Sunday, May 4, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १७ मे रोजी येणारे दिनविशेष

17 May Dinvishes

मित्रांनो, आज जागतिक दूरसंचार दिन. दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. इ.स. १८६५ साली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना करण्यात आली होती.  दूरसंचारची महत्व तसचं त्याची जागरूकता पसरविण्यासाठी दर वर्षी १७ मे ला जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. दूरसंचाराच्या क्रांतीमुळे आज विश्वभर खूप मोठ्या परमाणात बद्दल घडून आले आहेत. दूर असलेल्या व्यक्ती सोबत संपर्क करणे शक्य झाले आहे. पृथ्वीवर घडलेला हा एक अविस्मरणीय बदलच म्हणव लागेल.

याव्यतिरिक्त, आज इतिहास काळात ब्रिटीश कालीन भारतातील सर्वात मोठी घटना घडली होती. मराठा आणि ब्रिटीश सरकारच्या इस्ट इंडिया कंपनी यांच्यात सात वर्षांपासून सुरु असलेले पहिले मराठा- इंग्रज युद्ध महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने सालबाईचा तह करून संपले. हे युद्ध जवळपास सात वर्षे सुरु होत.

याशिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहासात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनां  जाणून घेणार आहोत. तसचं, जगातील काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १७ मे रोजी येणारे दिनविशेष – 17 May Today Historical Events in Marathi

17 May History Information in Marathi
17 May History Information in Marathi

१७ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 May  Historical Event

  • इ.स. १७५६ साली ब्रिटन देशाने फ्रांस देशाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • इ.स १८६५ साली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना करण्यात आली होती त्याची स्मृती म्हणून सर्वप्रथम विश्व दूरसंचार दिवस साजरा करण्यात आला.
  • १९४९ साली भारताने राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
  • सन १९९० साली जागतिक आयोग्य संघटनेने आजारांच्या यादीमधून समलैंगिक मानसोपचार आजारास काढून टाकले.
  • २००४ साली अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स हे राज्य समलिंगी लग्नाला कायदेशीर परवानगी देणारे जगातील सहावे कार्यक्षेत्र बनले.

१७ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७४९ साली देवीच्या लसीचे जनक इंग्रज शरीरशास्त्रज्ञ डॉ. एडवर्ड जेन्नर यांचा जन्मदिन.
  • १८६५ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय महाराष्ट्र राज्यातील मराठ्यांच्या तीन खंडाचा इतिहास इंग्रजीमध्ये लिहणारे महाराष्ट्रीयन इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८७८ साली मुंबई प्रांताचे पहिले भारतीय राज्यपाल व महाराज हरि सिंह यांच्या कारकिर्दीतील जम्मू-काश्मीर प्रांताचे पंतप्रधान व जोधपुर चे दिवाण कपुरथला राजघराण्याचे राजा हरनाम सिंह यांचे पुत्र महाराजा सिंह यांचा जन्मदिन.
  • १८९५ साली भारतीय आसामी इतिहासकार, नाटककार, निबंधकार आणि लघुकथा लेखक नकुलचंद्र भुयान यांचा जन्मदिन.
  • १९३४ साली अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील निवृत्त व्यावसायिक तसचं, अमेरिकन संगणक कंपनी ॲपल चे सहसंस्थापक रोनाल्ड वेन यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज व माजी भारतीय क्रिकेटपटू भागवत सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा जन्मदिन.
  • १९५१ साली सुप्रसिद्ध भारतीय गझल गायक पंकज उदास यांचा जन्मदिन.
  • १९७९ साली सुप्रसिद्ध भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्मदिन.

१७ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 May Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९७२ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्र राज्यातील शिल्पकार रघुनाथ कृष्णा फडके यांचे निधन.
  • २००९ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता प्रकाश मेहरा यांचे निधन.
  • सन २०१४ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय हॉटेल व्यावसायिक व उद्योजक तसचं, हॉटेल लीला समूहाचे संस्थापक सी.पी. कृष्णन नायर यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved