Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ६ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 6 August Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहास काळात घडलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार आहे. सन १९४५  साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जपान ने केलेल्या हल्ल्याच्या बदल्यात अमेरिकेने जपानची औद्योगिक नागरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरोशिमा शहरावर  ‘लिटल बॉय’ नावाचा युरेनियम बॉम्ब टाकला. या बॉम्बचा प्रभाव सुमारे १३ चौ.किमी. पर्यंत जाणवला. या हल्ल्यात लाखो लोक मृत्युमुखी पडले. त्यात बहुतेक सामान्य नागरिक, मुले, म्हातारे आणि स्त्रिया मरण पावल्या होत्या. युरेनियमचे कन हवेत पसरल्यामुळे तेथिल असंख्य जनता मरण पावली. जगाच्या इतिहास काळात झालेली ही सर्वात मोठी दु:खद घटना होती. याच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा हिरोशिमा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

जाणून घ्या ६ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 6 August Today Historical Events in Marathi

6 August History Information in Marathi
6 August History Information in Marathi

६ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 August Historical Event

  • सन १९१४ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान ऑस्ट्रिया देशाने रुस देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली.
  • सन १९१४ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान सर्बियाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • सन १९४० साली सोवियत युनियनने इस्टोनियावर बेकायदेशीरपणे ताबा मिळविला.
  • सन १९४५ साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अमेरिकेने जपानच्या होरीशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला.
  • सन १९६२ साली जमैका राष्ट्राला युनायटेड मिळाले.जमैकामध्ये ही तारीख स्वतंत्र दिवस म्हणून साजरी केली जाते.
  • सन १९९० साली इराकने कुवेत बळकवल्या प्रकरणी सुरक्षा परिषदेने इराकबरोबरच्या व्यापारावर जागतिक बंदी घातली.
  • सन १९९४ साली डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

६ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. ११८० साली जपानचे 82 वा सम्राट गो-तोबा(Emperor Go-Toba) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८१ साली नोबल पारितोषिक विजेता स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  आणि औषधनिर्माणशास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग (Alexander Fleming)यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली प्रसिद्ध भारतीय राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राजकारणी व भारताचे माजी पाचवे लोकसभा अध्यक्ष डॉ. गुरुद्याल सिंह ढिल्लो यांचा जन्मदिन.
  • सन १९२१ साली प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी व राजकारणी तसचं, गुजरात, मध्य प्रदेश आणि पॉन्डिचेरी केंद्र शासित प्रदेशाचे माजी राज्यपाल के. एम. चांडी यांचा जन्मदिन.
  • सन १९२५ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखिका, कवयित्री व प्रख्यात शास्त्रीय गायिका योगिनी जोगळेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९३३ साली माजी भारतीय क्रिकेटपटू जी. कृपाल सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९५९ साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित “वॉटरमॅन ऑफ इंडिया” म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय जलसंधारण आणि पर्यावरणवादी तसचं ‘तरुण भारत संघ‘ चे संस्थापक राजेंद्र सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९७० साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अभिनेता मनोज नेल्लियट्टू उर्फ एम. नाईट श्यामलन यांचा जन्मदिन.

६ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 August Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९२५ साली प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी, जहालमतवादी नेते व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सह- संस्थापक तसचं, लोकमान्य टिळक यांचे सहकारी राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.
  • सन १९६५ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट संगीत दिग्दर्शक व गीतकार वसंत पवार यांचे निधन.
  • सन १९८२ साली भारतीय मल्याळम भाषेचे प्रसिद्ध साहित्यकार एस. के. पोट्टेक्काट्ट यांचे निधन.
  • सन १९९१ साली इराणचे राजकारणी व माजी पंतप्रधान शापूर बख्तियार यांचे निधन.
  • सन १९९७ साली साहित्य अकादमी पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते, लेखक व कादंबरीकार बीरेंद्र कुमार भट्टाचार्य यांचे निधन.
  • सन २००१ साली माजी भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आधार कुमार चटर्जी यांचे निधन.
  • सन २०१९ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, वकील तसचं, भारतीय जनता पक्षाच्या सदस्या व माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन. इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला होत्या.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved