जाणून घ्या २७ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

27 April Dinvishesh 

मित्रानो, आजचा दिवस हा इतिहासकाळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे असे म्हणने चुकीचं ठरणार नाही,  आजच्या दिवशी इतिहासात लिखित मुघल शासन काळात तीन महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या. जसे की, मुघल शासक बाबर हे दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले होते. तसचं, मुघल बादशाहा जहांगीर यांनी आपला मुलगा खुसरो यांना आपल्या विरुद्ध बंड पुकारल्या प्रकरणी कैद केलं होतं, आणि तिसरी महत्वपूर्ण घटना म्हणजे मुघल बादशाहा मोहम्मद शाह याचं निधन.

याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या मध्यमातून आजच्या दिवशी देश विदेशात घडलेल्या काही महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आदी घटनांची संपूर्ण माहिती (27 April Today Historical Events in Marathi) आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २७ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 27 April Today Historical Events in Marathi

27 April History Information in Marathi
27 April History Information in Marathi

२७ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 April Historical Event

 • इ.स. १५२६ साली मुघल शासक बाबर यांनी दिल्लीवरील सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव केल्यानंत दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले होते.
 • सन १६०६ साली मुघल शासक बादशाहा जहांगीर यांचा मुलगा खुसरो यांनी आपले वडिल जहांगीर बादशाहा यांच्या विरुद्ध बंड पुकारल्यामुळे बादशाहने त्यांना कैद केले.
 • इ.स. १८७८ साली ब्रिटीशकालीन भारतात सर्वप्रथम कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्यास परवानगी दिली.
 • सन १९०८ साली लंडनमध्ये चौथ्यांदा ऑलम्पिक खेळ सुरु करण्यात आले.
 • इ.स. १९४१ साली द्वितीय युद्धादरम्यान जर्मन देशाच्या सेनेने अथेन्स देशांत प्रवेश केला.
 • सन १९६० साली भारतीय सशस्त्र सेना आणि भारतीय नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षिण देण्यासाठी नवी दिल्ली येथे नॅशनल डिफेन्स कॉलेजची स्थापना करण्यात आली.
 • इ.स. १९६१ साली अमेरीकेतील अंतराळ संस्था नासाने गॅमा किरणांचा अभ्यास करण्यासाठी ‘एक्सप्लोरर ११’ हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रक्षेपित केला.
 • सन १९६२ साली जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.
 • इ.स. २००५ साली एअर बेस निर्मित वाइड-बॉडी विमान ए-३८० हे जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान आहे. या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

२७ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 April  Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • सन १८२० साली इंग्लंड देशातील इंग्रज तत्वज्ञानी, जीवशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ तसचं, प्रख्यात शास्त्रीय उदारमतवादी राजकीय सिद्धांतवादी हरबर्ट स्पेंसर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८३ साली महाराष्ट्रीयन श्रेष्ठ नाटककार व लेखक भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांचा जन्मदिन.
 • सन १९१२ साली पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय अभिनेत्री, नर्तक व नृत्यदिग्दर्शिका जोहरा मुमताज सेगल यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२० साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सहकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामीण विकासाचे प्रणेते तसचं, भारतातील दुध उत्पादनात सुधारणा करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्य बद्दल “पांढऱ्या क्रांतीचे जनक” म्हणून आपली ओळख निर्माण करणारे मनीभाई भिमभाई देसाई यांचा जन्मदिन.
 • सन १९२७ साली अमेरिकन लेखिका, कार्यकर्त्या, नागरी हक्क नेत्या आणि मार्टिन लूथर किंग यांच्या पत्नी कोरेट्टा स्कॉट किंग यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९४७ साली उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा जन्मदिन.
 • सन १९४९ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व केरळ राज्याचे माजी राज्यपाल पी. सदाशिवम यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९७६ साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट समीक्षक आणि लेखक फैज़ल सैफ़ यांचा जन्मदिन.

२७ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 April  Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९३० साली भारताच्या केरळ राज्यातील प्रसिद्ध समाजसुधारक व पत्रकार टी.के. माधवन यांचे निधन.
 • इ.स. १९६० साली प्रख्यात भारतीय बंगाली लेखक, रसायनशास्त्रज्ञ, शब्दकोशशास्त्रज्ञ तसचं, हास्य आणि व्यंगात्मक लघुकथा लेखक राजशेखर बासू यांचे निधन.
 • सन १९८० साली भारतीय महाराष्ट्रातील उद्योगसमूह संस्थापक विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन.
 • इ.स. १९८९ साली जपानी उद्योगपती कॅनोसुके मत्सुशिता यांचे निधन.
 • सन २००९ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते झुल्फिकार अली शाह खान उर्फ फिरोज खान यांचे निधन.
 • इ.स. २०१७ साली साठच्या दशकातील सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता,  चित्रपट निर्माता आणि राजकारणी तसचं, पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघाचे माजी खासदार विनोद खन्ना यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here