
  • सन १९४१ साली भारतीय रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांचा जन्मदिन.
  • सन १९४९ साली महाराष्ट्रीयन मराठी भारतीय इतिहासकार, लेखक आणि वक्ते निनाद गंगाधर बेडेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९७० साली जगातील पहिल्या क्रमांकाचे माजी अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू जिम कोरियर (Jim Courier) यांचा जन्मदिन.
  • सन १९७२ साली माजी बांगलादेश क्रिकेटपटू व कर्णधार काझी हबिबुल बशर यांचा जन्मदिन.

१७ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 August Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९०९ साली इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असतांना ब्रिटीश अधिकारी विल्यम कर्झन वायली (Curzon Wyllie) यांची हत्या करणारे थोर भारतीय क्रांतिकारक व स्वतंत्रता सेनानी शहीद मदन लाल धिंग्रा यांचे निधन.
  • सन १९४९ साली महान भारतीय क्रांतिकारक व स्वतंत्रता सेनानी तसचं, ढाका अनुशिलन समितीचे संस्थापक अध्यक्ष पुलिन बिहारी दास यांचे निधन.
  • सन १९८२ साली “भारतातील सर्वात प्रसिद्ध ख्रिश्चन हिंदी विद्वान” म्हणून लोकप्रिय असलेले भारतातील बेल्जियन जेसुइट मिशनरीचे धर्मगुरू व प्रसिद्ध साहित्यकार फादर कामिल बुल्के यांचे निधन.
  • सन १९८८ साली पाकिस्तानचे माजी सहावे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद ज़िया-उल-हक़ यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved