Saturday, June 3, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

कंगना राणावत

कंगना राणावत / Kangana Ranaut एक उत्कृष्ट फिल्म अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूड चित्रपटामध्ये आपले करियर बनवले आहे.

त्या भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्र्यामधून एक आहे.

कंगना भारतीय मेडीया मध्ये इमानदारी आणि खरया मनाने सामान्यासमोर आपले विचार प्रकट करण्यासाठी ओळखली जाते.

भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलावंतांमध्ये गणल्या जाणारी कंगना 3 राष्ट्रीय फिल्म अवार्ड आणि ४ विविध श्रेणीमध्ये फिल्मफेयर अवार्ड जिंकणारी अभिनेत्री आहे.

Kangana Ranaut

कंगना राणावत यांचे जीवन चरित्र / Kangana Ranaut Biography

कंगना राणावत यांनी २००६ मध्ये आलेल्या थ्रिलर फिल्म “गैंगस्टर” नी चित्रपटात प्रवेश केला. यासाठी त्यांना बेस्ट फीमेल डेब्यू फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाला.

यानंतर २००६ च्या शेवटी आलेली फिल्म “वो लम्हे” मध्ये तिने एक भावूक भूमिका असलेले पात्र अभीनित केले.

पुढे (२००७) लाइफ इन_ _ मेट्रो आणि (२००८) फैशन सारखे सुपरहिट चित्रपट केले. यासाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय फिल्मफेअर अवार्ड आणि याच श्रेणीत एक फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाले आहे.

कंगनाने यानंतर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट “राज : द मिस्ट्री कंटिन्यू” (२००९) आणि “वंस अपॉन ए टाइम इन मुंबई” (२०१०) केले.

त्यानंतर त्यांनी (२०११) मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट झालेली फिल्म “तनु वेड्स मनु” मध्ये अभिनेता आर.माधवन यांच्यासोबत विनोदी भूमिका केली.

यानंतर त्यांनी सुपरस्टार ह्रितिक रोशन यांच्या सायन्स फिक्शन फिल्म “क्रिश 3” (२०१३) मध्ये एक उत्परीवर्ती जंतूची भूमिका केली.

हि फिल्म बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटामधील एक मानली जाते.

२०१४ मध्ये चित्रपट “क्वीन” मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड सुद्धा मिळाला.

२०१५ मध्ये कंगनाची आणखी सर्वोत्तम फिल्म “तनु वेड्स मनु रिटर्न्स” मधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर क्रिटीक्स अवार्ड आणि दुसरयांदा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून लगातार दुसरा फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड मिळाला हि उपलब्धी कोणत्याही महिला कलाकाराने मिळविलेली पहिली मानली जाते.

कंगना राणावत सुरुवातीचा जीवन प्रवास

कंगना राणावत यांचा जन्म २३ मार्च १९८६ मध्ये हिमाचल प्रदेश येथील मंदी जिल्ह्यातील भाम्बला या गावी एका राजपूत परिवारात झाला. त्यांचे वडील अमरदीप राणावत एक व्यापारी व आई आशा राणावत एका शाळेवर शिक्षिका होत्या.

त्यांना एक भाऊ अक्षद व एक मोठी बहिण रंगोली २०१४ पासून कंगनाच्या व्यवस्थापक आहेत. त्यांच्या आजोबांचे वडील लेजीस्लेटीव असेम्ब्ली मध्ये सदस्य होते.

त्याचे आजोबा I.A.S. अधिकारी होते. भाम्बला येथील पारंपारिक हवेली मध्ये त्यांचे पालन पोषण झाले.

कंगनाच्या मते लहान असताना फार जिद्दी आणि विद्रोही होती. जेव्हा वडील तिच्यासाठी एक छोटीसी बाहुली आणायचे व लहान भावासाठी प्लास्टिक ची गन आणायचे याचा ती विरोध करायची.

चंदिगढ येथील DAV स्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

पुढील शिक्षण त्यांनी तेथेच विज्ञानात केले. त्यांच्या आई वडिलांची अशी इच्छा होती कि कंगनाने डॉक्टर बनावे.

परंतु १२ वीत केमिस्ट्रीच्या युनिट टेस्ट मध्ये फेल झाल्यावर तिने ऑल इंडिया प्री मेडीकल टेस्ट देण्याचे मनातून काढून टाकले.

आणि आपल्या भवितव्याला योग्यरीत्या निर्धारित करण्याचे ठरविले.

पुढील शिक्षणासाठी कंगना दिल्लीला आली. तिला मेडिकल क्षेत्रात जायचे नव्हते. कोणते क्षेत्र करियर म्हणून निवडायचे अशा विचारात असतानाच अचानक एका मोडेलिंग एजन्सीला तिचे लुक्स आणि अंदाजांना प्रभावित होऊन काही मौडेलिंग असाइनमेन्टसाठी बद्ध केले.

About Kangana Ranaut

या क्षेत्राबद्दल तिला जास्त रुची नव्हती. कारण तिला वाटायचे कि या खेत्रामध्ये क्रिएटीवीटीसाठी कोणतीच जागा नाही.

म्हणून तिने अभिनयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी तिने अस्मिता थियेटर ग्रुप मध्ये सदस्य म्हणून कार्यरत झाली.

येथे डिरेक्टर अरविंद गौर यांनी तिला अभिनयाचे गुण शिकविले. त्यांच्या थियेटर ग्रुप मध्ये राहून नाट्यामध्ये प्रभावशाली अभिनय केला.

एका प्रयोगात सोबतच्या पुरुष अभिनेत्याचा रोल स्वतःच्या रोल सोबत करून तिने सगळ्यांचे लक्ष आकर्षित केले.

त्यानंतर कंगना मुंबईला आली अभिनयात आपले करियर व्हावे यासाठी ख्यातनाम आशा चंद्रा यांच्या ड्रामा स्कूल मध्ये चार महिन्यांचा कोर्स साठी दाखला घेतला.

असे म्हटले जाते कि फिल्म इंडस्ट्रीमध्ये कंगना चे प्रारंभिक वर्ष फारच अडचणींचे होते.

अभिनय क्षेत्र निवडल्यामुळे परिवाराची नाराजीही सहन करावी लागली. परिवाराची कोणतीच मदत तिला मिळत नव्हती.

२००७ मधील तिची फिल्म लाइफ इन इ….मेट्रो जाहीर झाल्यावर तिचे करियर चालते केले. यामुळे परिवार तिच्या मदतीला धावून आले.

कंगना राणावत अवार्ड्स – पारितोषिके

कंगना राणावत यांना 3 नेशनल फिल्म अवार्ड मिळाले आहेत.

  • फ्याशन (२००८) साठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री,
  • क्वीन (२०१४) आणि तनु वेड्स मनु रिटर्न (२०१५) साठी उत्कृष्ट अभिनेत्री,
  • यासोबत ४ फिल्मफेअर अवार्ड सुद्धा कंगनाच्या नावावर आहेत.
  • गंगस्टर (२००६) साठी उत्कृष्ट फिमेल डेब्यू अवार्ड,
  • फ्याशन (२००८) साठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री,
  • क्वीन (२०१४) साठी उत्कृष्ट अभिनेत्री
  • तनु वेड्स मनु रिटर्न (२०१५) साठी उत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटीक्स) अवार्ड.
Previous Post

बालुशाही बनविण्याची विधी

Next Post

बाह्य प्राणायाम

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Next Post
bahya pranayam

बाह्य प्राणायाम

ज्वारीची भाकरी बनविण्याची विधी | Jwarichi Bhakri

ज्वारीची भाकरी बनविण्याची विधी | Jwarichi Bhakri

Ranveer Singh

रणवीर सिंह यांची जीवनी

Karisma Kapoor

करिश्माकपूरचा जीवन परिचय

Advantage and Disadvantages of Milk

दूध प्यायचे फायदे आणि नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved