26 September Dinvishes
मित्रांनो, आज जागतिक मूक बधीर दिवस. दरवर्षी हा दिवस २६ सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. परंतु, वर्तमान काळात या दिवसाला विश्व मूक बधीर सप्ताहाच्या रूपाने ओळखले जाते. सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा मूक बधीर सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात सन १९५८ साली विश्व बधीर संघ (डब्ल्यूएफडी) ने केली.
याशिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी घडलेल्या सर्व ऐतिहासिक तसचं, आधुनिक घटनांची संपूर्ण माहिती. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती व निधन वार्ता या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 26 September Today Historical Events in Marathi

२६ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 September Historical Event
- सन १९३२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दलितांच्या हक्कासाठी पुकारलेल आमरण उपोषण सहा दिवस आणि पाच तासानंतर मागे घेतल.
- सन १९५० साली इंडोनेशिया देशाचा सयुक्त राष्ट्रात समावेश करण्यात आला.
- सन १९८४ साली युनायटेड किंग्डमने हॉंगकॉंगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.
- सन १९९० साली रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे एकविसावे न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
- सन २००१ साली सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक-संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
२६ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८२० साली भारतीय उपखंडातील थोर भारतीय समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ आणि उद्योजक तसचं, विधवा कायदा सार्थक ईश्वरचंद विद्यासागर यांचा जन्मदिन.
- इ.स.१८४९ साली चयापचय प्रक्रियेविषयी महत्वाचे संशोधन करणारे नोबल पारितोषिक विजेता रशियन फिजिओलॉजिस्ट इव्हान पेट्रोव्हिच पावलोव्ह(Ivan Pavlov) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८५८ साली भारतीय गुजराती भाषेचे लेखक, कवी, कादंबरीकार, निबंधकार, तत्वज्ञ, संपादक आणि समाजसुधारक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८८ साली अमेरिकन नोबल पारितोषिक विजेता कवी, निबंध लेखक, प्रकाशक, नाटककार, साहित्यिक समीक्षक आणि संपादक टी. एस. इलियट(T. S. Eliot) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९४ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा जन्मदिन.
- सन १९२३ साली प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देव आनंद यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली पूर्व भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्मदिन.
- सन १९३२ साली भारताचे माजी तेरावे पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्मदिन.
२६ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 September Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९५६ साली भारतीय उद्योजक व किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन.
- सन १९७७ साली पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक उदय शंकर यांचे निधन.
- सन १९८९ साली राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक व गायक हेमंतकुमार यांचे निधन.
- सन १९९६ साली महाराष्ट्रीयन राजकीय कार्यकर्ते, मराठी नाटककार व लोकसत्ता या मराठी वर्तमानपत्राचे संपादक विद्याधर एस. गोखले यांचे निधन.
- सन २००२ साली थोर महाराष्ट्रीयन मराठी संगीतकार व गायक राम फाटक यांचे निधन.