जाणून घ्या २७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

27 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून २७ ऑगस्ट या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती, निधन वार्ता आणि त्यांचे कार्य या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. चाल तर पाहू काय काय घडलं होत आजच्या दिनी.

जाणून घ्या २७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 27 August Today Historical Events in Marathi

27 August History Information in Marathi
27 August History Information in Marathi

२७ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 August Historical Event

 • इ.स. १७८१ साली मैसूर शासक हैदर अली यांनी ब्रिटीश सरकारच्या इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी पोल्लीलूर ची लढाई लढली.
 • सन १९३९ साली जर्मन उड्डाण चाचणी वैमानिक एरीक वॉर्झझिट यांनी टर्बोजेटवर चालणाऱ्या जगातील पहिल्या जेट विमानाचे उड्डाण केली.
 • सन १९६२ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने शुक्र ग्रहाची तपासणी करण्यासाठी Mariner 2  हे यान प्रक्षेपित केले.
 • सन १९९९ साली सोनाली बॅनर्जी या आपली चार वर्षांची मेहनत पूर्ण करून देशातील पहिल्या सागरी अभियंता बनल्या.
 • सन १९९९ साली कारगिल संघर्षाच्या वेळी भारताने बंदी घातलेल्या पाकिस्तानी कैद्यांना  सोडून दिल.

२७ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८५४ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन कायदेपंडित, अभ्यासक, राजकीय कार्यकर्ता तसचं, लोकमान्य टिळक यांच्या निकटचे सहकारी ‘वऱ्हाडचे नवाब’ म्हणून प्रसिद्ध असणारे गणेश श्रीकृष्ण खापर्डे उर्फ दादासाहेब खापर्डे यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८५९ साली प्रसिद्ध भारतीय उद्योगपती व भारतात टाटा स्टील कंपनीचा पाया रचणारे टाटा समुहाचे प्रमुख दोराबजी टाटा यांचा जन्मदिन.
 • सन १९१० साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन इतिहासकार, विचारवंत, संशोधक लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ‘गॅझेटियर्स’ चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व सेतुमाधवराव पगडी यांचा जन्मदिन.
 • सन १९१९ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, संतसाहित्याचे अभ्यासक तसचं, राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व मराठी ज्ञानकोशाचे संपादन करणारे विनायक रा. करंदीकर यांचा जन्मदिन.
 • सन १९२५ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी रहस्यकथाकार व लेखक आणि नाटककार नारायण धरप यांचा जन्मदिन.
 • सन १९७२ साली भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू(रेसलर) द ग्रेट खली या रिंग नावाने परिचित दलीपसिंग राणा यांचा जन्मदिन.

२७ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 August Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९५५ साली आपल्या ‘महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित करणारे महाराष्ट्रीयन संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन.
 • सन १९७६ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंद यांचे निधन.
 • सन १९७९ साली ब्रिटीश कालीन भारतातील शेवटचे व्हॉईसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल तसचं, भारत देशाची फाळणी करून नवीन पाकिस्तान देशाची निर्मिती करणारे ब्रिटीश अधिकारी लुईस माउंटबेटन(Louis Mountbatten) यांचे निधन.
 • सन २००० साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेत्री मनोरमा वागले यांचे निधन.
 • सन २००६ साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संपादक आणि लेखक ऋषिकेश मुखर्जी यांचे निधन.

मित्रांनो, वरील लेखाचे लिखाण आम्ही विशेष करून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने केलं आहे. तरी आपण या लेखाच्या माध्यमातून २७ ऑगस्ट या दिवसाचे संपूर्ण दिनविशेष जाणून घेऊ शकता.

धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top