Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

सर्वात कमी वयाचा IAS अधिकारी अन्सार अहमद शेख

Ansar Shaikh IAS

’’या जगात असंभव असे काहीही नाही, आपण ते सगळं करू शकतो ज्याचा आपण विचार करतो, आणि ते सर्व विचार करण्याचा अधिकार आपल्या जवळ आहे ज्याचा आपण आजपर्यंत विचारच केलेला नाही’’.

हे वाक्य अगदी खरं आहे की काहीतरी करण्याची ईच्छा उरात बाळगणारयांना या जगात अशक्य असे काहीही नाही.

माणसाचा निश्चय मजबुत असला तर हालाखीची परिस्थीती, गरिबी या त्याच्या मार्गात कधीही अडथळा ठरत नाही.

मित्रांनो काही व्यक्तिमत्वं असे असतात की जे कोणत्याही परिस्थीतीत आपल्या स्वप्नांना साकार करण्याकरता मार्ग शोधुन काढतातच.

कधी कुणी विचार तरी केला असेल का की एका ऑटो रिक्शा चालकाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात IAS हे देशाचे सन्मानित पद प्राप्त करून दाखवेल आणि तेही वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी….

युपीएससी सिव्हील सव्र्हिस परीक्षा देशातील सर्वात कठीण परिक्षांमधुन एक समजली जाते.

लाखो विद्यार्थी ही परिक्षा देतात परंतु अवघे काहीच जण यात यशस्वी होतात.

प्रचंड मेहनत, मार्गदर्शन, आणि दृढनिश्चयाचा संकल्पच युपीएससी विद्याथ्र्यांना या परिक्षेत सहाय्यभुत ठरू शकतो.

कित्येक विद्याथ्र्यांकडे सर्व सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध देखील असतं जे पैश्याने विकत घेता येतं परंतु तरीसुध्दा IAS परिक्षेत ते यशस्वी होऊ शकत नाही.

Ansar Shaikh IAS

सर्वात कमी वयाचा IAS अधिकारी अन्सार अहमद शेख Ansar Shaikh IAS

परंतु काहीजण असेही असतात जे कोणत्याही विपरीत परिस्थीतीला आपल्या स्वप्नांच्या आड येउ देत नाही.

अशीच प्रेरणादायक आणि आशेचा नवा किरण दाखविणारी गोष्ट आहे अन्सार अहमद शेख यांची.

यांनी युपीएससी सिव्हिल सव्र्हिस परिक्षेत 2015 साली आपल्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आणि ते देखील वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी.

एवढया कमी वयात ते IAS अधिकारी झाले.

IAS बनण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या एका शिक्षकांकडुन मिळाली.

युपीएससी परिक्षेचा निकाल आल्यानंतर आपल्या मुलाचे यश पाहुन अंन्सार चे आईवडिल अतिशय भावनिक झाले होते.

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा प्रातांतील जालना जिल्हयातील एक छोटेसे गांव शेडगाव. अन्सार शेख या गावाचे.

या गावात त्यांचे वडिल युनुस शेख अहमद अॅटो चालविण्याचे काम करतात. त्यांच्या तीन पत्नी असुन अंसारची आई त्यांची दुसरी पत्नी आहे.

अन्सार च्या घरात त्याच्या व्यतिरीक्त आणखीन बरीच मुलं आहेत.

गरीबीची परिस्थीती असल्यामुळे त्याचे वडिल कोणत्याही मुलाला चांगले शिक्षण देण्याच्या परिस्थीतीत नव्हते.

तरी देखील अन्सार वेगळा होता. तो एक हुशार विद्यार्थी होता व त्याच्याजवळ परिस्थीतीवर मात करून प्रयत्नपुर्वक उत्तम परिणाम देण्याची क्षमता होती.

Ansar Shaikh Success Story

अन्सार ची आई शेतात काम करीत असे. त्यांच्या घरातील परिस्थीती इतकी हालाखीची होती की अंसार चे शिक्षण सुरू राहावे या करीता त्याच्या लहान भावाने अनीसने शिक्षण अर्धवट सोडले आणि इयत्ता सातवी नंतर शाळेचा निरोप घेतला.

अनीस कुटुंबाला आणि आपल्या भावाला शिक्षणात मदत मिळावी या करीता गॅरेज मधे काम करत असे.

अंसार चे यश या करता देखील कौतुकास्पद आहे कारण शिक्षण ही बाब त्याच्या कुटुंबाकरता कधीही प्राथमिकता राहीली नाही.

आपल्या स्वतःच्या शब्दांमधे अंसार ने आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीचे वर्णन या प्रमाणे केले आहे.

’’माझ्या कुटुंबात शिक्षणाचे तेवढे महत्व कधीच नव्हते.

माझे वडील एक ऑटो रिक्शा चालक आहेत आणि त्यांना एकुण तीन पत्नी आहेत त्यातली माझी आहे दुसरी पत्नी आहे.

माझ्या लहान भावाला शाळेतुन काढुन देण्यात आले आणि माझ्या दोन लहान बहिणींचे लग्न फार कमी वयात करून देण्यात आले.

ज्यावेळी मी त्यांना सांगीतले की मी युपीएससी परिक्षेत यशस्वी झालो आहे त्यावेळी त्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला’’.

तरी देखील अंसार शेख च्या संपुर्ण परिवाराला त्यांचे स्वप्नं पुर्ण करण्याकरता मोठा संघर्ष करावा लागला आहे.

Ansar Shaikh IAS

इयत्ता दहावीत अंसार ने 91% गुण प्राप्त केले. त्यांच्याजवळ पुण्यातील फग्र्युसन कॉलेज मधुन प्राप्त केलेली विज्ञान शाखेची पदवी आहे.

अन्सार ने युपीएससी सिव्हील सव्र्हिस ची तयारी करण्याकरता एका खाजगी कोचिंग क्लास मध्ये प्रवेश घेतला होता.

याकरता त्याच्या कुटुंबाला बराचा खर्च करावा लागत असे. युपीएससी ची तयारी करत असतांना अशी वेळ देखील त्याच्यावर आलेली आहे जेव्हां त्याला 2-2 दिवस उपाशी राहावे लागले आहे.

परंतु जेव्हांही निकाल लागत असे घरातील सर्वचजण आनंदीत व्हायचे.

अन्सार शेख यांनी योग्य मार्गदर्शन आणि समर्थनाकरता आपले शिक्षक राहुल पांडव यांना धन्यवाद दिले आहेत.

युपीएससी परिक्षेत 361 वी रॅंक प्राप्त करून अंसार शेख ने आपल्या कुटुंबाचे नशिबच पालटुन टाकले.

आज जरी अंसार भारत सरकार मधे आपली सेवा देत आहे, परंतु त्याच्या घरची परिस्थीती किती हालाखीची होती याचा अंदाज यावरूनच आपल्याला बांधता येतो की ज्यावेळेस एक रिपोर्टर त्यांच्या घरी त्यांचा इंटरव्यु घेण्याकरता पोहोचला त्यावेळेस अंन्सार शेख यांच्या घरात एक बल्ब देखील नव्हता.

अंन्सार चा भाऊ त्याच वेळी दुकानावर गेला आणि एक बल्ब घेऊन आला.

ऑफिसर झाल्यानंतर अन्सार शेख सर्वात आधी सांप्रदायिक साहार्द वाढण्याकरता आणि गरीबांना मदत करण्यासारख्या कामांना प्राथमिकता देणार आहे.

अंन्सार शेख यांच्या मते जर एक ऑटो रिक्शा चालकाचा मुलगा IAS बनु शकतो तर जगात कोणताही युवा हे करू शकतो मग तो गरीब असो वा श्रीमंत आणि कोणत्याही धर्माचा असो.

कठोर परिश्रम, कुटुंब आणि मित्रांची मदत यामुळे अन्सार ने आपल्या स्वप्नाला सत्यात उतरवले.

पण तो एक गुण जो त्याला इतरांपेक्षा वेगळा करतो तो म्हणजे कधीही मागे न पाहाणे आणि आपल्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याकरता दृढ निश्चयाने प्रयत्न करणे.

त्यांच्या या धाडसाला माझीमराठी टीम चा सलाम !!!!!

Editorial team

Editorial team

Related Posts

Unique Villages
Viral Topics

जगातील पाच आगळे वेगळे गावं, पहा काय वेगळ आहे या गावात

आपण जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टींची यादी याआधीही पाहिली आहेच, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूपच वेगळ्या आहेत, आणि या...

by Vaibhav Bharambe
October 19, 2020
Lake Natron Mystery
Viral Topics

…याला हाथ लावला तर मिनिटात बनू शकते आपले शरीर दगडाचे, अजबच आहे ना.

लहानपणी पुस्तकात एक गोष्ट वाचली असेल ज्यामध्ये एका राजाची गोष्ट होती कि तो राजा ज्या गोष्टीला हाथ लावायचा ती गोष्ट...

by Vaibhav Bharambe
October 18, 2020
Story of Mahishasura
Information

दुर्गा मातेने महिषासुराला का मारले? हे होते त्यामागील कारण

Story of Mahishasura पुराणातील कथांच्या नुसार आपल्याला माहिती आहे, महिषासुर एक क्रूर राक्षस होता, त्याच्या अत्याचाराच्या आणि बऱ्याच कथा आपण...

by Vaibhav Bharambe
October 17, 2020
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved