जाणून घ्या २ जून रोजी येणारे दिनविशेष

2 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन व त्यांचे महत्वपूर्ण कार्य याबद्दल थोडी माहिती समजून घेणार आहोत.

जाणून घ्या २ जून रोजी येणारे दिनविशेष – 2 June Today Historical Events in Marathi

2 June History Information in Marathi
2 June History Information in Marathi

२ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 June Historical Event

 • सन १९४८ साली शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली.
 • सन १९५३ साली इंग्लंड देशाच्या महाराणी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा अभिषेक करण्यात आला.
 • सन १९६६ अमेरिकेचे पहिले अंतरीक्ष यान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले.
 • सन २००० साली भारतीय लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 • सन २००४ साली ऑस्ट्रेलियन मॉडेल्स जेनीफर हॉकिन्स यांनी विश्वसुंदरी चा किताब पटकाविला.
 • सन २००६ साली अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम आणि त्याच्या संपूर्ण संघटनांवर प्रतिबंध लावला.
 • सन २०१४ साली तेलंगाना हे भारतातील २९ वे राज्य म्हणून घोषित करण्यात आले.

२ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८४० साली प्रसिद्ध इंग्रज कादंबरीकार आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्मदिन.
 • सन १९३० साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर, वैमानिक अभियंता, नौदल अधिकारी आणि वैमानिक चार्ल्स “पीट” कॉनरोड यांचा जन्मदिन.
 • सन १९३० साली भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेता व मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचा जन्मदिन.
 • सन १९५१ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मंत्रिमंडळातील माजी केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसचं माजी केंद्रीय ऊर्जा व शिवसेना पक्ष सदस्य अनंत गंगाराम गीते यांचा जन्मदिन.
 • सन १९५५ साली प्रख्यात भारतीय उद्योजक, नोकरशाही व राजकारणी तसचं, इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्मदिन.
 • सन १९५६ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय तामिळ-हिंदी भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता गोपाळ रत्नम सुब्रमण्यम उर्फ मणी रत्नम यांचा जन्मदिन.
 • सन १९६५ साली ऑस्ट्रेलिया देशाचे महान क्रिकेटपटू मार्क वॉ यांचा जन्मदिन.
 • सन १९६५ साली ऑस्ट्रेलिया देशाचे महान क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यांचा जन्मदिन.
 • सन १९६३ साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते, दूरदर्शन मालिका व मराठी रंगमंच अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्मदिन.
 • सन १९८० साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय तिरंदाजपटू डोला बॅनर्जी यांचा जन्मदिन.
 • सन १९८७ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री व गायिका सोनाक्षी सिन्हा यांचा जन्मदिन.

२ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 June Death / Punyatithi /Smrutidin

 • सन १९७५ साली वैश्विक किरणांवर मुलभूत संशोधनाची सुरवात करणारे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ देवेंद्र मोहन बोस यांचे निधन.
 • सन १९७८ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक प्राण कृष्ण पारिजा यांचे निधन.
 • सन १९८८ साली भारतीय चित्रपट क्षेत्रांतील पहिले सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन.
 • सन १९९० साली ब्रिटीश आणि अमेरिकन चित्रपट व रंगमंच अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचे निधन.
 • सन १९९२ साली मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top