Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २१ जून रोजी येणारे दिनविशेष

21 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन व त्यांचे महत्वपूर्ण कार्य याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत.

आज २१ जून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य राष्ट्रांनी आजच्या दिवशी जागतिक  योग दिवस साजरा करण्यास मंजुरी दिली. आजच्या दिवशी संपूर्ण जगभर योग साधना करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. विश्वातील जनतेला योगाचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. शिवाय, २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, तर दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस असतो. भौगोलिक कारणामुळे लहान मोठा दिवस हा होत असतो. पृथ्वीचे सूर्याकडे सरकण्यामुळे हे सर्व उद्भवत असते.

मित्रांनो, आपण सर्वांना माझी मराठीच्या टीमकडून जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्या.. नेहमी हेल्दी राहा आणि योग करीत जा. योग केल्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू ताणले जाऊन आपल्या शरीरात नवीन ऊर्जा संचारली जाते. योग अभ्यासाचे विविध प्रकार आहेत. त्यांची पुस्तके बाजारात देखील उपलब्ध आहेत.

जाणून घ्या २१ जून रोजी येणारे दिनविशेष – 21 June Today Historical Events in Marathi

21 June History Information in Marathi
21 June History Information in Marathi

 

२१ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 June Historical Event

  • सन १९४८ साली सी. राजगोपालचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले व अंतिम गव्हर्नर जनरल बनले
  • सन १९४९ साली राजस्थान राज्यातील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९६१ साली अमेरिकन शास्त्रज्ञांनी समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचे नवीन यंत्र विकसित केलं.
  • सन १९७५ साली इंग्लंड देशांत आयोजित क्रिकेट विश्वकप वेस्टइंडीज वेस्टइंडीज क्रिकेट संघाने प्रथम जिंकला.
  • सन १९९१ साली पी.वी. नरसिंहराव हे भारताचे नववे पंतप्रधान बनले.
  • सन १९९२ साली विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणारे महान भारतीय वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर करण्यात आला.
  • सन १९९८ साली फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.
  • सन १९९९ साली मनमोहन सिंह यांनी वित्तमंत्री पदी शापाद घेतली.
  •  सन २००९ साली भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
  • सन २०१४ साली संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य देशांनी मिळून २१ जून या दिवशी ‘जागतिक योग दिवस’  साजरा करण्याच्या प्रस्तावास ११ डिसेंबर २०१४ साली मंजुरी मिळाली.
  • सन २०१५ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस पूर्ण जगात साजरा करण्यात आला.

२१ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९०५ साली नोबल पारितोषिक सन्मानित फ्रेंच तत्ववेत्ता, नाटककार, कादंबरीकार, पटकथा लेखक, राजकीय कार्यकर्ते, चरित्रकार आणि साहित्यिक समीक्षक ज्यां-पाल सार्त्र यांचा जन्मदिन.
  • सन १९१२ साली पद्मभूषण पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक, कादंबरीकार, लघुकथा लेखक, व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्मदिन.
  • सन १९१६ साली पद्मभूषण पुरस्कार तसचं, परम विशिष्ट सेवा मेडल्स सन्मानित भारतीय नौदल प्रमुख एडमिरल सुरेंद्रनाथ कोहली यांचा जन्मदिन.
  • सन १९२३ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी, नाटककार, लघुकथा लेखक, अनुवादक, व्यंगचित्रकार आणि चित्रकार सदानंद रेगे यांचा जन्मदिन.
  • सन १९२७ साली रेमन मैग्सेसे पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय पत्रकार व ‘हिंदुस्तान टाईम्स’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राचे संपादक बी. जी. वर्गीज यांचा जन्मदिन.
  • सन १९५३ साली पाकिस्तान देशाच्या पहिल्या महिला माजी पंतप्रधान व राजकारणी बेनझीर भुट्टो यांचा जन्मदिन.
  •  सन १९५८ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेरी व दूरदर्शन कलाकार रीमा लागू यांचा जन्मदिन.
  • सन १९६७ साली प्रसिद्ध अमेरिकन अब्जाधीश उद्योजक, संगणक शास्त्रज्ञ आणि परोपकारी तसचं, ईबेचे संस्थापक पियरे मोराड ओमिदार(Pierre Morad Omidar) यांचा जन्मदिन.
  • सन १९६७ साली थायलंड देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा(Yingluck Shinawatra) यांचा जन्मदिन.

२१ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 June Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १५२७ साली इटालियन नवनिर्मित काळातील मुत्सद्दी, तत्त्वज्ञ आणि लेखक व इटली येथील आधुनिक राजकीय तत्वज्ञानाचे जनक निकोलो मैकियावेली (Niccolò Machiavelli) यांचे निधन.
  • सन १९२८ साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबरीकार, लेखक द्वारकानाथ माधव पितळे यांचे निधन
  • सन १९३२ साली आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ ब्रजभाषा कवि जगन्नाथदास रत्नाकर यांचे निधन.
  • सन १९४० साली प्रख्यात भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन.
  • सन १९५७ साली नोबल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जोहन्नेस स्टार्क (Johannes Stark) यांचे निधन.
  • सन १९८४ साली महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेता व गायक अरुण सरनाईक यांचे निधन.
  • सन २००३ साली प्रसिद्ध अमेरिकन ऐतिहासिक कल्पित साहित्याचे लेखक लिओन युरिस यांचे निधन.
  • सन २०१२ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अर्थशास्त्रज्ञ, नागरी सेवक अधिकारी आणि मुत्सद्दी तसचं, अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत व माजी नियोजन आयोगाचे सदस्य आबिद हुसेन यांचे निधन.
  • सन २०१२ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व अनुवादक तसचं, ‘सह्याद्री’ वृत्तपत्राचे संपादक भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved