जाणून घ्या २६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

 26 April Dinvishesh 

मित्रानो, आजचा दिवस हा भूतकाळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशी सन १९८६ साली युक्रेन देशातील चेर्नोबिल न्यूक्लियर प्लांट अणुभट्टी क्रमांक 4 या ठिकाणी झालेली परमाणु दुर्घटना मानवी इतिहासातील सर्वात मोठी परमाणु दुर्घटना आहे. या परमाणु दुर्घटनेतून उत्पन्न झालेले रेडिओ सक्रिय धर्मी पदार्थ हिरोशिमा आणि नागासाकी येथील हल्ल्यापेक्षा दहा पट जास्त असल्याचे दिसून आले. या दुर्घटनेत खूप मोठी हानी झाली होती. सुमारे साठ हजार लोकांना यातून बचावण्यात आले व दोन लाख लोकांना दुसऱ्या ठिकाणी विस्तारित करण्यात आलं होत. या दुर्घटनेचे स्मरण म्हणून २६ एप्रिल या दिवशी चेर्नोबिल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी लोकांचे स्वास्थ्य तपासले जाते

याशिवाय, आज वैश्विक संपदा अधिकार दिवस देखील आहे. एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेद्वारा रचित एखादी रचना, संगीत, साहित्य कला, शोध आदी “बौद्धिक संपदा” म्हणून ओळखण्यात येतात. परंतु, काही व्यक्ती दुसऱ्यांच्या अश्या प्रकारच्या रचनांची नक्कल करून तिला आपली रचना असल्याचे निर्देशित करतात. याला आला घालण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल या दिवशी विश्व बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसचं, आपण या लेखाच्या माध्यामतून काही महत्वपूर्ण व्यक्तींची माहिती (26 April Today Historical Events in Marathi) जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २६ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 26 April Today Historical Events in Marathi

26 April History Information in Marathi
26 April History Information in Marathi

२६ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 April Historical Event

 • इ.स. १६५४ साली यहुदी लोकांना ब्राझील देशातून बाहेर काढून देण्यात आलं.
 • सन १७५५ साली रुस देशातील पहिले विश्वविद्यालय राजधानी मॉस्को येथे उघडण्यात आले.
 • इ.स. १८४१ साली बॉम्बे गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्राची स्थापना मुंबई येथे करून त्यांचे वृत्तपत्राचे प्रकाशण सर्वप्रथम एका रेशमी कापडावर करण्यात आले.
 • सन १९०३ साली महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिली सुरु केली. तसचं त्यांनी त्या ठिकाणी ब्रिटीश इंडिया असोसिएशन ची स्थापना केली.
 • इ.स. १९५६ साली वृत्तपत्राकरिता लागणाऱ्या कागदाची निर्मिती करणाऱ्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वृत्तपत्र कागद कारखान्याचे उद्घाटन केले.
 • सन १९६२ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासा यांनी चंद्रावर पाठवलेले चांद्रयान रेंजर ४ हे चंद्रावर कोसळले.
 • इ.स. १९७० साली इजिप्त देशामध्ये असलेल्या सुएझ कालवा भागात पुन्हा एकदा चकमक सुरु झाली. तसचं, इजिप्त व इस्त्रायल देशांचे हवाई हल्ले सुरु झाले. एकमेकांविरुद्ध शत्रुत्व आणि विभागीय सत्ता संतुलन हक्क यासाठी सशस्त्र संघर्ष सुरु झाला.
 • सन २००८ साली जम्मू काश्मीर राज्यात निर्मित ३९० मेगावॅट क्षमता असलेला दुल हस्ती हायडल पॉवर प्रकल्प तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाला समर्पित केला.

२६ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 April  Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १४७९ साली कृष्णभक्तीचा वेगळा पंथ पुष्टीमार्ग स्थापन करणारे थोर पुरुष वल्लभाचार्य यांचा जन्मदिन.
 • सन १८६४ साली स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य तसचं, आर्य समाजातील प्रमुख पाच नेत्यांपैकी एक पण्डित गुरुदत्त विद्यार्थी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९४ साली जर्मन शासक अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे डेप्युटी फोरर रुडॉल्फ वॉल्टर रिचर्ड हेस यांचा जन्मदिन.
 • सन १९०० साली भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक रिक्टर स्केलची निर्मिती करणारे अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ  चार्ल्स फ्रांसिस रिक्टर यांचा जन्मदिन
 • इ.स. १९०८ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी (१३वे)  मुख्य न्यायाधीश सर्व मित्र सिकरी यांचा जन्मदिन.
 • सन १९५३ साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री मौसमी चटर्जी याचा जन्मदिन.
 • इ.स. १९८७ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्देशक, छायाचित्रकार व लेखक नितीन बोस यांचा जन्मदिन.

२६ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 April  Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९२० साली रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळविणारे महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन याचं निधन.
 • इ.स. १९२४ साली एकोणिसाव्या शतकातील महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या पहिल्या महिला हक्क कार्यकर्त्या व समाजसेविका तसचं, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांचे निधन.
 • इ.स. १९८२ साली प्रतिष्ठीत भारतीय हिंदी कवी, लेखक व आलोचक मलयज यांचे निधन.
 • सन १९८७ साली भारतीय संगीत निर्देशक शंकर रघुवंशी याचं निधन.
 • इ.स. १९९९ साली नेपाल देशाचे माजी पंतप्रधान व नेपाली कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष मनोहर अधिकारी याचं निधन.
 • सन २०१० साली राजस्थान राज्याच्या माजी राज्यपाल प्रभाराव याचं निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here