जाणून घ्या ४ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

4 April Dinvishesh

मित्रानो, ऐतिहासिक घटनेच्या दृष्टीने आजचा दिन खूपच महत्वाचा आहे. इ.स. १८५८ साली झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य उठावादरम्यान उत्तर प्रदेशमधील झाशी येथील उठावाचे नेतृत्व मराठा रियासतेच्या शासिका राणी लक्ष्मीबाई यांनी केले होते. या युद्धात इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाई राहत असलेल्या किल्ल्याला वेढा दिला होता. त्यावेळी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी किल्ल्यातून सुरक्षितपणे बाहेर येऊन काल्पी व नंतर ग्वाल्हेर या ठिकाणी पोहचल्या. इ.स. १८५७ साली झालेला स्वातंत्र्य उठाव हा पहिला स्वातंत्र्य उठाव होता. तसचं, इतिहासात झालेला सर्वात मोठा उठाव होता.

याशिवाय, सन १९४४ साली आजच्या दिवशी ‘द बॅटल ऑफ कोहिमा’ देखील झालं होत. तसचं, आज संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. ४ एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिनानिमित्त लोकांमध्ये लैंडमाइन्स संरक्षण जागरूकता, आरोग्य आणि जीवन याबाबत लोकांना माहिती दिली जाते. सन ४ एप्रिल २००६ साली आंतरराष्ट्रीय खदान जागरूकता आणि खदान कार्य मदत दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे ठरविले.

याव्यतिरिक्त महत्वपूर्ण व्यक्ती जन्म, मृत्यू, शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती (4 April Today Historical Events in Marathi) आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

जाणून घ्या ४ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 4 April Today Historical Events in Marathi

4 April History Information in Marathi

४ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 April Historical Event

 • इ.स. १८५८ साली स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान झाशी येथील शशिका राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रजांन विरुद्ध लढतांना किल्ला सोडावा लागला.
 • सन १८८२ साली पूर्व लंडनमध्ये इलेक्ट्रिक ट्राम सेवा देण्यास प्रारंभ झाला.
 • इ.स. १९०५ साली भारतातील पंजाब राज्याच्या कांगडा या गावी भीषण भूकंप होऊन त्यामध्ये २०००० हून अधिक लोक ठार झाले होते.
 • सन१९४९ साली पश्चिम युरोपियन राष्ट्र व उत्तर अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये संरक्षणविषयक करार म्हणजेच उत्तर अटलांटिक करार (‘नाटो’ करार) वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये करण्यात आला. पश्चिम युरोपातील अकरा देश व अमेरिका अश्या १२ देशांमध्ये हा करार झाला.
 • इ.स. १९६८ साली अमेरिकन ख्रिश्चन मंत्री व कार्यकर्ते मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांची जेम्स अर्ल रे यांनी हत्या केली.
 • सन १९६८ साली अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा ने आपले अपोलो-६ हे अंतराळ यान प्रक्षेपित केले.
 • इ.स. १९७९ साली पाकिस्तान पीपल्स पक्षाचे संस्थापक व पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना फाशीची सजा देण्यात आली.
 • सन १९९० साली भारतीय गान कोकिळा पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना चित्रपट क्षेत्रांत असामान्य कामगिरी करिता दिल्या जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार दादा साहेब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

४ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • सन १८८९ साली पद्मभूषण व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारतीय कवी, लेखक, निबंधकार, नाटककार आणि पत्रकार पंडित माखनलाल चतुर्वेदी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९०२ साली ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचा जन्मदिन.
 • सन १९२६ साली अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती तसचं, अ‍ॅमवेचे सह-संस्थापक आणि ऑरलँडो मॅजिक बास्केटबॉल संघाचे मालक रिचर्ड मारव्हीन डेवोस यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९३३ साली माजी भारतीय डावखुरे गोलंदाज क्रिकेटपटू रामचंद्र गंगाराम नाडकर्णी उर्फ बापू नाडकर्णी यांचा जन्मदिन.
 • सन १९३८ साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि संशोधक आनंद मोहन चक्रवर्ती यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९४९ साली प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री परवीन बॉबी यांचा जन्मदिन.

४ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 April Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १६१७ साली स्कॉटिश गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ जॉन नेपियर यांचे निधन.
 • सन १८३४ साली गणितज्ञ, तर्कशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी जॉन वेन यांचे निधन.
 • इ.स. १९२९ साली मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेंझ यांचे निधन.
 • सन १९६८ साली अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या करण्यात आली.
 • इ.स. १९८७ साली ज्ञानपीठ पारितोषिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय हिंदी भाषिक लेखक,कवी, कादंबरीकार, साहित्यिक समीक्षक, पत्रकार, अनुवादक आणि हिंदी भाषेतील क्रांतिकारक सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांचे निधन.
 • सन १९९५ साली भारतीय समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक, स्वातंत्र्य कार्यकर्ता, स्त्रीवादी आणि भारतीय लेखक हंसा मेहता यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here