Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

“सुशांत सिंग राजपूत” बॉलीवूड चा अनमोल हिरा

Sushant Singh Rajput

देशात अनेक असे अभिनेते आहेत ज्यांनी कमी वेळात स्वतःला सिध्द केलं आहे, आणि सुशांत सिंग राजपूत त्या अभिनेत्यांपैकी एक होते. ज्यांनी स्वतःच्या करियर ची सुरुवात एका छोट्याश्या पडद्यावरून केली होती. मुंबई मध्ये दररोज बरेचशे लोक अभिनेते बनण्यासाठी येतात, पण प्रत्येकाला ते यश मिळत नाही. सुशांत सिंग  हे एक अस व्यक्तित्व होत की लोकांना त्यांचा अभिनय पाहायला आवडत असे. त्यांच्या करियर ची सुरुवात एका छोट्या टीव्ही शो पासून झाली होती. ती टीव्ही सिरीयल होती “पवित्र रिश्ता”.

या सिरियल मध्ये लोकांनी सुशांत आणि अंकिता लोखंडे या दोघांच्या जोडीला खूप पसंती दिली होती. आणि या सिरीयल नंतर सुशांत सिंग राजपूत यांना एक वेगळी ओळख मिळाली होती. ती होती मानव या नावाची. कारण त्यांनी पवित्र रिश्ता सिरीयल मध्ये मानव देशमुख हे एक पात्र साकारले होते. जाणुया त्यांच्या जीवनाबद्दल –

“सुशांत सिंग राजपूत” बॉलीवूड चा अनमोल हिरा – Sushant Singh Rajput in Marathi

Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput

सुशांत सिंग राजपूत यांची माहिती – Sushant Singh Rajput Information

नाव (Name)सुशांत सिंग राजपूत
जन्म (Birthday)२१ जानेवारी १९८६ पटना, बिहार
आई (Mother Name)उषा सिंग
वडील (Father Name)कृष्ण कुमार सिंग (के. के सिंग)
मृत्यू (Death)१४ जून २०२०, मुंबई

सुशांत सिंग राजपूत यांच प्रारंभिक जीवन – Sushant Singh Rajput Biography in Marathi

सुशांत सिंग राजपूत यांचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी बिहार च्या पटना शहरात झाला. त्यांच्या परिवारात त्यांचे वडील आणि चार बहिणी आहेत, त्यांच्या आईचा मृत्यू २००२ मध्ये झाला होता. तेव्हा पासून त्यांच्या बहिणींनी त्यांना कधी आईची कमतरता कधी भासू दिली नव्हती. त्यांचे वडील एक सरकारी कर्मचारी होते.

सुशांत सिंग राजपूत याचं शिक्षण – Sushant Singh Rajput Education

सुशांत चे सुरुवातीचे शिक्षण पटना च्या करेंस हायस्कूल मध्ये झाले होते आणि पुढचे शिक्षण घेण्याकरता ते दिल्लीला गेले होते. दिल्लीला त्यांनी कुलाची मॉडर्न स्कुल मध्ये आपले शिक्षण सुरू ठेवले. त्यांनंतर त्यांनी आपली मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी दिल्लीच्या दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथून मिळवली होती.

सुशांत सिंग राजपूत यांच करिअर – Sushant Singh Rajput Career

जेव्हा सुशांत दिल्लीला होते तेव्हा त्यांनी आपल्या मित्रांसोबत डान्स क्लास जॉईन केले होते, ज्या डान्स क्लासला ते जात होते तेथील त्यांच्या काही मित्रांनी एका ड्रामा क्लासला सुद्धा जॉईन केले होते. त्यांनंतर मित्रांच्या संगतीने सुशांत ने सुध्दा त्या क्लासेसला जॉईन करण्याचे ठरवले. काही दिवसानंतर त्यांना स्वतःला समजले की आपण यामध्ये आपले भविष्य बनवायला हवं. त्यानंतर त्यांची निवड शियामक दावर च्या डान्स ग्रुप मध्ये झाली.

सोबतच होणाऱ्या ५१ व्या फिल्मफेयर अवार्ड च्या बॅगराउंड मध्ये डान्स करण्यासाठी सुध्दा त्यांची निवड झाली होती. ते त्यांचे काम एवढं छान रित्या करत होते की हे सर्व झाल्यावर सुध्दा २००६ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्यांची निवड झाली होती. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता ते बरेच वेळा इंजिनियरिंग च्या पेपर मध्ये नापास सुध्दा झाले होते. पण त्यांनी ठरवलं होतं की त्यांना आता अभिनयात आणि डान्स मध्ये स्वतःच करियर बनवायचं आहे.

सुशांत सिंग राजपूत यांचे टीवी शो – Sushant Singh Rajput TV Shows

म्हणून ते लगेच २००६ मधेच स्वतःच्या भविष्याला उज्वल बनविण्यासाठी मुंबईला निघून गेले. २ पेक्षा अधिक वर्ष त्यांनी एका छोट्या थिएटरमध्ये काम केले. जेथे त्यांचा अभिनयाला खुप पसंत केल्या गेलं याच दरम्यान तेथे बालाजी टेलिफिल्म कंपनी च्या लोकांनी त्यांना अभिनय करताना पाहिले तेव्हा सुशांत ला त्यांनी ऑडिशन देण्यासाठी बोलावलं आणि सुशांत चे ऑडिशन पाहून त्यांनी सुशांत ला “किस देश में है मेरा दिल” या टिव्ही शो मध्ये एक छोटासा रोल दिला.

लोकांनी त्यांच्या या अभिनयाला इतकी पसंती दिली की ज्या रोल मध्ये त्यांची मृत्यू होताना दाखवली होती त्या रोल ला पुन्हा आत्मा च्या रुपात लोकांसमोर आणाव लागलं होतं. मग यानंतर त्यांनी “पवित्र रिश्ता” सिरीयल मध्ये आपल्या अभिनयाची लोकांवर एक वेगळी छाप टाकली, आणि सुरू झाली तेथून त्यांची बॉलिवूड मध्ये जाण्याची सुरुवात, यानंतर त्यांनी बरेचशे डान्स चे रियालिटी शो केले आणि त्यामध्ये त्यांनी अवॉर्ड सुध्दा जिंकले. जसे २०१० मध्ये “जरा नचके दिखा २” आणि “झलक दिखला जा ४” यासारख्या शो चे ते विजेता राहिले होते.

सुशांत सिंग राजपूत यांचे बॉलिवूड चित्रपट – Sushant Singh Rajput Movies List

या दरम्यान त्यांना अभिषेक कपूर च्या काई पो ची चित्रपटात काम करण्यासाठी सुध्दा निवडल्या गेले, ह्या चित्रपटाची कथा चेतन भगत यांच्या कादंबरी “थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ” यावर आधारित होती. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर करोडोंची कमाई केली होती. त्यांनंतर त्यांनी बरेच यशस्वी चित्रपट बॉलिवूड ला दिले, जसे

  • राब्ता,
  • केदारनाथ
  • पीके,
  • शुद्ध देसी रोमांस,
  • एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी,
  • छिछोरे

इत्यादी त्यांना या चित्रपटांपैकी सर्वात जास्त प्रसिद्धी ही भारताचे पूर्व कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित २०१६ मध्ये आलेल्या चित्रपटानंतर मिळाली. कारण हा २०१६ मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट बनला होता.

सुशांत सिंग राजपूत यांच निधन – Sushant Singh Rajput Death

एवढ्या कमी वयात त्यांनी यशाचे शिखर गाठले होते, पण सुशांत ने मुंबई च्या बांद्रा येथे आपल्या राहत्या घरी १४ जून २०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी सर्वांना धक्का देणारी होती. संपूर्ण बॉलिवूड जगाला त्यांच्या मृत्यू मुळे एक धक्का बसला होता. कारण बॉलिवूड इंडस्ट्री ने एक अनमोल हिरा गमावला.

कोणालाही या गोष्टीची कल्पना नव्हती की सुशांत आपल्या जीवनात या प्रकारचे पाऊल उचलणार. त्यांच्या मृत्यूच्या मागचे कारण अजून समोर आलेले नाही पण बऱ्याच मित्रांच्या संपर्कातुन हे माहिती झाले आहे की मृत्यू च्या काही दिवसांपूर्वी ते डिप्रेशन चे शिकार झालेले होते. आणि ते त्यासाठी काही औषधे सुध्दा घेत होते.

त्यांच्या मृत्यू मुळे संपूर्ण देशातून आज शोक व्यक्त केल्या जात आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो!

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved