• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, August 19, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या २ मे रोजी येणारे दिनविशेष

2 May Dinvishes

मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिनी घडलेल्या काही ऐतिहासिक तसचं आधुनिक माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्तीचे जन्मदिन, निधन त्यांचे शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेऊ.

जाणून घ्या २ मे रोजी येणारे दिनविशेष – 2 May Today Historical Events in Marathi

2 May History Information in Marathi
2 May History Information in Marathi

२ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 May  Historical Event

  • सन १९०८ साली स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनला गेले असतांना त्यांनी त्याठिकाणी प्रथमच शिवजयंती साजरी केली.
  • इ.स. १९१८ साली अमेरिकन वाहने व वाहनांचे भाग डिझाईन तसचं, उत्पादित करून बाजारपेठेत वितरण करणाऱ्या अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनी जनरल मोटर्स कंपनीने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.
  • सन १९२१ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबारब सावरकर व तात्याराव यांची अंदमानातून हिंदुस्थानात रवानगी करण्यात आली.
  • इ.स. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान सोवियत सैन्यांनी बर्लिनचा पाडाव केला.
  • सन १९९४ साली बँक ऑफ कराडचे विलीनीकरण करून त्या बँकेला बँक ऑफ इंडिया मध्ये समाविष्ट करण्यात आलं.
  • इ.स. १९९७ साली टोनी ब्लेयर इंग्लंड देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले.
  • सन २००४ साली एस. राजेंद्रबाबू यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली.
  • इ.स. २०११ साली अमेरिकन सैन्य दलातील नेव्ही सी ६ दलाच्या तुकडीने पाकिस्तान मधील अ‍ॅबोटाबाद येथे प्रख्यात आतंकवादी व पॅन-इस्लामिक अतिरेकी संघटना अल कायदाचे संस्थापक ओसामा बिन मोहम्मद बिन अवद बिन लादेन यांची हत्या केली.

२ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९२० साली नाट्य संगीतीय क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान देणारे प्रख्यात भारतीय शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२१ साली भारतातील सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न पुरस्कार सन्मानित तसचं, चित्रपट क्षेत्रांतील सर्वोच्च सन्मान ऑस्कर पुरस्कार सन्मानित प्रथम भारतीय सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, संगीतकार, छायाचित्र कलाकार, गीतकार आणि लेखक सत्यजित रे यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली भारतीय इंग्लिश बिलियर्डस व्यावसायिक खेळाडू विल्सन लिओनेल गार्टन-जोन्स यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२९ साली लेखक, समालोचक, वक्ते, संपादक आणि प्रशासक विष्णू वामन शास्त्री यांचा जन्मदिन.
  • सन १९६९ साली वेस्ट इंडीज देशांतील महान माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्मदिन.

२ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2  May Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १५१९ साली विश्वविख्यात इटालियन चित्रकार लिओनार्डो डी सेरो पियरो दा विंची तथा लिओनार्डो दा विंची यांचे निधन.
  • सन १६८३ साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सांगण्यावरून राज्यव्यवहार कोश तयार करणारे मुत्सद्दी व शिवाजी महाराज यांचे दक्षिणेतील अतिशय महत्वकांक्षी तडफदार स्वामिनिष्ठ कारभारी रघुनाथपंत हणमंते यांचे निधन.
  • इ.स. १९७३ साली प्रख्यात भारतीय महाराष्ट्रीयन साहित्यिक, विचारवंत, तत्वचिंतक व समिक्षक दिनकर केशव बेडेकर यांचे निधन.
  • सन १९७५ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या तसचं, महान भारतीय राजनीतिज्ञ श्रीमती सरोजिनी नायडू यांच्या कन्या पद्मजा नायडू यांचे निधन.
  • इ.स. १९८५ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, पत्रकार व साहित्यिक बनारसी चतुर्वेदी यांचे निधन.
  • सन १९९८ साली गोवामुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक व कॉंग्रेस नेता तसचं, समाजसेवक पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन.
  • इ.स. २०११ साली सौदी अरेबिया देशांतील प्रख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन यांना अमेरिकन सैन्यांनी ठार मारले.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved