जाणून घ्या १८ मार्च रोजी येणारे दिनविशेष

18 March Dinvishes

१८ मार्च या दिवशी संपूर्ण भारतभर आयुध फॅक्टरीज डे म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे अवचित साधून ऑर्डनेन्स फॅक्टरी, फील्ड गन फॅक्टरी, स्मॉल आर्म्स फॅक्टरी, ऑर्डनन्स पॅराशूट फॅक्टरी आणि ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरी आदी सर्व या दिवसाचा स्वीकार करतात.

याव्यतिरिक्त या दिवसाला इतिहास घडलेल्या सर्व घडामोडींची संपूर्ण माहिती आम्ही या लेखात देणार आहोत. संशोधकांनी केलेलं विविध विषयातील संशोधन तसेच केलेले नवीन विकास आदी सर्वच बाबींची माहिती देणार आहोत.

जाणून घ्या १८ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 18 March Today Historical Events in Marathi

18 March History Information in Marathi

१८ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 March Historical Event

 • इ.स. १८५० साली हेनरी वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची सुरवात केली.
 • सन १९१९ साली रौलेट एक्ट पास करण्यात आला.
 • इ.स. १९२२ साली महात्मा गांधी यांना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षाची शिक्षा देण्यात आली होती.
 • सन १९४४ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेशामार्गे भारतात प्रवेश करून भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटीश सेनेचा पाडाव करून तिरंगा फडकाविला.
 • इ.स. १९६५ साली अंतराळवीर अलेक्सी तिओनोवा अंतराळात पायी चालणारे पहिले व्यक्ती ठरले.
 • सन १९६९ साली रशियाने मानवरहित अवकाश यान ‘कॉसमॉस’ याला अवकाशात सोडले.
 • इ.स. २००१ साली भारतीय सरोदवादक अमजद आली खान यांना ‘गंधर्व पुरस्कार’ देण्यात आला.

१८ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १५९४ साली शहाजीराजे भोसले यांचा जन्मदिन.
 • सन १८५८ साली जर्मन शोधक आणि यांत्रिक अभियंता व डीझेल इंजिनचा शोध लावणारे रुडॉल्फ ख्रिश्चन कार्ल डिझल यांचा जन्मदिन.
 • इ.स.१८६७ साली ब्रिटीश वसाहतीच्या काळातील प्रसिद्ध चित्रकार व पोस्टकार्ड कलाकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्मदिन.
 • सन १८८१ महाराष्ट्रातील पत्रकार, नाटककार,स्वातंत्र्यसैनिक व स्वतंत्र हिंदुस्थानचे संपादक वामन गोपाल जोशी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९०१ साली शब्दकोशकार तथा शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर उर्फ तात्यासाहेब वीरकर यांचा जन्मदिन.
 • सन १९०५ साली मराठी भाषेतील आद्य स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९१४ साली आझाद हिंद सेनेचे अधिकारी गुरुबख्श सिंह ढिल्लो यांचा जन्मदिन.
 • सन १९३८ साली हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर यांचा जन्मदिवस
 • इ.स. १९४८ साली भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांचा जन्मदिन.

१८ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 March Death / Punyatithi /Smrutidin

 • सन १९०८ साली ब्रिटीश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन.
 • इ.स. १९४७ साली जनरल मोटर्स आणि शेवरलेत कंपनी चे संस्थापक विल्यम सी ड्युरंड यांचे निधन.
 • सन १९५६ साली प्रसिद्ध मराठी विद्वान नारायण शास्त्री मराठे यांचे निधन.
 • इ.स. २००० साली हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध गायिका राजकुमारी दुबे यांचे निधन.
 • सन २००१ साली महाराष्ट्रीयन चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here