जाणून घ्या २३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

  23 April  Dinvishesh

मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडून गेलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचे काही महत्वपूर्ण व्यक्तीचे शोध, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आदी घटनांची संपूर्ण माहिती (23 April Today Historical Events in Marathi) या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांना पुस्तके, वाचन, कॉपीराइट कायदे समजून घेण्यासाठी आणि बौद्धिक कॉपीराइटच्या संरक्षणाबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जाणून घ्या २३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 23 April Today Historical Events in Marathi

23 April History Information in Marathi २३ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 April Historical Event

 • इ.स. १७७४ साली ब्रिटीश कमांडर कर्नल चेम्पमेन यांनी रोहिलखंड येथील रोहिला सेनेचा पराभव करून रोहिलखंड आपल्या ताब्यात घेतले.
 • सन १८९१ साली रुस देशाची राजधानी मास्को येथिल यहुदी धार्मिक लोकांना देशाबाहेर काढून देण्यात आले.
 • इ.स. १९३५ साली युरोपियन राष्ट्र पोल्लंड ने संविधान आमलात आणले.
 • सन १९८४ साली वैज्ञानिकांनी एड्स या विषाणूचा शोध लावला.

२३ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १५६४ साली इंग्लंड देशातील प्रख्यात इंग्रजी भाषिक राष्ट्रीय कवी, नाटककार व अभिनेता विलियम शेक्सपीयर यांचा जन्मदिन.
 • सन १७९१ साली अमेरिकेचे माजी १७ व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकानन यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८५८ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील महिला शिक्षण व मुक्तीच्या प्रणेता व थोर भारतीय समाजसुधारक व संस्कृत अभ्यासक म्हणून पंडित आणि सरस्वती या दोन्ही पदवी मिळविणाऱ्या पहिल्या महिला पंडिता रमाबाई यांचा जन्मदिन
 • सन १८५८ साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व नोबल पारितोषिक विजेता मॅक्स प्लांक यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८७३ साली स्वातंत्र्यपूर्व भारताच्या महाराष्ट्र प्रांतातील सामाजिक व धार्मिक सुधारक तसचं, अस्पृश्यतानिवारण करण्यासाठी महत्वाचे कामे काम करणारे थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्मदिन.
 • सन १९२७ साली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या गायिका व सर्बहार वादक अन्नपूर्णा देवी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९३८ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पार्श्वगायिका व संगीतकार एस. जानकी उर्फ सिस्ला जानकी यांचा जन्मदिन.

२३ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 April Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १६१६ साली इंग्लंड देशातील प्रख्यात विनोदी लेखक, नाटककार व अभिनेता विलियम शेक्सपीयर यांचे निधन.
 • सन १९२६ साली लिनन पुरस्कार सन्मानित ब्रिटिश सर्जन, भूगर्भशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ आणि छायाचित्रकार हेनरी बी. गप्पी याचं निधन.
 • इ.स. १९२६ साली राष्ट्रभाषा हिंदी चे उद्गाते, प्रखर चिंतक, स्वातंत्रता संग्राम सेनानी माधवराव सप्रे याचं निधन.
 • सन १९६८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय पटियाला घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय गायक उस्ताद बडे गुलाम अली खान यांचे निधन.
 • इ.स. १९७३ साली हिंदी आणि ब्रजभाषेतील प्रख्यात कवी आणि लेखक धीरेंद्र वर्मा याचं निधन.
 • सन १९९२ साली भारतीय सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न सन्मानित  भारतीय चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, संगीतकार, छायाचित्रकार, कलाकार, गीतकार आणि लेखक सत्यजित रे यांचे निधन.
 • इ.स. २००१ साली सयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, गोवा मुक्ती संग्रामातील झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, तसचं, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्वज्ञान, विज्ञान,  आदी क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ सक्रीय असणारे महाराष्ट्र विधान सभेचे माजी अध्यक्ष व केसरी संपादक जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचे निधन.
 • सन २०१३ साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here