जाणून घ्या २० मार्च रोजी येणारे दिनविशेष

20 March Dinvishes

प्रत्येक दिवसाचे काहीना काही महत्व हे असतेच, त्याचप्रमाणे आजच्या दिवसाला देखील विशेष महत्व आहे.  २० मार्च हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.  जगभरातील लोकांच्या जीवनात आनंदाला किती महत्व आहे हे ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सन २००३ पासून हा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे.

तसचं, २० मार्च या दिनी जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो.  पहिला जागतिक चिमणी दिवस २० मार्च २०१० रोजी पाळला गेला होता. याव्यतिरिक्त या लेखात आपण २० मार्च या दिवसाच्या संपूर्ण ऐतिहासिक तसेच आधुनिक घडामोडी बद्दल जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २० मार्च रोजी येणारे दिनविशेष – 20 March Today Historical Events in Marathi

20 March Today Historical Events in Marathi

२० मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 March Historical Event

  • इ.स. १६०२ साली नेदरलँड्स येथील व्यापारिक कंपनी युनायटेड इस्ट इंडिया कंपनी ची स्थापना करण्यात आली. सन १५९५ साली भारतात येणारी पहिली युरोपियन कंपनी होती. भारत आणि दक्षिणपूर्व आशियाई देशांशी व्यापार सुनिश्चित करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.
  • सन १७३९ साली नादीरशहा यांनी दिल्लीवर स्वारी करून तेथील प्रसिद्ध मयूर सिहासन आणि महागडे नवरत्न लुटून इराणला पाठवली.
  • इ.स. १८५४ साली रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका पक्षाची स्थापना करण्यात आली. याच पक्षाला “ग्रँड ओल्ड पार्टी” देखील म्हटलं जाते.
  • सन १९०४ साली चर्च ऑफ इंग्लंडचे पुजारी चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज महात्मा गांधी यांच्या सोबत स्वातंत्रता आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी भारतात आले होते.
  • इ.स. १९१६ साली आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपला सापेक्षतेचा सिद्धांत प्रसिद्ध केला.
  • सन १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाड येथील चवदार तळ्यावरील सत्याग्रह पार पडले.
  • इ.स. १९५६ साली ट्युनिसीया देशाला फ्रांस देशाकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • सन १९६६ साली लंडन येथील वेस्टमिनिस्टर च्या सेंट्रल मध्ये प्रदर्शनी करिता ठेवण्यात आलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप ची चोरी करण्यात आली होती.
  • इ.स. १९८२ साली फ्रांसने परमाणु शास्त्राची चाचणी केली.

२० मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १६१५ साली मुघल बादशाहा शहाजहा व पत्नी मुमताज महल यांचे सर्वात थोरले पुत्र दारा शिकोह यांचा जन्म.
  • सन १९२० साली भारतीय मराठी नाटककार आणि कादंबरीकार वसंत शंकर कानेटकर यांचा जन्म महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गावी झाला होता.
  • इ.स. १९२१ साली भारतीय प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी पडिनजरेतकालकल चेरियन अलेक्झांडर यांचा जन्मदिन.
  • सन १९३९ साली माजी भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडू एच.एच. जामसाहेब शत्रुसूर्यासिंह जडेजा यांचा जन्म राजस्थान येथे झाला होता.
  • इ.स. १९५१ साली माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक मदनलाल उधौरम शर्मा यांचा जन्मदिन.
  • सन १९५२ साली माजी भारतीय टेनिसपटू आणि व्यावसायिक आनंद अमृतराज यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९६६ साली भारतीय पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्मदिन.
  • सन १९७३ साली पहिले भारतीय खेळाडू अर्जुन अटवाल यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९८७ साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत यांचा जन्मदिन.

२० मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 March Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १३५१ साली दिल्लीचे सुलतान मोहम्मद बिन तुघलक यांचे निधन.
  • सन १७२७ साली इंग्रजी गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, ब्रह्मज्ञानी आणि लेखक सर आयझॅक न्यूटन यांचे निधन
  • इ.स. १९२५ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील ब्रिटीश मुत्सद्दी आणि व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांचे निधन.
  • सन १९५६ साली महाराष्ट्रीयन मराठी नवकाव्याचे प्रणेते कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांचे निधन.
  • इ.स. १९७० साली माजी भारतीय हॉकी खेळाडू जयपालसिंग मुंडा यांचे निधन.
  • सन २०१४ साली भारतीय लेखक, वकील, मुत्सद्दी, पत्रकार आणि राजकारणी अश्या परकारची व्यक्तिमत्व असणारे खुशवंत सिंग यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top