Sunday, June 4, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

लातुर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Latur Jilha Mahiti

महाराष्ट्राच्या आग्नेय आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ वसलेला लातुर जिल्हा! महाराष्ट्रातील सर्वात मोठया जिल्हयातील १६ व्या क्रमांकाचा जिल्हा लातुर मराठवाडयातील एक महत्वाचा जिल्हा लातुर!

शिक्षणाकरता लातुर पॅटर्न हे नाव प्रसिध्दच आहे. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद विभागात लातुर हा एक महत्वाचा जिल्हा! या जिल्हयाला नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि कर्नाटक राज्यातला बिदर हा जिल्हा जोडलेला आहे.

या शहराला प्राचीन इतिहास देखील लाभला आहे पुर्वी हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी असल्याचे सांगितल्या जाते. पुढे अनेक राज्यकत्र्यांच्या ताब्यात जाऊन साधारण 19 व्या शतकात हैदराबाद संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ ला हा भाग देखील स्वतंत्र झाला आणि पुढे १९६० दरम्यान महाराष्ट्रात आला. पुढे १६ ऑगस्ट १९८२ ला लातुर उस्मानाबाद जिल्हयाच्या विभाजनानंतर जिल्हा म्हणुन अस्तित्वात आला. एकुण लोकसंख्येपैकी मोठा वर्ग शेतीवर अवलंबुन आहे.

लातुर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Latur District Information in Marathi

लातुर जिल्हयातील तालुके – Latur District Taluka List

या जिल्हयात एकुण १० तालुके आहेत

  • लातुर
  • अहमदपूर
  • उद्गीर
  • औसा
  • चाकूर
  • देवणी
    निलंगा
  • रेणापूर
  • शिरूर
  • जळकोट

लातुर जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Latur Jilha Chi Mahiti

  • लोकसंख्या २४,५५,५४३
  • क्षेत्रफळ ७,१५७ वर्ग कि.मी.
  • साक्षरतेचे प्रमाण ७९.०३%
  • १००० पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९२४
  • राष्ट्रीय महामार्ग क्र.३६३ आणि क्र.६१ या जिल्हयातुन गेला आहे.
  • पुर्वी राज्य करणारा राष्ट्रकुट राजा दंतीदुर्ग लट्टालुर त्यावरूनच आजचे नाव लातुर असावे.
  • लातुर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या सिमेवर असल्याने लोक मराठी या भाषे व्यतिरीक्त कन्नड आणि तेलगु भाषा सहज बोलतात.
  • महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख लातुरचेच, भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील देखील लातुरचे.
  • कै.केशवराव सोनवणे हे नवनिर्वाचीत महाराष्ट्र राज्यातले लातुरचे पहिले आमदार शिवाय त्यांच्या रूपानं लातुरला प्रथमच सहकारमंत्रीपद मिळालं.
  • लातुर पॅटर्न संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असुन विशेष प्रशिक्षण आणि व्यवस्थीत कोचिंग यामुळे नावारूपाला आले.
  • गेल्या काही वर्षांमधे लातुर शिक्षणाच्या नवनवीन क्षेत्रामुळे विध्यार्थ्यांना आकर्षीत करते आहे.
  • लातुर सध्या उभरते औद्योगिक केंद्र म्हणुन प्रसिध्दीस येत आहे. येथे चांगल्या गुणवत्तेच्या डाळी होत असल्याने आणि साखर कारखाने असल्याने उद्योगांमधे चांगली प्रगती साधली आहे.
  • लातुर मधे उडीद, मुग, हरभरा, तुरडाळीचे प्रमुख व्यापार केंद्र आहे.
  • या ठिकाणी पीतळाच्या धातुपासुन भांडी बनवण्याचा व्यवसाय आज देखील सुस्थितीत आहे. शिवाय कुलुपं देखील या ठिकाणी बनवली जातात.
  • तेलबियांमधे मुख्यतः सुर्यफुल, सोयाबिन, करडई ही पिकं घेतली जातात.
  • १९९३ साली आलेल्या विनाशकारी भुकंपाने नेस्तनाबुत झालेले लातुर, हादरलेले लातुर त्या भयावह आठवणी आज विसरू पाहात आहे.
  • मध्यरात्री साधारण ०३:५६ वाजता आलेल्या त्या विनाशकारी भुकंपात जवळपास ३०,००० लोक मृत्युमुखी पडले होते.
  • मध्यरात्री भुकंप आल्याने लोक झोपेत असल्याने मृतांचा आकडा वाढला.
  • लातुर बस सेवा आणि रेल्वे सेवेने इतर गावं आणि शहरांशी जोडले गेले आहे.

लातुर जिल्हयातील पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places to Visit in Latur

जगदंबा माता मंदिर गंजगोलाई – Jagadamba Mata Temple Ganjgolai

राष्ट्रकुटांच्या काळातले हे मंदिर लातुर वासियांचे आराध्य दैवत आहे. तुळजापुर च्या भवानीचे हे प्रतीरूप मानल्या जाते. लातुर वासियांची या देवी प्रती निस्सीम भक्ती असुन या मंदीरात दर्शनाकरता नेहमीच गर्दी पहायला मिळते.

नवरात्राच्या दिवसांमधे या ठिकाणी पारंपारीक वस्तुंचा आणि वेगवेगळया खाद्यपदार्थांचा बाजार लोकांना आकर्षीत करतो.
काळया पाषाणातील देवीची अतिशय देखणे कोरीव काम केलेली ही मुर्ती पाहाताक्षणीच लक्ष वेधुन घेते, देवीच्या मुर्ती व्यतीरिक्त या ठिकाणी गणपतीची आणि शंकराची मुर्ती देखील विराजमान आहे.

मंदिराच्या आत आरश्याचे नक्शीकाम अत्यंत सुबक आणि सुंदर असुन भाविक कितीतरी वेळ या कलाकुसरीकडे पाहात राहातात.

सिध्देश्वर आणि रत्नेश्वर मंदिर लातुर – Siddeshwar and Ratneshwar Temple Latur

लातुर शहरापासुन साधारण २ कि.मी. अंतरावरच म्हणजे लातुर शहराला लागुन असलेले सिध्देश्वर आणि रत्नेश्वर मंदिर लातुर शहराचा प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा आहे.

ताम्रव्दज राजाने यां मंदिराची निर्मीती केली असल्याचे सांगितले जाते.

सोलापुरच्या भगवान सिध्देश्वर स्वामी सिध्दरामांना हे मंदिर समर्पीत करण्यात आले आहे.

ते हिंदु धर्मातील लिंगायत समाजातील एक भविष्यवेत्ता म्हणुन सुपरीचीत होते. ते एक आध्यात्मिक विभुती आणि कवी देखील होते , कुल्ला कदिगी या समुदायाशी संबधीत असलेल्या या विभुतींनी १२ व्या शतकात कन्नड भाषेत अनेक कविता आणि कवणं लिहीलीत.

श्री केशव बालाजी मंदिर औसा तालुक्यात तयार करण्यात आलेले हे श्री केशव बालाजी मंदिर आज लातुर जिल्हयाचे वैभव बनु पाहात आहे.

अतिशय पवित्र वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर पाहाण्याकरता आणि दर्शनाकरता असंख्य भाविक रोज या ठिकाणी येत असतात.

काळया पाषाणातील श्री केशव बालीजीची मुर्ती अतिशय रेखीव आणि सुरेख असुन मन मोहुन घेते.

रोज प्रातःकाळी या मुर्तीला पंचामृताचे स्नान मंत्रोच्चारात घालण्यात येते तो अमृत जलाभिषेक डोळयाचे पारणे फेडणारा आहे.
महाराष्ट्रातील बसलेली हनुमानाची सर्वात मोठी आणि भव्य मुर्ती या ठिकाणी विराजमान आहे. श्री गणेशाची, विठ्ठल रूक्मिणीची, केशवनंद बापुंची अतिशय रेखीव मुर्ती या ठिकाणी आहे.

मंदिर दर्शनाकरता रोज सकाळी सहा वाजता खुले होते ते रात्री ९ वाजेपर्यंत! बाहेरगावावरून येणा.या दर्शनार्थीं करता सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अन्नदान होते.

अतिशय विस्तिर्ण परिसरात नियोजन पुर्वक उभारण्यात आलेल्या या मंदिरातुन भाविकाला माघारी फिरावेसे वाटत नाही असे वातावरण या मंदिरात आहे.

अष्टविनायक मंदिर – Ashtavinayak Temple

शहरातील अष्टविनायक मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. भगवान गणेशाच्या मुर्ती व्यतिरीक्त येथे अष्टविनायकाच्या मुर्ती देखील विराजमान आहेत या मंदिराच्या आजुबाजुला बाग असुन कारंजे देखील आहेत त्यामुळे लहानांपासुन मोठयांपर्यंत सर्वांनाच हे ठिकाण आकर्षीत करत असतं.

मंदिरा समोर जवळपास १० फुट उंचीची भगवान शंकराची मुर्ती विराजमान आहे शिवाय नवग्रह, विठ्ठल रूक्मिीणी, हनुमान, शेषनाग, आणि देवी सरस्वती च्या मुर्ती देखील येथे स्थापण्यात आल्या आहेत. संध्याकाळच्या वेळेस येथे विशेष गर्दी होते.

उद्गीर किल्ला – Udgir Fort

उद्गीर चा किल्ला ऐतिहासिक लढाईकरता प्रसिध्द आहे, सदाशिव भाऊंच्या नेतृत्वात मराठयांनी निजामांना या ठिकाणी हरवले होते या ठिकाणी शत्रुला दुरूनच हेरण्याकरता कितीतरी अवलोकन बिंदु आहेत, आजुबाजुच्या डोंगरांवर अनेक भग्न अवस्थेतील पांढऱ्या मातीने बनलेली घरं दिसतात, उद्गिर किल्ल्यात लांब सुरंग जी बिदर ला जाउन मिळते ती असल्याचे देखील बोलले जाते.

किल्ल्याच्या बाजुलाच जवळपास ४० फुट खोल दरी आहे शिवाय यात बरेच महल आणि उदयगीर महाराजांची समाधी देखील आहे जी जमीनीच्या ६० फुट खाली आहे या ठिकाणी अरबी आणि फारशी भाषेत लिहीलेले काही दुर्लभ शिलालेख देखील आढळतात.

याशिवाय विराट हनुमान मंदिर, गौरी शंकर, साई मंदिर, केशवराज मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, कालिका देवी मंदिर, गजानन महाराज मंदिर ही मंदिरं.

बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाना नानी पार्क, आजी आजोबा पार्क हे बगीचे.

दगडोजी राव देशमुख नाटयगृह, दयानंद नाटयगृह, अशी धार्मीक आणि करमणुकीची ठिकाणं देखील लातुर जिल्हयात आहेत.

तर हि होती लातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आशा करतो आपल्याला आवडली असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Previous Post

सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

Next Post

हिमाचली सब्जी रेसिपी

Editorial team

Editorial team

Related Posts

विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Himachali Sabji

हिमाचली सब्जी रेसिपी

Nandurbar District Information in Marathi

नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती

19 March Today Historical Events in Marathi

जाणून घ्या १९ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Prabodhankar Thackeray in Marathi

प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवनचरित्र

Malai Paneer Tikka Recipe

स्वादिष्ट पनीर मलाई टिक्का बनवण्याची रेसिपी - Tasty Malai Paneer Tikka recipe in Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved