जाणून घ्या ७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

7 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन व त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज आपल्या देशाचे राष्ट्रगीत ‘जन गन मन‘ चे रचिता कवी रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी. रवींद्रनाथ टागोर हे पश्चिम बंगाल मधील प्रसिद्ध चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. नोबल पारितोषिक पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियायी नागरिक होते. त्यांना हा पुरस्कार त्यांनी लिहिलेल्या गीतांजली या कादंबरीकरिता देण्यात आला होता. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कोलकत्त्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांनी आपल्या वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी कविता लिहिणे सुरु केलं होत. त्यांनी बांगलादेशाचे राष्ट्रगीत आमार सोनार बांग्ला देखील रचले आहे. ब्रिटीश सरकारने त्यांना सर हा बहुमान दिला होता. परंतु, सन १९१९ च्या जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे त्यांनी हा किताब इंग्रज सरकारला परत केला. अश्या या महान समाजसुधारक देशभक्तीपर स्वातंत्र्यसैनिकाची आज पुण्यतिथी.

जाणून घ्या ७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 7 August Today Historical Events in Marathi

7 August History Information in Marathi
7 August History Information in Marathi

ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 August Historical Event

 • इ.स. १७५३ साली ब्रिटीश वस्तुसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली.
 • सन १७८९ साली अमेरिकेतील सरकारी युद्ध विभागाची स्थापना करण्यात आली.
 • सन १९४२ साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी प्रशांत महासागरातील कोडाई कॅनाल येथे अमेरिकेचे सैन्य उतरले व त्यांनी तिथे भीषण लढाई केली.
 • सन १९४७ साली मुंबईच्या महानगर पालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
 • सन १९८१ साली सलग १२८ वर्षांपासून प्रकाशित होत असलेलं वाशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.
 •  सन १९८५ साली भारतीय बिलियर्डस खेळाडू गीत सेठी हे वर्ल्ड अ‍ॅमेच्योर बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारे तिसरे भारतीय खेळाडू ठरले.
 • सन १९९१ साली जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली.

ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८३१ साली चर्च ऑफ इंग्लंडचे एक मौल्यवान, शालेय शिक्षक आणि लेखक तसचं, केंब्रिज अ‍ॅपोस्टल्स सीक्रेट सोसायटीचे सदस्य फ्रेडरिक फरार(Frederic Farrar) यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८७१ साली प्रसिद्ध भारतीय जलरंग चित्रकार, रवींद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्र नाथ टागोर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८७६ साली पहिल्या महायुद्धात प्रसिद्धीस आलेल्या डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचा जन्मदिन.
 • सन १९०४ साली प्रसिद्ध भारतीय इतिहास, सांस्कृतिक कला व साहित्याचे विद्वान वासुदेव शरण अग्रवाल यांचा जन्मदिन.
 • सन १९१२ साली भारतीय हृदयरोगाचे प्रणेते व मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक तसचं, ऑल इंडिया हार्ट फाउंडेशनचे संस्थापक संचालक केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्मदिन.
 • सन १९२५ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय अनुवंशशास्त्रज्ञ आणि प्रशासक तसचं, भारतातील हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिन.
 • सन १९४८ साली माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्रेग चैपल(Greg Chappell) यांचा जन्मदिन.
 • सन १९७५ साली दक्षिण आफ्रिकन आणि अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि निर्माता शार्लीज़ थेरॉन(Charlize Theron) यांचा जन्मदिन.
 • सन १९९२ साली युवा भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहर यांचा जन्मदिन.

ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 August Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९४१ साली नोबल पारितोषिक विजेता भारतीय राष्ट्रगीताचे जनक कवी, संगीतकार, कलाकार आणि भारतीय उपखंडातील आयुर्वेद-संशोधक रवींद्रनाथ टागोर यांचे निधन.
 • सन १९७४ साली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या भेंडीबाजार घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन.
 • सन २००९ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील गीतकार आणि अभिनेते गुलशन बावरा यांचे निधन.
 • सन २०१८ साली भारतीय लेखक आणि राजकारणी तसचं, तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top