Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २३ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

23 October Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्या भारत देशाच्या इतिहास काळाच्या दृष्टीने खूप महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी घडलेल्या अनेक महत्पूर्ण घटनांचा साक्षीदार असलेला हा दिवस असून, इतिहासकारांनी आजच्या दिवशी घडलेल्या अनेक घटनांची नोंद केली आहे. मित्रांनो, आपण अश्याच काही महत्पूर्ण घटना या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन तसचं निधन पावणारे महत्वपूर्ण व्यक्ती यांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २३ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 23 October Today Historical Events in Marathi

23 October History Information in Marathi
23 October History Information in Marathi

२३ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 October Historical Event

  • इ.स. १७६४ साली मुघल शासक मीर कासीम यांचा बक्सरच्या लढाईत पराभव झाला.
  • इ.स. १८५० साली अमेरिकेत महिलांच्या अधिकारांना अनुसरून पहिल्यांदाच राष्ट्रीय महिला हक्क दीक्षांत समारोह पार पडला.
  • सन १९१० साली अमेरिकेतील ब्लांश एस. स्कॉट या महिला मदती शिवाय एकट्या विमान उडविणाऱ्या पहिल्या वैमानिक बनल्या.
  • सन १९४३ साली नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी  सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या अंतर्गत महिलांची ‘झाशीची राणी ब्रिगेड’ सेनेची स्थापना केली.
  • सन १९४६ साली न्यूयॉर्क येथे सयुक्त राष्ट्राची पहिली महासभा पार पडली.
  • सन १९४७ साली गेर्टी कोरी आणि त्यांचे पती कार्ल कोरी हे पहिले असे दांपत्य होते ज्यांना चिकित्सक क्षेत्रातील नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत.
  • सन २००४ साली जपान येथे आलेल्या भूकंपामुळे सुमारे ८५ हजार नागरिक बेघर झाले होते.
  • सन २०१९ साली भारतीय वायू दलाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

२३ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७७८ साली भारतीय राज्य कर्नाटक येथील कित्तूर राज्याची शासिका व स्वतंत्रता संग्राम सेनानी वीरांगना राणी चेन्नम्मा यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९८ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व केंद्रीय कामगार मंत्री तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल खंडूभाई देसाई यांचा जन्मदिन.
  • सन १९२३ साली मुंबई येथील सहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष व ‘श्री विद्या प्रकाशनाचे’ संस्थापक दामोदर दिनकर उर्फ मधुकाका कुलकर्णी यांचा जन्मदिन.
  • सन १९२४ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी संगीत दिग्दर्शक, गायक व चित्रपट आणि रंगमंच अभिनेते पंडित राम मराठे यांचा जन्मदिन.
  • सन १९२५ साली भारतीय राज्य राजस्थान चे माजी मुख्यमंत्री व भारताचे माजी अकरावे उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली भारतीय हिंदी व मराठी चित्रपट अभिनेता शफी इनामदार यांचा जन्मदिन.
  • सन १९५७ साली प्रख्यात भारतीय उद्योगपती, समाजसेवक आणि भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांचा जन्मदिन.

२३ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 October Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९६२ साली भारतीय सर्वोच्च सैन्य शौर्य पुरस्कार परमवीर चक्र सन्मानित प्रख्यात भारतीय लष्कर सैनिक सुभेदार जोगिंदर सिंह यांचे निधन.
  • सन १९७३ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित ब्रिटीश भारतीय क्रांतिकारक महिला तसचं, कलकत्ता येथील ४७ व्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा नेली सेनगुप्त यांचे निधन.
  • सन २०१२ साली भारतीय बंगाली भाषिक साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय कवी आणि कादंबरीकार तसचं, कृतीबास या बंगाली कविता मासिकाचे लेखक सुनील गंगोपाध्याय यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved