Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

“जाणून घ्या त्या लोकांची नावे जे जगातून सर्वात श्रीमंत आहेत.”

Jagatil Sarvat Shrimant Vyakti List

या संपूर्ण जगाच्या पाठीवर जवळ जवळ अब्जावधी लोक राहत आहेत. आणि त्या अब्जावधी लोकांपैकी असेही काही लोक आहेत जे कि आपला उदरनिर्वाह चालवण्यास समर्थ नाहीत.

आणि असेही काही व्यक्ती आहेत कि ज्यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेही आपल्या कर्तुत्वाच्या बळावर!

जीवनात तेच माणसं यशस्वी होतात जे एखाद्या कामाला विशिष्ट पद्धतीने करतात. आणि इतिहास त्याच व्यक्तींना आठवण ठेवते जे बेभान होऊन आपल्या लक्ष्याचा मागोवा घेतात तसेच न थांबता न थकता सतत प्रयत्न करत असतात.

त्यांची मेहनतच त्यांची ओळख बनून जात असते. तर आजच्या लेखात सुद्धा आपण तशाच व्यक्तींविषयी माहिती पाहणार आहोत.

ज्यांनी स्वतःला या जगापेक्षा वेगळ सिद्ध केल आणि आपल नाव त्या काही गोष्टींमध्ये आणले ज्या गोष्टींची स्वप्न कित्येक जन पाहत असतात.

तर चला मग पाहू त्या व्यक्तींची यादी ज्यांनी पूर्ण जगामध्ये आपले नावाच्या पताका उंच केल्या आहेत.

“जाणून घ्या त्या लोकांची नावे जे जगातून सर्वात श्रीमंत आहेत.” – Richest People in the World in Marathi

Richest people in the world in Marathi

१०) मुकेश अंबानी – Mukesh Ambani 

रिलायंस कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, धीरूभाई अंबानी यांचे पुत्र, त्यांचे वय जवळजवळ ६२ वर्ष आहे.

भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपले पाय रोवले आहेत. त्यांची एका वर्षाची कमाई ५,८७० करोड रुपये आहे.

आणि सध्या ते पूर्ण जगातून दहाव्या व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

९) लॅरी पेज – Larry Page

लॅरीपेज यांच्याविषयी तर आपल्याला माहित असेलच कि ते गुगल चे सह-संस्थापक आहेत.

त्यांनी १९९८ मध्ये आपल्या मित्रासोबत गुगल हि कंपनी सुरु केली होती आणि आज ती कंपनी जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्यांमधून एक आहे.

त्यांची एका वर्षाची कमाई हि जवळजवळ ५,९१२ करोड रुपये आहे. तसेच लॅरी हे सुद्धा जगातील नवव्या क्रमांकाचे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत.

८) कार्लोस स्लिम – Carlos Slim

कार्लोस स्लिम यांनी वयाच्या १२ व्या वर्षी च धंद्यात आपला हाथ टाकला होता.आज ते मेक्सिको चे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

आज त्यांच्या कडे मोठ-मोठ्या कंपन्यांचे शेयर आहेत.

तसेच आज त्यांनी बऱ्याच क्षेत्रात आपल्या पैशांची गुंतवणूक सुद्धा केली आहे. त्यांची वार्षिक कमाई हि जवळजवळ ६,४४० कोटी रुपये एवढी आहे. आणि ते जगातील आठव्या क्रमांकांचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

७) लॅरी एलिसन – Larry Ellison

लॅरी एलिसन ओरॅकल कॉर्पोरेशन चे सह-संस्थापक आहेत. ओरॅकल कॉर्पोरेशन हि अमेरिकेची एक मोठी कंपनी आहे.

ते २०१४ पर्यंत त्या कंपनी चे सीईओ सुद्धा राहिलेले आहेत.

त्यांच्या कंपनी मध्ये जवळ जवळ १,३६,००० पर्यंत कर्मचारी काम करतात. त्यांची वर्षाची कमाई जवळ-जवळ ६,६६० कोटी रुपये एवढी आहे. आणि त्यामुळे ते जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

६) मार्क झुकरबर्ग – Mark Zuckerberg

मार्क झुकरबर्ग हे सध्या तीन कंपन्यांचे मलिक आहेत, Whats app,  Facebook, Instagram.

त्यांनी २०१९ मध्ये Whats app आणि Instagram ह्या दोन कंपन्यांना विकत घेतले. मार्क झुकरबर्ग हे जगातील सर्वात युवा अरबपती आहेत.

त्यांचे वय फक्त ३५ वर्ष आहे. यांची सर्वात अगोदरची कंपनी हि फेसबुक आहे.

त्यांची वर्षाची कमाई हि जवळ-जवळ ७,७७६ कोटी रुपये आहे. म्हणून ते जगातून सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात.

५) अमानसीओ ऑर्टेगा – Amancio Ortega   

आपल्याला झारा स्टोर विषयी तर माहितच असेल कि,  महागीचे ब्रांडेड कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले झारा स्टोर ने पूर्ण जगामध्ये आपली एक अनोखी ओळख निर्माण केली आहे.

त्या झारा चे संस्थापक तसेच स्पॅनिश चे सर्वात श्रीमंत व्यक्ती अमानसीओ ऑर्टेगा.

त्यांच आजच वय ८३ वर्ष आहे. आणि त्यांची वर्षाची कमाई हि जवळ-जवळ ७,७९० कोटी रुपये एवढी आहे.

त्यामुळे आज ते जगातून पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

४) वॉरेन बफेट – Warren Buffett

वॉरेन बफेट हे अमेरिकेचे रहिवासी असून ते आज ८९ वर्षाचे आहेत, जवळ जवळ ते अमेरीकेचे सर्वात वयोवृध्द श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना शेयर मार्केट चा एक महान गुंतवणूकदार म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.

त्यांनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत. त्यांची वर्षाची कमाई जवळ जवळ ८,९९४ कोटी रुपये एवढी आहे, त्यामुळे ते जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात.

३) बिल गेट्स – William Henry Gates

बिल गेट्स हे अमेरिकेचे रहिवासी असून ते मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन चे सह-संस्थापक आहेत.

सोबतच ते अमेरिकेतील दुसर्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी १९७५ मध्येच मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ची स्थापना केली होती.

पूर्ण जगामध्ये मायक्रोसॉफ्ट चे बऱ्यापैकी जाळे पसरले आहे.

ज्यामुळे त्यांची वार्षिक कमाई जवळ जवळ १०,८०० कोटी रुपये एवढी आहे. सोबतच ते जगातील तिसर्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

२) बर्नार्ड अर्नाल्ट – Bernard Arnault

बर्नार्ड अर्नाल्ट हे फ्रांस चे राहिवाही असून ते तेथील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, बर्नार्ड अर्नाल्ट हे “Louis Vuitton Moet Hennessey” या कंपनी चे सी.ई.ओ आहेत. यांचे आताचे वय ७० वर्ष आहे.

बर्नार्ड अर्नाल्ट ह्यांची वार्षिक कमाई जवळजवळ ११,२०० कोटी रुपये एवढी आहे. त्यामुळे ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

१) जेफ बेसोस – Jeffrey Bezos

सर्वांना परिचय असेलच अमेझोन कंपनी विषयी जेथे A टू Z असे प्रोडक्ट उपलब्ध असतात.

आणि आपल्याला जे सुद्धा हवे आहे ते घरपोच मिळते ते सुद्धा काही दिवसात. त्याच कंपनीचे सी.ई.ओ म्हणजे जेफ बेसोस!

जेफ बेसोस हे पूर्ण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जे कि अमेझोन कंपनी चे संस्थापक आहेत. जे सध्या वयाने ५६ वर्षाचे आहेत. आणि त्यांची वार्षिक कमाई हि जवळ जवळ ११,७०० कोटी रुपये आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

तर आपण आजच्या लेखात बघितले या जगातील सर्वात श्रीमंत असणार्या व्यक्तींचे नावे त्यासोबतच त्यांची वार्षिक कमाई! त्यांची वार्षिक कमाई हि दरवर्षी कमी जास्त होतच राहते.

तर आशा करतो आजच्या लेखातून आपल्याला बऱ्यापैकी शिकायला मिळाले असेल.

आपल्याला आमचा हा छोटासा लेख कसा वाटला ते कळवा आणि आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

तसेच आम्ही तुमच्यासाठी असेच आणखी लेख घेऊन येत राहू. त्यासाठी आमच्या “माझी मराठी” च्या पेज ला भेट द्यायला सुद्धा विसरू नका.

Thank You So Much, And  Keep Loving!

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved