Wednesday, August 27, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

वाघाची माहिती

Waghachi Mahiti

जंगलचा राजा सिंह याच्याबरोबर कोणत्या प्राण्याचे नाव घेतले जात असेल तर ते वाघोबाचे होय. सिंह हा जंगलचा राजा आहे, तर वाघ हा प्राणी जंगलचा प्रधान आहे आणि वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी मानला जातो. तसेच या मांजरीच्या कुळातील सर्वात शक्तिशाली प्राणी मानला जातो.

वाघाची माहिती – Tiger Information in Marathi

Tiger Information in Marathi
Tiger Information in Marathi
हिंदी नाव :बाघ
इंग्रजी नाव :TIGER

वाघाचा रंग तांबूस पिवळसर असतो. त्यांच्या अंगावर काळे पट्टे असतात. वाघाचे डोळे तपकिरी रंगाचे असून त्यात लालसर छटा असते; त्यामुळे त्याचे डोळे निखाऱ्यासारखे धगधगीत दिसतात. वाघाला चार पाय, दोन डोळे, दोन छोटे कान व एक शेपटी असते.

वाघाचा जबडा मोठा असतो, त्याचे नाक मोठे असते. नाकाजवळ काटेरी मिश्या असतात; त्याला पाहुन भीतीच वाटते. त्याचे शरीर सहा-सात फूट लांब, तर शेपटी तीन-चार फूट लांब असते. त्याच्या पायाला पंजे म्हणतात, पंजाला दणकट नखे असतात. त्याच्या तोंडात सुळे असतात. वाघाचे चे वजन किमान ६०० ते ७०० पौंड असते.

शिकार : वाघाच्या बळकट सुळ्यांमध्ये एखादा प्राणी अडकला तर त्याचा प्राण वाचणे कठीण असते. हा प्राणी दिसायला क्रूर दिसतो; त्याला ताजीच शिकार केलेले प्राण्यांचे मांस लागते. एकटा पर की मस्तपैकी झोप काढायची ही वाघाची सवय.

वाघाच खाद्य – Tiger Food

वाघ हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. तो हरिण, सांबर, रानडुक्कर, पक्षी, ससा या सारख्या प्राण्यांचे भक्षण करतो आणि त्यांना आपले खाद्य बनवतो.

इतर माहिती :

वाघाच्या मादीला ‘वाघीण म्हणतात. वाघाच्या पिलांना बछडे म्हणतात. एक वाघ आपल्या हद्दीत दुसऱ्या वाघाला येऊ देत नाही. वाघिणीला एका वेळी दोन ते तीन बछडी होतात. ती लहान अगदी मांजरीच्या पिलांसारखी दिसतात.

शिकार कशी शोधायली कशी पकडायची, दबा कसा धरायचा, हल्ला कसा करायचा या गोष्टी वाघीण आपल्या बछड्यांना शिकविते.

वाघांच्या अनेक जाती व अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पांढरा वाघ, बिबट्या वाघ, ढाण्या वाघ अशा काही जाती आहेत. बिबट्या वाघाच्या अंगावर पिवळसर मखमली केस असतात. त्याच्या अंगावर काळे ठिपके असतात. बिबट्या वाघ हा भारतात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,  केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र इथे आढळतो.

काही वाघ हे नरभक्षक असतात. वाघ हा प्राणी म्हातारा होऊ लागला की त्याचे दात, नखे गळून पडतात.

स्नायूपण शिथिल होऊ लागतात. शक्ती कमी होते. परंतु हाच वाघ जंगलातून एखादा मनुष्य दिसल्यास त्यांच्यावर झडप घालतो.

वाघाची आणखी एक जात म्हणजे पांढरा वाघ. या प्रकारचे वाघ रेवाच्या जंगलात आढळतात. या वाघांच्या कातडीचा मूळ रंग पांढरा किंवा थोडा राखी असतो. त्यावर थोडे मळकट रंगाचे पट्टे असतात.

पांढऱ्या वाघाचे ओठ गुलाबी असतात व डोळे निळे असतात, हे वाघ फारच रुबाबदार व ताकदवान दिसतात.

‘रेवा’ हे जंगल मध्य प्रदेशात आढळते. पूर्वी राजे-महाराजांच्या दरबारात सिंह व वाघांच्या झुंजी होत असत. तसेच वाघांच्या कातडीचा उपयोग पूर्वी ऋषीमुनी ध्यानाला बसताना आसन म्हणून करत असत.

वाघ हा खूप वेगवान गतीने प्राण्यांची शिकार करतो. वाघ हा सहजपणे ५०० मीटर लांबी वरती उडी मारू शकतात.

पांढऱ्या रंगाचा वाघ हा ९ ,००० वाघांपैकी एक असतो.

वाघ हे चांगले जलतरणपटू असतात. ते पाण्यामध्ये साधारण ५ ते ६ किलोमीटर पाहू शकतात.

परंतु जंगल नष्ट होत चाल्याने वाघाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाली आहे.

आता जगभरातील जंगलामध्ये २००० ते ३००० वाघ शिल्लक राहले आहेत.

Editorial team

Editorial team

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved