Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २८ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

28 October Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी आपल्या इतिहास काळात तसचं, आधुनिक काळात घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन तसचं, निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

जाणून घ्या २८ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 28 October Today Historical Events in Marathi

28 October History Information in Marathi
28 October History Information in Marathi

२८ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 October Historical Event

  • इ.स. १६३६ साली अमेरिकेत द कॉलेज ऑफ यु टावून नामक विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. समोर चालून याच महाविद्यालयाला हॉवर्ड महाविद्यालय म्हणून संबोधित केलं जाऊ लागलं.
  • इ.स. १८८६ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड(Grover Cleveland) यांनी फ्रान्सकडून भेट दिलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ चे औपचारिक अनावरण केले.
  • सन १९०४ साली पनामा आणि उरुग्वे या दोन देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • सन १९४८ साली स्वीझ रसायनशास्त्रज्ञ पॉल  मुलर यांना डी.डी. टी. नामक कीटकनाशक तयार केल्याप्रकरणी नोबल पारितोषिक पुरस्कार बहाल करण्यात आला.
  • सन १९६९ साली महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.

२८ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८६७ साली आयरिश वंशीय भारतीय स्वतंत्रता सेनानी, शिक्षक,लेखक, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य भगिनी निवेदिता यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९३ साली महाराष्ट्रीयन थोर मराठी कवी शंकर केशव कानेटकर उर्फ गिरीश यांचा जन्मदिन.
  • सन १९३० साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय उर्फ अंजान यांचा जन्मदिन.
  • सन १९५५ साली अमेरिकन बिझिनेस मॅग्नेट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, गुंतवणूकदार आणि समाजसेवी तसचं, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचा जन्मदिन.
  • सन १९५५ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय वंशीय अमेरिकन व्यावसायिक कार्यकारी महिला आणि पेप्सीकोच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांचा जन्मदिन.

२८ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28 October Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १६२७ साली भारतातील चौथे मुघल सम्राट जहांगीर उर्फ नूर-उद-दिन मुहम्मद सलीम यांचे निधन.
  • इ.स. १८११ साली महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याचे शासक तुकोजीराव होळकर यांचे पुत्र यशवंतराव होळकर यांचे निधन.
  • सन १९०० साली जर्मन विचारवंत तसचं,  भारतीय अभ्यासक आणि पाश्चिमात्य शैक्षणिक क्षेत्राचे संस्थापक मॅक्स म्युलर(Max Müller) यांचे निधन.
  • सन २०११ साली ज्ञानपीठ पुरस्कार तसचं, पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक व व्यंगचित्रकार श्रीलाल शुक्ल यांचे निधन.
  • सन २०१३ साली भारतीय हिंदी साहित्यिक व भारतातील हिंदी साहित्य चळवळीचे प्रणेते तसचं,  ‘एच.एन.एस.‘ या साहित्यिक मासिकाचे संपादक राजेंद्र यादव यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved