Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ७ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

7 April  Dinvishesh

मित्रानो, आजचा दिवस आपण सर्वांकरिता खूप महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी एकमताने जगातील आरोग्याच्या समस्यांकडे आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी विश्व स्वस्थ संघटनेची स्थापना केली. सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार असणारी सयुक्त राष्ट्रांची ही एक विशेष संस्था आहे. विश्व स्वस्थ संघटने तर्फे ७ एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

या व्यतिरिक्त इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, शोध, जन्म, मृत्यू आदी सर्व बाबतीत माहिती (7 April Today Historical Events in Marathi) पाहणार आहोत.

जाणून घ्या ७ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 7 April Today Historical Events in Marathi

7 April History Information in Marathi

७ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7  April Historical Event

  • इ.स. १८२७ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन वॉकर यांनी शोध लावलेल्या काडीपेटी सर्वप्रथम विक्रीस काढली.
  • सन १८७५ साली मुंबईमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
  • इ.स. १९४० साली पोस्टाच्या तिकिटांवर प्रतिमा छापण्यात येणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक ठरले
  • सन १९४८ साली आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार असलेली संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १९६२ साली इंटरनेट प्रणाली सक्रीय करण्यात आली.
  • सन १९९६ साली श्रीलंकन क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूत अर्धशतक मारण्याचा विश्वविक्रम केला.

७ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९१ साली न्यूझीलंड देशाचे राजकीय व्यंगचित्रकार आणि व्यंगचित्रकार सर डेव्हिड अलेक्झांडर सेसिल लो यांचा जन्मदिन.
  • सन १९१९ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय कवी, कादंबरीकार, नाटककार आणि उर्दू साहित्याचे लघुकथा लेखक कश्मीरी लाल जाकिर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२० साली भारतरत्न, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त भारतीय संगीत आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे संगीतकार व प्रसिद्ध सितार वादक रवी शंकर यांचा जन्मदिन.
  • सन १९४२ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, दूरदर्शन तसचं चित्रपट निर्माता जितेंद्र यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९५४ साली  हाँगकाँग देशातील प्रख्यात मार्शल आर्टिस्ट, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, स्टंटमॅन आणि गायक चॅन कॉंग-संग उर्फ जॅकी चॅन यांचा जन्मदिन.
  • सन १९८२ साली भारतीय वंशीय अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर रितेश भल्ला उर्फ सोंजय दत्त यांचा जन्मदिन.

७ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 April  Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९३५ साली भारतीय शास्त्रज्ञ शंकर अबाजी भिसे यांचे निधन.
  • इ.स. १९४७ साली अमेरिकन उद्योगपती व श्रीमंत व्यावसायिक तसचं,फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेनरी फ़ोर्ड यांचे निधन.
  • सन १९७७ साली भारतीय मराठी कवी, लेखक, गीतकार, अभिनेता राजा बढे यांचे निधन.
  • इ.स. २००१ साली कॉलेजनच्या रचनेसाठी प्रथम ट्रिपल-हेलिकल मॉडेल प्रस्तावित करणारे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन उर्फ डॉ.जी.एन. रामचंद्रन यांचे निधन.
  • सन २००४ साली ओडिसा राज्यातील पद्मविभूषण पुरस्कार विजेते प्रख्यात भारतीय शास्त्रीय नर्तक, गुरू आणि ओडिसी नृत्यकार केलुचरण महापात्रा यांचे निधन.
  • इ.स. २०१२ साली हिंदी भाषिक कवी, लेखक व समीक्षक आचार्य जानकी वल्लभ शास्त्री यांचे निधन.
  • सन २०१४ साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध छायाचित्रकार वेंकटाराम पंडित कृष्णमूर्ती उर्फ व्ही. के. मूर्ती यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved