Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १९ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 19 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती, तसचं, विशेष व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजच्या दिवशी स्वातंत्र्यपूर्वी भारतात इंग्रजांच्या इंस्ट इंडिया कंपनीने सर्वप्रथम एक रुपयाची नाणी तयार केली होती. इस्ट इंडिया कंपनी द्वारे तयार केलेली ही नाणी त्याकाळी मुघल शासकांच्या बंगाल प्रांतात चलनात आली होती. सन १७५७ साली इस्ट इंडिया कंपनीने बंगालच्या नवाबा सोबत केलेल्या करारानुसार टांकसाळ बनवले होती.

तसचं, आज मित्रांनो, जागतिक छायाचित्रकार दिन. या दिवसाचा इतिहास सुमारे पावणे दोनशे वर्षांचा आहे. या दिवसाची सुरुवात फ्रांस देशामध्ये झाली. लुईस द गेरो आणो जोसेफ नायफोर यांनी सन १८३७ साली द्गेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. या शोधामुळे छायाचित्रण करणे सोपे बनले. सन ९ जानेवारी १८३९ साली फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने द्गेरोटाईप असे नाव ठेवले. सन १९ ऑगस्ट २०१० साली जगभरातल्या फोटोग्राफर्सनी पहिला जागतिक छायाचित्रकार दिवस आयोजित केला होता. त्यानंतर दरवर्षी १९ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी जागतिक छायाचित्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

जाणून घ्या १९ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 19 August Today Historical Events in Marathi

19 August History Information in Marathi
19 August History Information in Marathi

१९ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 August Historical Event

  • इ.स. १८९७ साली लंडनमध्ये प्रख्यात विद्युत अभियंता विल्यम हेन्री प्रीस(William H. Press) यांच्या अध्यक्षतेखाली पहिली इलेक्ट्रिक कार (टॅक्सी) चालविण्यात आली.
  • सन १९१९ साली अफगाणिस्तानला ब्रिटन कडून स्वातंत्र्य मिळालं.
  • सन १९४९ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ओरिसा राज्याच्या पूर्वीचे राजधानीचे ठिकाण कटक बदलून भुवनेश्वर करण्यात आलं.
  • सन १९६४ साली केप कॅनॅवरल येथून डेल्टा डी # 25 या प्रक्षेपण वाहनाने सिंकॉम3 हा पहिला जिओस्टेशनरी कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
  • सन १९७३ साली फ्रांस देशाने आण्विक चाचणी केली.

१९ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७१ साली विमानाचा शोध लावणाऱ्या अमेरिकन राईट बंधुपैकी एक ऑर्व्हिल राईट(Orville Wright) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८६ साली भारतीय स्वातंत्र्यसैनिक व नागपुर येथील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे जहालमतवादी गटातील सदस्य मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८७ साली  भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकारणी तसचं, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत सामील असलेले नेता एस. सत्यमूर्ती यांचा जन्मदिन.
  • सन १९०३ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक व चरित्रकार गंगाधर देवराव खानोलकर यांचा जन्मदिन.
  • सन १९०७ साली भारतीय राजकारणी व माजी कॅबिनेट मंत्री स्वर्ण सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९०८ साली पद्मभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय ठुमरी गायक उस्ताद अब्दुल रशीद खान यांचा जन्मदिन.
  • सन १९११ साली प्रसिद्ध भारतीय कवी, कथाकार, आणि एकांकीकार आरसी प्रसाद सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९१८ साली भारताचे नववे राष्ट्रपती व आठवे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक,कादंबरीकार, लघुकथा लेखक, व टीकाकार प्राध्यापक शिवप्रसाद सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली प्रसिद्ध अमेरिकन राजकारणी तसचं, अमेरिकेचे माजी ४२ वे राष्ट्रपती विलियम क्लिंटन(Bill Clinton) यांचा जन्मदिन.
  • सन १९५० साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष, व्यावसायिक भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका, आणि कन्नड व इंग्रजी भाषिक लेखक सुधा मूर्ती यांचा जन्मदिन.

१९ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 August Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १६६२ साली फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, शोधक, लेखक आणि कॅथोलिक धर्मशास्त्रज्ञ ब्लेज़ पास्कल(Blaise Pascal) यांचे निधन.
  • इ.स. १७५७ साली ब्रिटीश कालीन भारतात इंग्रज सरकारच्या इस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे एक रुपयाची नाणी तयार केली.
  • सन १९०६ साली ब्रिटीश कालीन भारतातील बॉम्बे हायकोर्टाचे बॅरिस्टर म्हणून सराव करणारे पहिले भारतीय व्यक्ती तसचं, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे तिसरे अध्यक्ष व पहिले मुस्लीम अध्यक्ष बद्रुद्दीन तैबजी यांचे निधन.
  • सन १९४७ साली ‘मास्टर विनायक’  म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी यांचे निधन.
  • सन १९८३ साली भारतीय शिक्षणतज्ञ, देशभक्त, कुशल संघटक, लेखक, पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ ‘अप्पासाहेब’ पेंडसे यांचे निधन.
  • सन १९९३ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व लेखक आणि नाटककार उत्पल दत्त यांचे निधन.
  • सन १९९४ साली रसायनशास्त्र आणि शांततेचा नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व रसायन अभियंता तसचं, शांततेचे कार्यकर्ता, लेखक आणि शिक्षक लिनस कार्ल पॉलिंग यांचे निधन.
  • सन २०१३ साली न्युझीलंड येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यकार, भाषा विज्ञानी, व्याकरणकार तसचं, ऑक्सफोर्ड या हिंदी-इंग्रजी शब्दकोशाचे संपादक रोनाल्ड स्टुअर्ट मेक्ग्रेगॉर यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved