Sunday, June 29, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

संपूर्ण जगभरातील अनोखे आणि अविश्वसनीय उत्सव

Festivals in the World

वेगवेगळया देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या चांगल्या उत्सवांबद्दल तुम्ही ऐकले असेल पण संपुर्ण जगात साजऱ्या होणाऱ्या विचीत्र प्रथा आणि उत्सवांबद्दल तुम्ही ऐकले आहे?

आज याच विचीत्र उत्सवांबद्दल आपण माहिती घेणार आहोत,

संपूर्ण जगभरातील अनोखे आणि अविश्वसनीय उत्सव – Festivals Around the World

Festivals Around the World

  • बोरीयोंग येथील चिखल महोत्सव – Boriyeong Chikhal Festival 

चालता चालता आपला पाय चिखलात पडला तर आपल्याला कसे वाटते?

तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? निश्चितच किळस वाटेल आणि आपण त्वरीत चिखलाने माखलेला पाय धुण्याकरता शक्य ते प्रयत्न करू.

पण मी जर तुम्हाला सांगितले की असे देखील एक ठिकाण आहे जेथे नुसता पायच नाही तर पायापासुन डोक्यापर्यंत आपण चिखलाने माखले जातो आणि एकमेकांवर देखील चिखलफेक करतो.

हो हे खरे आहे! चला पाहुया कुठे घडतो हा चिखल महोत्सव !

साउथ कोरिया येथील बोरीयोंग प्रांतात प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात चिखल महोत्सव  साजरा केला जातो

१९९८ पासुन हा महोत्सव  साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आणि आता प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने समुदाय या ठिकाणी ही चिखलफेक करण्याकरता एकत्र येतो.

हा उत्सव साजरा करण्यामागे एक गमंत आहे

बोरीयोंग प्रांतात आढळुन येणारी माती ही पोषण मुल्यांनी भरलेली असुन तीचा वापर सौंदर्यप्रसाधनांमधे केला जातो.

त्यामुळे या मातीचे कोणतेही दुष्परीणाम होत नसुन झाल्यास फायदाच आहे.

त्यामुळे ही पोषणमुल्ये भरपुर प्रमाणात आपल्याला मिळावीत म्हणुन देखील लोक हा चिखल महोत्सव  साजरा करतात.

तर मग झाला ना दुर तुमचा गैरसमज? आता या जुलै महिन्यात साउथ कोरिया च्या या बोरीयोंग प्रांतात आणि साजरा करा हा चिखल महोत्सव .

  • ब्राझील येथील रिओ कार्निव्हल – Rio Carnival In Brazil

रिओ दी जानेरिओ हे ठिकाण ब्राझील येथील फार सुप्रसीध्द ठिकाण असुन ब्राझील चा विचार तेथील कार्निव्हल शिवाय होउच शकत नाही इतका हा उत्सव येथील प्रत्येक माणसाच्या तनामनात भिनलेला उत्सव आहे.

एका विशिष्ट शुक्रवारी हा उत्सव सुरू होतो आणि बुधवारी समाप्त होतो.

संपुर्ण जगात या उत्सवाप्रतीचे आकर्षण पहायला मिळते.

अतिशय प्रसीध्द असा हा रिओ कार्निव्हल ब्राझील च्या संस्कृतीचा एक भाग बनला आहे.

या कार्निव्हल मधे सांबा नृत्य खुप प्रसीध्द आहे, त्या शिवाय प्रत्येकाचे पोषाख आपली नजरकैद करणारे असे सुरेख आणि वेगळे असतात.

सगळी कडे करण्यात आलेली विद्युत रोषणाई, मदोन्मत्त करणारे संगीत, गाणी, प्रत्येकाचे वेगळे आकर्षक पोषाख यामुळे या महोत्सवाने कार्निव्ह राजधानी म्हणनु  संपुर्ण जगात नाव कमावले आहे आणि हा एक आश्चर्याचा विषय मानल्या जातो.

  • ब्युनोलचा टोमॅटिना महोत्सव – Buenol’s Tomatina Festival

एकमेकांना रंगवण्याचे अनेक धार्मिक उत्सव आपल्याला माहिती आहे.

चित्रपटांमधे देखील अंडे आणि टोमॅटो एकमेकांना फेकुन मारतांना पाहुन आपल्याला हसु येतं.

पण असाही एक देश आहे जेथे थेट टोमॅटो महोत्सव च साजरा करण्यात येतो! कोणता? चला पाहुया!

ब्युनोलच्या स्पेन येथे हा टोमॅटो महोत्सव ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी साजरा करण्याची प्रथा पडली आहे.

हा उत्सव साजरा करण्यामागे अनेक रंजक कथा सांगण्यात येत असल्या तरी देखील या प्रथेचा उगम कधी आणि नेमका का सुरू झाला याचे नेमके कारण ठाउक नाही.

शहराच्या नगरसेवकावरचा राग व्यक्त करण्याकरता लोक एकत्र येउन एकमेकांना हे टोमॅटो फेकुन मारतात अशी देखील एक रंजक कथा यामागे सांगण्यात येते.

लहान मुलांची घेतली जाणारी रॅगिंग आणि त्यांच्या सोबत घडवण्यात येणारे प्रॅंक्स याचा निषेध म्हणुन देखील लोक राग व्यक्त करण्याकरता या ठिकाणी जमतात आणि टोमॅटो महोत्सव  साजरा करतात.

पुर्वी या उत्सवाला साजरा करण्याकरता जवळपास ५०,००० लोक एकत्र यायचे पण आता तिकीट ठेवण्यात येत असल्याने हा आकडा २०,००० पर्यंत खाली आला आहे.

पाण्याचा मारा सुरू झाल्यानंतर गरम टमाटे मारणे सुरू होते आणि काही क्षणात टमाटयांचा चिखल सर्वत्र पसरलेला दिसु लागतो.

मैत्रीपुर्ण आणि विचीत्र असा हा उत्सव त्या देशाची ओळख बनला आहे.

  • क्रॅम्पस रन – Crampus Run

शैतानाचा उत्सव देखील एखादा देश साजरा करू शकतो का?

उत्तर आहे हो! शैतानाचा उपयोग करून उत्सव साजरा करणारा देश आहे ऑस्ट्रिया.

मंडळी ऑस्ट्रियाचा हा उत्सव नोव्हेंबर च्या शेवटी सुरू होतो आणि ख्रिसमस पर्यंत साजरा केला जातो.

लोक कथांमधे क्रॅम्पस हा सैतान म्हणुन दाखवण्यात आला आहे तो खोडकर मुलांना शिक्षा देतो आणि त्यांचे अपहरण करतो असे त्याचे चरित्र रंगवण्यात आले आहे.

या उत्सवाच्या दिवसांमधे क्रॅम्पसच्या घाबरावणाऱ्या कथा लहान मुलांना सांगितल्या जातात

चित्रविचीत्र पोषाख आणि भितीग्रस्त अवतार घेऊन रस्त्यावर फिरून हा उत्सव साजरा केल्या जातो.

खोडकर मुलांना कशाचा तरी धाक राहावा हा देखील उद्देश या उत्सवामागे असल्याचे आपल्याला दिसते.

रोजच्या जगण्यात काही दिवसांचा विरंगुळा आणि वेगळेपण आणण्याचा उद्देश या उत्सवांमागे असल्याचे आपल्याला दिसते.

  • बर्निंग मॅन – Burning Man

१९८६ साली दोन मित्रांनी (लॅरी हार्वे आणि जेरी जेम्स) लाकडाची ८ फुट उंच प्रतीकृती तयार करून सॅन फ्रॅन्सीस्को मधे बेकर बिच वर जाळली.

हा त्यांनी केलेला प्रकार पाहाण्याकरिता त्यावेळेस २० एक लोक समुद्रावर एकत्र आले होते.

पण त्यावेळेस त्यांनी केलेला हा प्रकार पुढे प्रथेत परीवर्तीत होईल याची त्यांना काहीही कल्पना नव्हती.

पण याच प्रकारामुळे एका विचीत्र आणि विक्षीप्त प्रथेने जन्म घेतला.

आता तर १०५ फुटापर्यंत लाकडी माणसाचा पुतळा बनवुन त्याला जाळण्यापर्यंत ही प्रथा पोहोचली आहे आणि २०१७ मध्ये ७०,००० लोक हा प्रकार पाहाण्याकरता त्या समुद्र किनाऱ्यावर एकत्र आले होते.

  • ऑक्टोबर फिस्ट – October Fist

वेगवेगळया प्रथा परंपरा कश्या सुरू होतील याचा काहीच नेम नाही! आता हेच पाहा ना.

म्युनिच जर्मनी येथे १८१० मध्ये तेथील राजकुमाराने एका राजकुमारीशी विवाह केला.

या विवाहात या राजकुमाराने तेथील सर्व नगरवासियांना आपल्या आनंदात समाविष्ट करून घेतले.

हा सोहळा पुढे अनेक दिवस सुरू होता त्या दरम्यान सर्वांना चांगले कपडे, उत्कुष्ट जेवणाचे खाद्यपदार्थ, नाचगाणी, बिअर, या सर्वाचा आनंद घेता आला.

नगरवासी या सर्व वातावरणाने ऐवढे भारले गेले की पुढच्या वर्षी याच सुमारास आपण सर्वानी पुन्हा हा जल्लोष साजरा करावयाचा असं त्यांनी ठरवलं.

आणखीन पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असं करता करता ऑक्टोबर फिस्ट  ही प्रथा आता तेथील ओळखच बनुन गेली.

सप्टेंबर च्या शेवटी आणि ऑक्टोबर फिस्ट च्या पहिल्या आठवडयात हा उत्सव जर्मनीत साजरा केला जातो.

आणि या सोहळयाकरता दरवर्षी जवळपास ६० लाख पर्यटक येथे एकत्र येतात.

येथील स्थानिक संस्कृती, इतिहास, मौजमजा, उत्कृष्ट मेजवानीचा आनंद, उत्कृष्ट बियर, या गोष्टी पर्यटकांना येथे आकर्षीत करतात.

या उत्सवादरम्यान कृषी संबधीत शो, वेगवेगळे पोषाख परिधान करून काढण्यात येणाऱ्या फेऱ्या, ऐतिहासीक आणि सांस्कृतिक प्रदर्शन याच्या वाढत्या लोकप्रीयतेमुळे या उत्सवाकरता दिवसेंदिवस दरवर्षी गर्दी वाढतांनाच दिसते.

  • अल्ब्युक्युरीक इंटरनॅशनल बलुन फेस्टीव्हल – Albuquerque International Balloon Festival

असंख्य रंगीबेरंगी बलुन ते ही मोठया मोठया आकाराचे आकाशात उडतांना पाहुन तुम्हाला कसे वाटेल?

बलुन म्हणजे साधेसुधे नाही बरं का! असे मोठे बलुन ज्यात लोक बसुन आकाशात उंच उडतात.

असे असंख्य बलुन मोठया मोकळया जागेत पाहातांना डोळयाचे अक्षरशः पारणे फिटते.

हा बलुन फेस्टीव्हल दरवर्षी ऑक्टोबर फिस्ट महिन्याच्या सुरूवातीला साजरा होतो तो येथील अल्ब्युक्युरिक येथे.

साधारण १९७० ला ही परंपरा एका छोटयाश्या मॉल पार्कींग मधे सुरू झाली त्यावेळी १५ बलुन आकाशात सोडण्यात आले.

हळुहळु हा उत्सव फार मोठया प्रमाणात साजरा व्हायला लागला आणि आता तर साधारण ६०० हॉट एअर बलुन आकाशात या उत्सवादरम्यान सोडण्यात येतात.

या रंगीबेरंगी बलुन उत्सवाला आपल्या कॅमेरात कैद करण्याकरता दरवर्षी हजारो पर्यटक येथे एकत्र येतात.

या उत्सवादरम्यान लेजर लाईट शो, फटाक्यांची आतिशबाजी, डांन्स परफॉर्मन्स,असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

विशेषतः फोटोग्राफी करता पृथ्वीवर साजऱ्या होणाया कार्यक्रमांतील हा एक महत्वाचा आणि विविध रंगांनी भरलेला असा कार्यक्रम मानल्या गेला आहे.

  • दिया दी लॉस मुर्तास – Diya Dee Los Murtas

हे नाव वाचुन जरी या उत्सवाचा अर्थ आपल्या लक्षात आला नाही तरी आम्ही आपल्याला सांगणार आहोत या नावाचा अर्थ….

पुर्वजांच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा उत्सव मेक्सिको येथे दरवर्षी ३१ ऑक्टोबर फिस्ट  ते २ नोव्हेंबर दरम्यान साजरा होतो.

या उत्सवा दरम्यान मेक्सिको येथील विशिष्ट समुदायाचे लोक आपल्या पुर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपल्या नातेवाईकांना आणि स्नेहीजनांना भेटवस्तु देतात.

ज्या ठिकाणी आपल्या पुर्वजांना दफन केले आहे तेथे जाउन आदरांजली वाहातात आणि त्यांचे स्मरण करत मेणबत्त्या लावल्या जातात

स्मशानभुमी च्या बाहेर कार्निव्हल देखील आयोजित करण्यात येते.

मिठाई आणि इतर व्यंजनांचे या उत्सवादरम्यान स्टॉल्स देखील लावण्यात येतात.

विशीष्ट प्रकारची केशभुषा आणि वेशभुषा करून (भयावह) येथील लोक रस्त्यांवरून फिरतांना पहायला मिळतात.

इतरांसारखे सण साजरे करण्यापेक्षा येथील लोक जन्म आणि मृत्युचा सोहळा साजरा करण्यावर विशेष भर देतांना या उत्सवातुन आपल्याला दिसते.

  • चायना येथील हर्बीन मध्ये साजरा होणारा बर्फ महोत्सव – Ice Festival in Harbin, China

प्रचंड उन्हाची दाहकता संपते आणि कडाक्याच्या थंडीला सुरूवात म्हणुन तिचे स्वागत अनोख्या पध्दतीने करण्याची परंपरा जोपासली जाते ती चीन येथील हर्बीन या भागात.

बर्फाच्या भव्य अश्या मुर्ती पाहाण्याकरता आणि जिवघेण्या थंडीला अनुभवण्याकरता अनेक पर्यटक या मोहोत्सवात सहभागी होतात.

चायनाच्या ईशान्य भागात हर्बीन ला जानेवारी महिन्यात जिवघेणी थंडी सुरू होते.  आता तुम्ही विचाराल की किती थंडी? तर साधारण रोजचे तापमान १.८ पर्यंत तर कधी ३१ अंशांपर्यंत पारा खाली उतरतो.

अश्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत हा महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आणि बरेच दिवस चालतो.

बर्फाच्या मोठमोठया अतिभव्य मुर्ती येथे तयार केल्या जातात त्यांची सुंदरता आणि सुबकता पाहाण्याकरीता येथे हजारो पर्यटक एकत्र येतात.

जगातील सर्वात भव्य बर्फाच्या प्रतीमा येथे या मोहोत्सवा दरम्यान पाहायला मिळतात.

बर्फातले विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळले जातात शिवाय गोठवणाऱ्या थंडीत येथील पाण्यात पोहायचा आनंद घेण्याकरता देखील लोक नदीत उतरतात.

  • सोंगक्रान (थायलंड) – Songkran (Thailand)

पारंपारीक पध्दतीने नव्या वर्षाचे स्वागत करण्याची अनोखी परंपरा थायलंड ला पहायला मिळते.

या उत्सवात सकाळी लवकर येथील नागरीक बौध्द मंदिरास भेट देउन बौध्द भिक्खुंना अन्नदान करतात.

सर्व वयोगटातील आबाल वृध्दांच्या प्रतिकात्मक शुद्धीकरता बौध्दाच्या मुर्ती ला जलाभिषेक केला जातो.

घरातील पुर्वजांना श्रध्दांजली वाहाण्याकरता सर्वजण एकत्र येतात, नवीन कपडे परिधान केले जातात, घराची सजावट केली जाते.

सोंगक्रान हा उत्सव खऱ्या स्वरूपात साजरा होतो तो अगदी जंगली स्वरूपात.शहरातील मुख्य रस्ते या उत्सवादरम्यान बंद करण्यात येतात आणि पाण्याचे विविध प्रकारचे खेळ खेळल्या जातात.

जाणाऱ्या येणाऱ्या च्या अंगावर पाणी फेकल्या जाते, पाण्याने भरलेले फुगे एकमेकांना मारण्याचे खेळ खेळले जातात.

या उत्सवात सहभागी होण्याकरता हजारो पर्यटक थायलंड ला या दिवसांमधे येतात.

आशा करतो आपल्याला आज नवीन काही वाचायला मिळाले असेल, आपल्याला जर आमचा लेख आवडला तर या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका. आणि अशेच नवीन काही लेख पाहण्यासाठी आंमच्या majhimarathi.com ला अवश्य भेट दया.

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Unique Villages
Viral Topics

जगातील पाच आगळे वेगळे गावं, पहा काय वेगळ आहे या गावात

आपण जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टींची यादी याआधीही पाहिली आहेच, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूपच वेगळ्या आहेत, आणि या...

by Vaibhav Bharambe
October 19, 2020
Lake Natron Mystery
Viral Topics

…याला हाथ लावला तर मिनिटात बनू शकते आपले शरीर दगडाचे, अजबच आहे ना.

लहानपणी पुस्तकात एक गोष्ट वाचली असेल ज्यामध्ये एका राजाची गोष्ट होती कि तो राजा ज्या गोष्टीला हाथ लावायचा ती गोष्ट...

by Vaibhav Bharambe
October 18, 2020
Story of Mahishasura
Information

दुर्गा मातेने महिषासुराला का मारले? हे होते त्यामागील कारण

Story of Mahishasura पुराणातील कथांच्या नुसार आपल्याला माहिती आहे, महिषासुर एक क्रूर राक्षस होता, त्याच्या अत्याचाराच्या आणि बऱ्याच कथा आपण...

by Vaibhav Bharambe
October 17, 2020
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved