जाणून घ्या २४ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

24 August Dinvishes

मित्रांनो, आज २४ ऑगस्ट आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या मध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २४ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 24 August Today Historical Events in Marathi

24 August History Information in Marathi
24 August History Information in Marathi

२४ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 August Historical Event

 • इ.स. १४५६ साली जर्मनीतील मेन्झ येथे जोहान्स गुटेनबर्ग(Johannes Gutenber) यांनी बायबल ग्रंथाच्या छपाई काम पूर्ण केलं.
 • इ.स. १६०८ साली इस्ट इंडिया कंपनीचे “हेक्टर” हे जहाज सुरत इथे पोहचले.
 • इ.स. १६९० साली इस्ट इंडिया कंपनीचे एजंट जॉन चार्नोक(John Charnock) प्रथम शहरात आल्या नंतर त्यांनी स्थानिक जमीनदारांकडून तीन गावे (सुतानुती, कोलकाता, गोबिंदपूर) विकत घेतली.
 • इ.स. १६९९ साली ईस्ट इंडिया कंपनीने विकत घेतलेल्या कोलकाता शहराला प्रेसिडेंसी शहर म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्या शहराचे नाव बदलून कलकत्ता असे ठेवले.
 • सन १९६९ साली भारतीय राजकारणी नेते वी. वी. गिरी यांची भारताच्या राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली. ते भारताचे चौथे राष्ट्रपती होते.
 • सन १९७४ साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात कॉंग्रेस नेता फखरुद्दीन अली अहमद यांची भारताच्या पाचव्या राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली.

२४ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –24 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८३३ साली प्रसिद्ध भारतीय गुजराती कवी, नाटककार, निबंधकार, वक्ते, कोशशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश राजवटीतील सुधारक तसचं, आधुनिक गुजराती साहित्याचे संस्थापक नर्मदशंकर द्वे यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८७२ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन कायदेपंडित,  नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, कवी, चरित्रकार, समीक्षक, इतिहासकार, आणि तत्वज्ञान आणि राजकीय विषयाचे लेखक साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर उर्फ तात्यासाहेब केळकर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८८ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त बाळ गंगाधर खेर यांचा जन्मदिन.
 • सन १९०८ साली स्वातंत्रपूर्व भारतातील महाराष्ट्र राज्यातील  क्रांतिकारक व भगतसिंग यांचे सहकारी शहीद शिवाराम हरी राजगुरू यांचा जन्मदिन.
 • सन १९१८ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भा.ज.प चे माजी उपाध्यक्ष व माझी केंद्रीय परराष्ट्र मंत्री तसचं, केरळ माजी राज्याचे राज्यपाल सिकंदर बख्त यांचा जन्मदिन.
 • सन १९२० साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्मदिन.
 • सन १९३२ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक समीक्षक आर. जी. जाधव यांचा जन्मदिन.
 • सन १९४४ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय ओडिसी शास्त्रीय नर्तिका संजुक्ता पाणिग्रही यांचा जन्मदिन.

२४ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 August Death / Punyatithi /Smrutidin

 • सन १९२५ साली प्रसिद्ध भारतीय संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचे निधन.
 • सन १९६८ साली आधुनिक भारताचे अग्रगण्य विचारवंत आणि सामाजिक वैज्ञानिक, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रचे प्राध्यापक तसचं, लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू राधाकमल मुखर्जी यांचे निधन.
 • सन १९९३ साली पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचे निधन.
 • सन २००० साली पद्मश्री नागरी पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार कल्याणजी-आनंदजी जोडीपैकी एक ज्येष्ठ बंधू कल्याणजी यांचे निधन.

मित्रांनो, वरील लेखातील माहिती आपणास स्पर्धात्मक परीक्षेच्या दुष्टीने खूप महत्वाची आहे. तरी, आपण या लेखाचे वाचन करून आपल्या मित्रांना देखील पाठवा. धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top