जाणून घ्या ३० जून रोजी येणारे दिनविशेष

 30 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती, तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्ती, तसचं, निधन पावणारे व्यक्ती, शोधकार्य इत्यादी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजचा दिवस हा जागतिक उपग्रह दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सन १९०८ साली संयुक्त राष्ट्र संघाने सायबेरियन तुंगुस्का कार्यक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त ३० हा दिवस दरवर्षी जागतिक लघुग्रह दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवील आहे. आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे लघुग्रह हे अस्तिवात आहेत.

जाणून घ्या ३० जून रोजी येणारे दिनविशेष – 30 June Today Historical Events in Marathi

30 June History Information in Marathi
30 June History Information in Marathi

३० जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 June Historical Event

 • सन १९३७ साली जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ सर्वप्रथम लंडन देशांत सुरु करण्यात आला.
 • सन १९४४ साली मुंबई येथील सेन्ट्रल चित्रपट गृहात प्रभात कंपनीचा रामशास्त्री हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
 • सन १९६० साली  काँगो देशाला बेल्जियम देशापासून मुक्त करण्यात आलं.
 • सन १९६५ साली भारत व पाकिस्तान देशांत कच्छचा करार करण्यात आला.
 • सन १९६६ साली अमेरीकेतील सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑर्गनाइजेशन फॉर वुमेनची स्थापना करण्यात आली.
 • सन १९६६ साली कोका सुब्बा राव यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ९ वे न्यायाद्धीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 • सन १९७१ साली सोयुझ ११ या रशियन अंतराळयानात बिघाड झाल्याने तीन अवकाश वीर ठार झाले.
 • सन २००० साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन(Bill Clinton) यांनी अमेरिकेत डीजीटल हस्ताक्षर करण्यास वैध रित्या परवानगी दिली.

३० जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • सन १९२८ साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीतकार कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शाह यांचा जन्मदिन.
 • सन १९०३ साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्षाचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचा जन्मदिन.
 • सन १९११ साली साहित्य अकादमी चे फेलोशिप प्राप्त भारतीय साहित्यकार नागार्जुन यांचा जन्मदिन.
 • सन १९१९ साली हॉट एअर बलूनचे जनक अमेरिकन संशोधक पॉल एडवर्ड वेस्ट( Edward Paul)  यांचा जन्मदिन.
 • सन १९३४ साली भारत रत्न, भारत विज्ञान पुरस्कार, कर्नाटक रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सी. एन. आर. राव यांचा जन्मदिन.
 • सन १९४३ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन पटकथा लेखक आणि दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांचा जन्मदिन.
 • सन १९६६ साली प्रसिद्ध अमेरिकन सेवानिवृत्त मुष्टीयोद्धा माइक टायसन(Mike Tyson) यांचा जन्मदिन.
 • सन १९६९ साली श्रीलंकन देशाचे महान सेवानिवृत्त क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांचा जन्मदिन.

३० जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 June Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८५७ साली शाही डोगरा राजवंशाचे संस्थापक आणि जम्मू-काश्मीर राज्याचे पहिले महाराजा तसचं, ब्रिटीश भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे रियासतदार महाराजा गुलाबसिंह जामवाल यांचे निधन.
 • सन १९१७ साली “ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय पारशी विद्वान, व्यापारी आणि राजकारणी तसचं, भारतीय लिबरल पक्षाचे सदस्य दादाभाई नौरोजी यांचे निधन.
 • सन १९१९ साली नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ जॉन विलियम्स स्ट्रट रेले(John William Strutt) यांचे निधन.
 • सन १९९४ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी नाटककार, कवी, अभिनेता आणि दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन.
 • सन १९९९ साली काव्याविष्काराचा प्रत्यय घडविणारे महान मराठी काव्यसृष्टीतील कवी कृ.ब. निकुंब यांचे निधन.
 • सन २००७ साली भारतीय राजकारणी व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे निधन.
 • सन २००८ साली भारतीय पंजाब राज्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक आणि राजकारणी केवल कृष्ण यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top