जाणून घ्या ७ जून रोजी येणारे दिनविशेष

7  June Dinvishes

मित्रानो, आजचा दिवस हा महात्मा गांधी यांच्या सविनय अवज्ञा आंदोलना करिता खास करून ओळखला जातो. महात्मा गांधी हे वकिली करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले असतांना त्यांना तिथे अनेक संकटाना सामोरे जावं लागलं. एके दिवशी महात्मा गांधी प्रथम श्रेणीच्या रेल्वे डब्यातून प्रवास करीत असतांना त्यांच्याकडे त्या डब्याचे तिकिट असतांना सुद्धा त्यांना त्या डब्याच्या बाहेर काढून देण्यात आलं. कारण, ते गोरे इंग्रज नव्हते शिवाय त्यांचा रंग सुद्धा गोरा नव्हता.

महात्मा गांधी यांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी महात्मा गांधी यांना जबरदस्तीने खाली उतरविण्यात आले. परिणामी, महात्मा गांधी यांनी या घटनेला अनुसरून दक्षिण आफ्रिकेतील इंग्रज शासनाला धडा शिकविण्यासाठी आपले पहिले आंदोलन म्हणजेच सविनय आंदोलन केले.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास कालीन ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन व शोध कार्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ७ जून रोजी येणारे दिनविशेष – 7 June Today Historical Events in Marathi

7 June History Information in Marathi
7 June History Information in Marathi

७ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 June Historical Event

 • इ.स. १५३९ साली बक्सर च्या जवळ चौसा या ठिकाणी अफगाण शासक शेरशाह सुरी आणि मुघल शासक बादशाहा हुमायू यांच्यात झालेल्या लढाईत बादशाहा हुमायू यांचा पराभव झाला.
 • सन १९७५ साली क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषक करंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली.
 • सन १९७९ साली रशिया देशांतील कापुस्तीनयार येथून भारतीय उपग्रह भास्कर-१ चे प्रक्षेपण केले.
 • सन १९९४ साली आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या(IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी प्रथमच एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रभाकर नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
 •  सन २००६ साली भारत सरकारने नेपाळला आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी एक अब्ज रुपये देण्याचा निर्णय घेतला.
 • महात्मा गांधीं यांनी १९९३ मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

७ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८३७ साली प्रख्यात जर्मन क्रूर शासक अ‍ॅडॉल्फ हिटलर (Adolf Hitler) यांचे वडिल अलोइस हिटलर( Alois Hitler) यांचा जन्मदिन.
 • सन १९१३ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक व समिक्षक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्मदिन.
 • सन १९१४ साली भारतीय चित्रपट निर्देशक, पटकथा लेखक व उर्दू भाषिक लेखक ख़्वाजा अहमद अब्बास यांचा जन्मदिन.
 • सन १९४९ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुरिंदरसिंग निज्जर यांचा जन्मदिन
 • सन १९५७ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश व भारतीय सशस्त्र सैन्य न्यायाधिकरणाचे विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांचा जन्मदिन.
 • सन १९५९ साली भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा जन्मदिन.
 • सन १९७४ साली सुप्रसिद्ध भारतीय टेनिसपटू महेश भूपती यांचा जन्मदिन.
 • सन १९७५ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट व टेलीव्हिजन मालिका निर्माता आणि दिग्दर्शिका एकता कपूर यांचा जन्मदिन.
 • सन १९८१ साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्मदिन.

७ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 June Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९५४ साली इंग्रजी गणितज्ञ, संगणक शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग( Alan Turing) यांचे निधन.
 • सन १९७० साली प्रसिद्ध ब्रिटीश इंग्रजी कादंबरीकार, लघुकथा लेखक, निबंधकार आणि ग्रंथपाल व साहित्यिक एडवर्ड मॉर्गन फोर्स्टर (E. M. Forster) यांचे निधन.
 • सन १९९२ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक, साहित्यिक, संपादक व समिक्षक सखाराम गंगाधर मालशे यांचे निधन
 • सन २००२ साली भारताचे माजी राष्ट्रपती बासप्पा दनप्पा जत्ती यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top