Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जनक बिल गेट्स यांचे प्रेरणादायक जीवन

Bill Gates Mahiti in Marathi 

मित्रानो ज्यांच्या वाट्याला संघर्ष येत नाही अशी माणसं जगात फार वरच्या स्थानावर पोहोचल्याची उदाहरणं आपल्याला कमी पाहायला मिळतात उलट त्या  तुलनेत ज्यांच्या वाट्याला अपार संघर्ष…कष्ट…अपमान येतो ती व्यक्तिमत्व विश्वात असं स्थान प्राप्त करतात कि आपण अवाक् होऊन पहात रहातो…

अश्या उत्तुंग व्यक्तीमत्वांपैकी एक म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जनक बिल गेट्स…या लेखातून त्यांच्याविषयी आपण अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जनक बिल गेट्स यांचे प्रेरणादायक जीवन – Bill Gates Information in Marathi

Bill Gates Information in Marathi

बिल गेट्स यांच्याविषयी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती – Bill Gates Biography in Marathi

पूर्ण नांव (Name) विलियम हेनरी गेट्स
जन्म (Birthday) 28 ऑक्टोबर 1955 सीटल, वॉशिंग्टन, अमेरिका
वडील (Father Name)विलियम एच गेट्स
आई (Mother Name)मेरी मैक्सवल गेट्स
पत्नी (Wife Name) मेलिंडा गेट्स 1994
मुलं (Childrens Name) रोरी जॉन गेट्स, जेनिफर कैथरीन गेट्स,  फोवे अडले गेट्स

बिल गेट्स चा जन्म, बालपण, प्रारंभिक जीवन आणि शिक्षण – Bill Gates History in Marathi

आपल्या उदार अंतकरणा करता ओळखले जाणाऱ्या बिल गेट्स यांचा जन्म २८ ऑक्टोबर 1955 ला अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील सीटल येथे झाला.

त्यांचे वडील विलियम एच गेट्स हे सुप्रसिद्ध वकील होते व त्यांची आई मेरी मैक्सवेल या “युनायटेड वे” आणि “फर्स्ट इंटरस्टेट बँक सिस्टम” च्या बोर्ड्स ऑफ डायरेक्टरर्स मधील एक होत्या.

त्यांना दोन बहिणी देखील होत्या. बालपणी बिल गेट्स यांना ट्रे म्हणुन हाक मारल्या जाई.

बिल गेट्स यांचं शिक्षण – Bill Gates Education

बिल गेट्स हे बालपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि विलक्षण प्रतिभेचे धनी होते.

सुरुवातीपासूनच त्यांना अभ्यासाची फार आवड होती त्यामुळे ते  तासनतास घरात एकटेच अभ्यास करत असत.

1968 साली त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचा दाखला लेकसाइट या खाजगी शाळेत करून दिला.

सुरुवातीला बिल गेट्स सर्वच विषयांमध्ये पारंगत होते पण त्यांचे गणित आणि विज्ञान हे विषय सर्वोत्तम होते.

शाळेतल्या इतर गोष्टींमध्ये देखील ते हिरीरीने सहभागी होत असत.

शाळेतल्या विद्यार्थ्यांना जेंव्हा कम्प्युटर शिकविल्या जात होता तेंव्हापासून बिल गेट्स यांची रुची संगणकात वाढू लागली, ते आपला जास्तीत-जास्त वेळ कम्प्युटर समवेत घालवू लागले.

पुढे वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी बिल गेट्स प्रोग्रामिंग मधे तरबेज झाले आणि एक सॉफ्टवेयर प्रोग्राम म्हणजेच प्रोग्रामिंग कम्प्युटर देखील बनविला.

त्याला “Tic-Tac-Tow” म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर बिल गेट्स सतत कम्प्युटर वर काहीतरी नवीन करण्याकरता आणि प्रोग्रामिंग बनविण्यासाठी धडपडत असत.

ज्या वेळी ते हायस्कूलला पोहोचले तेंव्हा तेथील पेरोल (हजेरी) प्रणाली देखील त्यांनी  संगणीकृत केली. हायस्कूल ला असतांना पॉल एलन या सिनियर विद्यार्थ्यासमवेत बिल गेट्स यांची चांगली मैत्री झाली.

दोघेही शिकण्याच्या उद्देशाने शाळेतील कम्प्युटर मधे काही ना काही करत राहायचे त्यामुळे शाळेत देखील त्याचा त्रास होऊ लागल्याने कम्प्युटर कंपनीने काही काळ त्यावर निर्बंध आणले.

काही दिवसांनी त्यांनी संगणक कक्षात जाण्याची पुन्हा परवानगी मिळवली. पण त्यांना ती या अटीवर मिळाली कि ते तेथे जाऊन प्रोग्राम मधील सर्व एरर काढतील.

त्या दरम्यान बिल गेट्स ने आपल्या मित्र समवेत एक “Traf-O-Data” प्रोग्राम बनविला.

हा प्रोग्राम रहदारी करता काम करत असे आणि त्याला नियोजित करण्यास मदत करी.

हा प्रोग्राम बनविल्याने बिल गेट्स ला $20,000 डॉलर मिळाले होते, ही त्यांची पहिली कमाई होती.

1973 साली शालेय जीवन संपल्यानंतर बिल गेट्स ने हॉवर्ड कॉलेज मधे प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांचा अधिकतर वेळ कम्प्युटर समवेत व्यतीत होत असे.

पुढे कॉलेज सोडून त्यांनी आपला मित्र एलन समवेत बिजनेस करण्याचा निर्णय घेतला.

बिल गेट्स यांची कारकीर्द – Bill Gates Career

  • मायक्रोसॉफ्ट ची स्थापना – Microsoft Established

शालेय जीवनात असतांनाच बिल गेट्स कम्प्युटर बनविण्यात तरबेज झाले होते, वयाच्या जेमतेम 20 व्या वर्षी आपला मित्र पॉल एलन समवेत 1975 साली त्यांनी मायक्रोसॉफ्ट ची स्थापना केली होती.

आज ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी झाली आहे, सुरुवातीस त्यांनी मायक्रो-कम्प्युटर ची प्रसिद्ध प्रोग्रामिंग लैंग्वेज “बेसिक” तयार करून यश मिळविलं,

नंतर ते इतर कंपन्यांसाठी प्रोग्रामिंग लैंग्वेज आणि ऑपरेटिंग सिस्टम डेवलप करू लागले. त्यामुळे अल्पावधीतच सर्वदूर मायक्रोसॉफ्ट कंपनीची ओळख निर्माण झाली.

  • IBM समवेत मायक्रोसॉफ्ट ची डील –  Microsoft And IBM Deal

पुढे 1980 साली विश्वातील सर्वात मोठ्या कंपन्यानपैकी एक IBM (इंटरनेशनल बिजनेस मशीन) ने मायक्रोसॉफ्ट पुढे IBM च्या नव्या पर्सनल कम्प्युटर करीता बेसिक सॉफ्टवेयर बनविण्यासाठी डील ऑफर केली.

या डील नंतर बिल गेट्स च्या कंपनीने IBM करता PC Doc ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली.

  • विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ची सुरुवात –  Windows Operating System Established

10 नोव्हेंबर 1983 ला बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट विंडोज ची घोषणा केली आणि त्यानंतर दोन वर्षांनी 1985 ला मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केली.  

यानंतर येणाऱ्या काही वर्षात जगातील सगळ्या पर्सनल कम्प्युटर वर त्यांच्या या ऑपरेटिंग सिस्टीम Windows ने आपला कब्जा मिळविला.

  • मायक्रोसॉफ्ट चे यश व विश्वातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या रुपात बिल गेट्स –  World Richest Person Bill Gate

मायक्रोसॉफ्ट ने आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मुळे यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत केली.

वास्तविक पर्सनल कम्प्युटर चे जवळ-जवळ 90 टक्के शेयर्स विंडोज  च्या नावावर झालीत आणि त्या दरम्यान मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वात मोठे शेयर होल्डर बिल गेट्स होते.

यामुळे बिल गेट्स यांना मोठा फायदा झाला व 1987 साली  वयाच्या 32 व्या वर्षी ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व ठरले आणि लागोपाठ 11 वर्ष ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होते.

आपल्यातील प्रतिभा आणि विवेकशिलतेने बिल गेट्स लागोपाठ नवनवीन यश संपादन करीत होते, 1989 साली त्यांनी “मायक्रोसॉफ्ट ऑफिस” ची सुरुवात केली.

हे एखाद्या पॅकेज प्रमाणे होते ज्यात मायक्रोसॉफ्ट वर्ड (Microsoft Word), मायक्रोसॉफ्ट एक्सेल (Microsoft Excel ) समवेत अनेक सॉफ्टवेयर एकसाथ सिस्टीम मधे चालवले जाऊ शकत होते.

1990 साली जेंव्हा इंटरनेट चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला त्यावेळी बिल गेट्स देखील इंटरनेट द्वारे सॉफ्टवेयर उपलब्ध करून देण्यात आपलं लक्ष केंद्रित करीत होते.

विंडोज Ce ऑपरेटिंग सिस्टीम प्लेटफॉर्म (Operating System Platform) आणि “दी मायक्रोसॉफ्ट नेटवर्क” (The Microsoft Network) त्यादरम्यानच्या मोठ्या प्रगतीच्या दिशेने टाकलेले पाउल ठरले.

2000 साली बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट च्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि चेयरमैन झाले.

त्यांनी स्वतःकरता “चीफ सॉफ्टवेयर आर्किटेक्ट” हे नवीन पद देखील बनवले.

About Bill Gate

काही वर्ष या पदावर काम केल्यावर 2014 साली त्यांनी चेयरमैन पदाचा देखील राजीनामा दिला आणि मायक्रोसॉफ्ट च्या सीईओ चे एडव्हायजर म्हणून काम करू लागले.

त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णतः दीन, गरजवंत, असहाय्य, लोकांच्या मदतीकरता आणि समाजसेवेकरीता समर्पित केलं.

बिल गेट्स आपल्यातील करूणा, उदारता, आणि महानते करता देखील ओळखले जातात.

बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी 2000 साली गरीब, असहाय्य, आणि गरजवंताच्या मदतीकरता बिल गेट्स आणि मेलिंडा फाउंडेशन ची स्थापना केली.

त्यांचे हे फाउंडेशन विश्वातील सर्वात मोठ्या चैरीटी संस्थानानपैकी एक आहे.

या व्यतिरिक्त 2010 साली बिल गेट्स यांनी विश्वातील सर्वाधिक गुंतवणूक करणारे  वॉरेन बफेट आणि फेसबुक फाउंडर मार्क जूकरबर्ग यांच्या समवेत मिळून एक करार केला.

या करारा नुसार ते आपल्या मिळकतीचा अर्धा भाग दान करतील. शिवाय दरवर्षी भारतात येऊन ते भारतातील गरीब मुलांना मदत करतात

बिल गेट्स यांना मिळालेले पुरस्कार – Bill Gates Awards

  • 2010 साली बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मिलिंडा यांना ते भारतातील मुलांना करीत असलेल्या सहाय्याकरीता भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.
  • 2010 मध्येच मायक्रोसॉफ्टच्या यशासाठी आणि समाजाकरता करत असलेल्या मदतीसाठी फ्रेंक्लीन इंस्टीट्युट तर्फे ‘बोवेर अवॉर्ड” नी गौरविण्यात आलं होतं.
  • 2002 मध्ये सामाजिक कार्याकरता या पती-पत्नींना जेफर्सन अवॉर्ड प्रदान करण्यात आलाय.

बिल गेट्स यांनी लिहिलेली पुस्तकं – Bill Gates Books

  • द रोड अहेड (The Road Ahead)
  • बिजनेस @ द स्पीड ऑफ थॉट ( Business @ The Speed of Thought )

बिल गेट्स यांच्याशी संबंधित महत्वपूर्ण बाबी – Facts About Bill Gates

  • बिल गेट्स यांनी त्यांच्या मित्रांना बोलून देखील दाखवलं होतं कि 30 व्या वर्षी मी मिलेनियर झालेलो असेल आणि बोलल्याप्रमाणे वयाच्या 32 व्या वर्षी ते मिलेनियर झाले होते.
  • त्यांनी फेसबुक फाउंडर मार्क जुकरबर्ग यांना भेटल्या नंतरच फेसबुकवर आपले अकाउंट बनविले होते. त्यापूर्वी ते सोशल-मिडीयावर नव्हते.
  • बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट कंपनी यशस्वी झाली नसती तर त्यांनी इंटलीजंस-ब्युरो त नांव कमावलं असतं.
  • फोर्ब्स मैग्जीनच्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तब्बल 11 वर्ष बिल गेट्स याचं नांव पहिल्या क्रमांकावर होतं.

बिल गेट्स यांनी आपल्या मुलांना फक्त 10 मिलियन डॉलर दिले आहेत.

आपल्यातील उपजत प्रतिभेच्या बळावर बिल गेट्स यांनी स्वतःला विश्वातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तिमत्व म्हणून स्थापित केलं.

त्याचं अवघं जीवन सर्वान करताच प्रेरणादायक आहे.

प्रत्येकानं त्यांच्याकडून कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत, आणि त्यातून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा नक्कीच आत्मसात करायला हवी.

असेच नवीन माहितीपर लेख वाचण्यासाठी माझी मराठी सोबत कनेक्ट रहा.

तसेच या लेखाला फेसबुक वर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved