• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 14, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या १८ जुलै रोजी येणारे दिनविशेष

 18 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती तसेच, काही महान व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय स्वातंत्र्यकाळाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. सन ३ जून १९४७ साली सादर केलेल्या माउंटबॅटन योजनेच्या आधारावर ब्रिटीश संसदेने सन ४ जुलै १९४७ साली जे भारत स्वतंत्रता विधेयक सदर केलं होत त्याला सन १८ जुलै १९४७ साली म्हणजे आजच्या दिवशी संमती दिली होती. शिवाय, या विधेयकामध्ये भारताचे स्वरूप निश्चित करण्यात आलं होत.या विधेयकाला अनुसरून भारत व पाकिस्तानची फाळणी करण्यात येऊन दोन राष्ट्र निर्माण करण्यात आले.

शिवाय आज नोबल पारितोषिक विजेता दक्षिण भारताचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या  सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून संयुक्त राष्ट्राने अधिकृतपणे जाहीर केला. याची सुरवात सन २०१० सालापासून करण्यात आली.

जाणून घ्या १८ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 18 July Today Historical Events in Marathi

18 July History Information in Marathi
18 July History Information in Marathi

१८ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 July Historical Event

  • इ.स. १८५७ साली मुंबई येथील मुंबई विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
  • इ.स १८७२ साली ब्रिटन मध्ये निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिनियम लागू करण्यात आला. यापूर्वी खुल्या प्रकारे मतदान केलं जात असे.
  • सन १९२५ साली जर्मन सम्राट एडॉल्फ हिटलर(Adolf Hitler) यांनी आपले माइन काम्फ हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित केलं.
  • सन १९६८ साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात इंटेल कंपनीची स्थापण करण्यात आली.
  • सन १९८० साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने एस. एल. व्ही. -३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • सन १९९६ साली भरतीय उद्योगपती गोदरेज यांना जपान देशांतील मनाचा ऑर्डर ऑफ रायझिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१८ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १६३५ साली प्रसिद्ध ब्रिटीश वैज्ञानिक रोबर्ट हूक(Robert Hooke) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८४८ साली प्रसिद्ध माजी इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस(W. G. Grace ) यांचा जन्मदिन.
  • सन १९१८ साली शांततेचा नोबल पुरस्कार विजेते दक्षिण आफ्रिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला(Nelson Mandela) यांचा जन्मदिन.
  • सन १९२७ साली पाकिस्तानी गझल गायक व गझल सम्राट मेहंदी हसन यांचा जन्मदिन.
  • सन १९३५ साली दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम नगर भागात स्थित कांची कामकोटी पीठाचे ६९ वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्मदिन.
  • सन १९८२ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायिका तसचं, सन २००० सालच्या मिस वर्ल्ड पुरस्कार विजेता प्रियंका चोपडा यांचा जन्मदिन.
  • सन १९७२ साली भारतीय कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्मदिन.
  • सन १९९६ साली अर्जुन पुरस्कार विजेता सर्वोत्कृष्ट भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती श्रीनिवास मंधाना यांचा जन्मदिन.

१८ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 July Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९६९ साली महाराष्ट्रीयन थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन.
  • सन १९८९ साली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत लेखक डॉ. गोविंद केशव भट यांचे निधन.
  • सन १९९४ साली दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक व ख्यातनाम शिक्षणतज्ञ डॉ. मुनीस रझा यांचे निधन.
  • सन २००१ साली वेस्ट इंडीज संघातील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द गाजविणारे महान कसोटी गोलंदाज रॉय गिलक्रिस्ट(Roy Gilchrist ) यांचे निधन.
  • सन २००१ साली सांगलीच्या राजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.
  • सन २०१२ साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माते व राजकारणी राजेश खन्ना यांचे निधन.
  • सन २०१७ साली सुप्रसिद्ध भारतीय कवी, संस्कारकार, कथाकार, उपन्यासकार आणि सहृदय समीक्षक अजित शंकर चौधरी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved