Monday, September 18, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ३ मे रोजी येणारे दिनविशेष

3 May Dinvishes

मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजचा दिवस हा इतिहास काळात घडलेल्या कोणकोणत्या घटनेचा साक्षीदार आहे! ते आपण जाणून घेऊया. आज सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक व पटकथा लेखक तसचं, सिनिमा उद्योगाचे जनक दादासाहेब फाळके यांनी आपला पहिला मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित केला होता. भारतात चित्रपट शेत्राला सुरवात करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होत. आज त्यांच्या नावाने चित्रपट क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार, दिग्दर्शक व निर्मात्यांना दादासाहेब पुरस्कार देखील देण्यात येतो.

याव्यतिरिक्त आपण काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन, शोधकार्य आदि घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ३ मे रोजी येणारे दिनविशेष – 3 May Today Historical Events in Marathi

3 May History Information in Marathi

३ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 May Historical Event

  • इ.स. १९१३ साली प्रख्यात भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक तसचं, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक व पटकथा लेखक धुंडाईज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांनी आपला राजा हरिश्चंद्र हा पहिला मूक चित्रपट प्रदर्शित करून भारतीय चित्रपट उद्योगाची सुरुवात केली.
  • सन १९४७ साली आंतरराष्ट्रीय व्यापार संघ संघटनेशी संबंधित भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची कामगार संघटना इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेसची स्थापना करण्यात आली.
  • सन १९४७ साली दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर मित्रराष्ट्र जपान ने आपले नवीन संविधान लागू केले.
  • सन १९६१ साली अमेरिकन अंतराळवीर, नौदल उड्डयनकर्ता, चाचणी पायलट आणि व्यावसायिक एलन बार्टलेट शेपर्ड हे अंतराळात जाणारे पहिले अमेरिकन यात्री ठरले.
  • सन १९७३ साली शिकागो येथील १४५१ फुट उंच असलेली “सिअर्स टॉवर” ही त्याकाळातील जगातील सर्वात उंच इमारत ठरली.
  • सन २००८ साली भारतीय टाटा स्टील लिमिटेड कंपनीला ब्रिटन देशांतील कोळसा खाण घेण्याचा पहिला परवाना मिळाला.

३ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय मुत्सद्दी, राष्ट्रवादी व राजकारणी तसचं, भारताचे माजी संरक्षण मंत्री वेंगालील कृष्णन कृष्ण मेनन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९८ साली मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा आणि संवादलेखक भालजी पेंढारकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९८ साली इजराईल देशाच्या चौथ्या पंतप्रधान, शिक्षिक व राजकारणी गोल्डा मायर यांचा जन्मदिन.
  • सन १९३० साली भारतीय राज्य राजस्थान येथील विधानसभेच्या प्रथम महिला अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुमित्रा सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९५१ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेता व राजस्थान राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा जन्मदिन.
  • सन १९५९ साली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तसचं, माजी भारतीय जल संसाधन, नदी विकास आणि गंगा सफाई मंत्री व मध्यप्रदेश राज्याच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा जन्मदिन.

३ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3  May Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९६९ साली भारतीय सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न सन्मानित भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती व राष्ट्रपती, तसचं, भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी व बिहार राज्याचे माजी राज्यपाल डॉ. झाकीर हुसेन खान यांचे निधन.
  • सन १९७१ साली भारतीय अर्थशास्त्रज्ञ, संस्थापक आणि भारतीय नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन.
  • सन १९७७ साली भारतीय महाराष्ट्रीयन समाजसुधारक, विचारवंत, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक लेखक तसचं, मुस्लीम सत्यशोधक समाजाचे संस्थापक हमीद दलवाई यांचे निधन.
  • सन १९७८ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी, लेखक व शिक्षणतज्ञ वी.द. घाटे यांचे निधन.
  • सन १९८१ साली साठच्या दशकातील प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्या नर्गिस दत्त यांचे निधन.
  • सन १९९६ साली महाराष्ट्रीयन मराठी व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचे निधन.
  • सन २००० साली प्रख्यात भारतीय लेखिका व कुटुंब नियोजनासाठी महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन
  • सन २००२ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतातील दुसर्‍या क्रमांकाची हॉटेल कंपनीचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष व भारतीय उद्योगपती राय बहादूर मोहनसिंग ओबेरॉय यांचे निधन.
  • सन २००५ साली भारतीय सेना कमांडर जगजितसिंह अरोडा यांचे निधन.
  • सन २००९ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी वक्ते, लेखक आणि साहित्यिक समिक्षक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन.
  • सन २०११ साली सुप्रसिद्ध मराठी चित्रपटसृष्टीतील साहित्यिक आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन.
Previous Post

दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा वापर करतात हे पाच देश जाणून घ्या या लेखातून.

Next Post

जाणून घ्या, मतदान करताना बोटाला लावण्यासाठी ‘हीच’ शाई का वापरली जाते 

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Voting Ink or Election Ink

जाणून घ्या, मतदान करताना बोटाला लावण्यासाठी 'हीच' शाई का वापरली जाते 

what is in the briefcase of Prime Minister bodyguards

ह्या गोष्टींमुळे पंतप्रधानांसाठी असलेले सिक्युरिटी गार्ड ठेवतात त्यांच्याजवळ काळी ब्रिफकेस, काय असते त्या ब्रिफकेस मध्ये जाणून घ्या या लेखातून.

Difference Between White and Red Cricket Ball

क्रिकेटच्या लाल आणि पांढऱ्या बॉल मध्ये काय अंतर आहे? जाणून घ्या या लेखातून.

Difference between Natural Mineral Water and Packaged Drinking Water

तुम्ही जे पाणी विकत घेत आहे ते नेचुरल मिनरल वाटर आहे कि पॅकेज ड्रिंकिंग वाटर कसं ओळखणार 

4 May History Information in Marathi

जाणून घ्या ४ मे रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved