Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ९ जुलै रोजी येणारे दिनविशेष

9 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यामतून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांची शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाऊन घेणार आहोत.

जाणून घ्या ९ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 9 July Today Historical Events in Marathi

9 July History Information in Marathi
9 July History Information in Marathi

९ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 July Historical Event

  • इ.स. १८७५ साली भारतातील पहिला स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई स्टॉक एक्सचेंज ची स्थापना मुंबईतील दलात स्ट्रीट येथे करण्यात आली.
  • इ.स. १८७७ साली इंग्लंड देशांत लॉंन च्या कोर्टवर खेळली जाणारी सर्वात जुनी टेनिस स्पर्धा विंबलडन चॅम्पियनशिपला सुरुवात करण्यात आली.
  • इ.स. १८८९ साली अमेरिकेतील प्रसिद्ध वर्तमानपत्र द वॉल स्ट्रीट चे प्रकाशन करण्यात आले.
  • इ.स. १८९३ साली अमेरिकन सर्जन डॉ. डॅनियल हेल (Daniel Hale Williams) यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो इथे केली.
  • सन १९४४ साली ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
  • सन १९५१ साली भारतातील पहिली पंचवार्षिक योजनेला सुरुवात करण्यात आली.
  • सन १९६९ साली राष्ट्रीय वन्यजीव विभागातर्फे वाघाला भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला.
  • सन १९९१ साली दक्षिण आफ्रिका देशाला ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्यास पुन्हा परवानगी मिळाली.

९ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८१९ साली शिलाई मशीनचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक एलिआस हॉवे (Elias Howe) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८४५ साली ब्रिटीश कालीन भारतातील सन १९०५-१९१० काळातील व्हाईसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड मिण्टो (Lord Minto) द्वितीय यांचा जन्मदिन.
  • सन १९०० साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व माजी संसदीय कार्यमंत्री तसचं, मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सत्य नारायण सिन्हा यांचा जन्मदिन.
  • सन १९२१ साली भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य तसचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि जनसंघ या राजकीय पक्षाचे पहिले सरचिटणीस व भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रादेशिक अध्यक्ष रामभाऊ म्हाळगी यांचा जन्मदिन.
  • सन १९२५ साली गुरु दत्त म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व अभिनेते वसंत कुमार शिवशंकर पादुकोण यांचा जन्मदिन.
  • सन १९३८ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते हरिभाई जरीवाला उर्फ संजीव कुमार यांचा जन्मदिन.
  • सन १९४४ साली आधुनिक दक्षिण आशियाचे ब्रिटीश इतिहासकार व शैक्षणिक ज्युडिथ मार्गारेट ब्राउन (Judith M. Brown) यांचा जन्मदिन.

९ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 July Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८६५ साली इटलीचे महान रसायनशास्त्रज्ञ अमेडिओ अवोगॅड्रो (Amedeo Avogadro) यांचे निधन.
  • सन १९१० साली व्हिक्टोरिया क्रॉसचा प्राप्तकर्ता ब्रिटीश सैन्य अधिकारी मेजर जॉर्ज मुरे रोलँड (Major George Murray Rolland) यांचे निधन.
  • सन १९३२ साली अमेरिकन उद्योगपती किंग सी. जिलेट(King C. Gillette) यांचे निधन.
  • सन १९४४ साली युद्धप्रसंगी राष्ट्रकुल सैन्याला पुरविल्या जाणार्‍या सेवाप्रसंगी शत्रूच्या सामन्यात शौर्याचा सर्वात उच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉसचे विजेता फ्रँक गेराल्ड ब्लॅकर (Frank Gerald Blaker) यांचे निधन.
  • सन १९६८ साली भारतीय महाराष्ट्रीयन तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ञ तसचं, महाराष्ट्रातील वारकरी भक्ती संप्रदायाचे एक महत्त्वाचे भाषांतरकार सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. हा. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन.
  • सन २००५ साली महाराष्ट्र राज्याचे माजी नगरविकासमंत्री व लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचे निधन.
  • सन २००५ साली प्रसिद्ध इराणी भाषांतरकार, संपादक, कोशकार आणि सहित्यीक समिक्षक  करीम इमामी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved