Monday, September 25, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ३० सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

30 September Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या तसचं निधन पावणाऱ्या महान व्यक्तींबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या मध्यमातून जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन. सन १९९१ पासून दरवर्षी, ३० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन साजरा केला जात असतो. कारण, बायबल या ख्रिस्ती ग्रंथाचे हिब्रू भाषेतून लॅटीन भाषेत भाषांतर करणारे संत जेरोम, ह्यांना आद्य भाषांतरकार म्हटले जाते. त्यांच्या स्मृतीदिनी (फिस्ट ऑफ द सेंट), म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी, हा जागतिक भाषांतर दिन साजरा केला जात असतो. सन १९५३ साली भाषांतरकारांची आंतरराष्ट्रीय संघटना (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्स्लेटर्स)  ची स्थापना झाल्यापासून हा दिवस साजरा केला जातो.

जाणून घ्या ३० सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 30 September Today Historical Events in Marathi

30 September History Information in Marathi
30 September History Information in Marathi

३० सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 September Historical Event

  • सन १९४७ साली स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पाकिस्तान देशाने सयुक्त राष्ट्रात समावेश केला.
  • सन १९९३ साली महाराष्ट्र राज्यातील मराठवाड भागाच्या लातूर जिल्ह्यात भीषण भूकंप झाला.
  • सन १९९४ साली भारतीय गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकर द्याळ यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सन २०१९ साली बिहार राज्यात झालेल्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
  • सन २०१९ साली एअर चीफ मार्शल आर. के. एस भदोरिया यांनी वायुसेना दलाचे प्रमुख पद सांभाळले.

३० सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८३७ साली भारतीय हिंदी आणि पंजाबी भाषिक साहित्याचे लेखक व समाजसुधारक तसचं, “आधुनिक पंजाबी गद्याचे जनक” पंडित श्रद्धाराम शर्मा यांचा जन्मदिन.
  • सन १९०० साली प्रसिद्ध भारतीय न्यायाधीश, भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, संपादक आणि लेखक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्मदिन.
  • सन १९३३ साली महाराष्ट्रीयन मराठी संगीतकार व व्हायोलिन वादक प्रभाकर पंडित यांचा जन्मदिन.
  • सन १९६१ साली माजी भारतीय क्रिकेटपटू चंद्रकांत सीताराम पंडित यांचा जन्मदिन.
  • सन १९७२ साली प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक शान उर्फ शंतनु मुखर्जी यांचा जन्मदिन.
  • सन १९८० साली स्वित्झर्लंड देशाच्या महान निवृत्त टेनिसपटू मार्टिना हिंगीस(Martina Hingis) यांचा जन्मदिन.

३० सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९१४ साली प्रख्यात भारतीय उर्दू कवी आणि लेखक अल्ताफ हुसैन हाली यांचे निधन.
  • सन १९४३ साली कलकत्ता शहरावर आधारित मासिक मॉडर्न रिव्ह्यूचे संस्थापक, संपादक आणि मालक तसचं, हिंदू महासभेचे नेता आणि भारतीय पत्रकारितेचे जनक रामानंद चटर्जी यांचे निधन.
  • सन १९९२ साली ‘अर्वाचीन मराठी वाड़्‍मय सेवक’ या कोशाचे सात खंड प्रकाशित करणारे महान महाराष्ट्रीयन मराठी लेखक व चरित्रकार गंगाधर देवराव खानोलकर यांचे निधन.
  • सन १९९४ साली प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक कवयित्री व लेखिका सुमित्रा कुमारी सिन्हा यांचे निधन.
  • सन १९९८ साली महाराष्ट्रीयन भूदान चळवळीच्या कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.
  • सन २००१ साली केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन.
Previous Post

ऑस्ट्रेलियन जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळजवळ 3 अब्ज प्राणी प्रभावित

Next Post

…अश्या प्रकारे झाली फोन वर हॅलो बोलण्याची सुरुवात. हॅलो हॅलो!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Origin of the Word Hello

...अश्या प्रकारे झाली फोन वर हॅलो बोलण्याची सुरुवात. हॅलो हॅलो!

1 October History Information in Marathi

जाणून घ्या १ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Black Hole Information

ब्लॅक होल (कृष्ण विवर) बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी

Navnath Mantra

नवनाथ महाराजांचा मंत्र

2 October History Information in Marathi

जाणून घ्या २ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved