जाणून घ्या ३ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

3 September Dinvishes

मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आजच्या दिवसाचे संपूर्ण दिनविशेष या ठिकाणी पाहणार आहोत. प्रत्येक दिवस हा त्या दिवशी घडलेल्या घटनांसाठी महत्वाचा असतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना आपण इतिहास म्हणतो. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा लेख खूप महत्वाचा असल्याने आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे.

जाणून घ्या ३ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 3 September Today Historical Events in Marathi

3 September History Information in Marathi
3 September History Information in Marathi

सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 September Historical Event

 • सन १९२१ साली बेल्जियम देशांत कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली.
 • सन १९३९ साली जर्मन सम्राट हिटलर यांच्या पोलंड, ब्रिटन आणि फ्रान्सवर केलेल्या हल्ल्याला प्रती उत्तर म्हणून, सत्ता गाजविलेल्या राष्ट्राच्या दोन्ही मित्रपक्षांनी जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली.
 • 1971 रोजी कतारने आपले स्वातंत्र्य घोषित केले.
 • सन २००४ साली भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यात या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात नाजूक शांतता वाढत असताना, भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्ली येथे बैठक घेऊन शांततेचा करार केला.
 •  २०१८ साली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेल्या “मुव्हिंग ऑन मुव्हिंग फोरवर्ड : ए इयर इन ऑफिस” या पुस्तकाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 • सन २०१९ साली भारतातील मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या शहरात सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात वीर धवल खाडे व दिव्या सतीजा यांनी राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १६१७ साली मुघल सम्राट शाहजहां आणि त्यांची पत्नी मुमताज महल यांची दुसरी मुलगी रोशनारा बेगम यांचा जन्मदिन.
 • सन १९०५ साली भारतीय राजकारणी, लेखक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक कमलापती त्रिपाठी यांचा जन्मदिन.
 • सन १९२३ साली संगीत नाटक अकादमी तसचं पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जन्मदिन.
 • सन १९२३ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्यातील सुप्रसिद्ध तबला वादक पंडित किशन महाराज यांचा जन्मदिन.
 • सन १९२६ साली भारतीय बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचा जन्मदिन.
 • सन १९५७ साली भारतीय योग गुरु व सद्गुरू नावाने प्रख्यात ईशा फाउंडेशनचे संस्थापकजग्गी वासुदेव यांचा जन्मदिन.
 • सन १९७६ साली भारतीय चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय यांचा जन्मदिन.
 • सन १९९२ साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय कुस्तीपटू महिला साक्षी मलिक यांचा जन्मदिन.

सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 september Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १६५८ साली इंग्रज सेनापती व राजकारणी ऑलिव्हर क्रोमवेल यांचे निधन.
 • सन १९५३ साली प्रसिद्ध भारतीय तबला वादक व संगीतकार लक्ष्मण पर्वतकर उर्फ खाप्रुमामा पर्वतकर यांचे निधन.
 • सन १९५८ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी निसर्ग कवी माधव केशव काटदरे यांचे निधन.
 • सन १९६७ साली वार्ताहर संपादक अनंत हरि गंद्रे उर्फ समतानंद यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top