Monday, May 5, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ५ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

5 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती, तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्ती, तसचं, निधन पावणारे व्यक्ती, शोधकार्य इत्यादी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आपण रस्त्यांनी चालत असतांना आपल्याला ठिकठिकाणी चौकाचौकात ट्राफिक सिग्नल हे लावलेले दिसतात. या सिग्नलचा उपयोग हा वाहन चालविताना होत असतो. आपण सर्वांना या ट्राफिक सिग्नलच्या नियमांचे काठेकोरपणे पालन कराव लागते. ही आपली एक महत्वपूर्ण जबाबदारी आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. अस न केल्यास आपल्याला दंड सुद्धा भरावा लागतो.

मित्रांनो, आपणास माहिती आहे का, या ट्राफिक सिग्नलची सुरुवात कधी व कोणत्या ठिकाणी झाली? सन ५ ऑगस्ट १९१४ साली अमेरिकेमध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिक ट्राफिक सिग्नल लाईट सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला हे सिग्नल केवळ लाल आणि हिरव्या या दोनच रंगामध्ये उपलब्ध होते. एक गाडी थांबण्यासाठी व दुसरी समोर जाण्यासाठी. यानंतर यात तिसरी म्हणजे पिवळ्या रंगाची लाईट सुधा लावण्यात आली.

जाणून घ्या ५ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 5 August Today Historical Events in Marathi

5 August History Information in Marathi
5 August History Information in Marathi

५ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 August Historical Event

  • सन १९१४ साली अमेरिकेत प्रथम इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाईट सिस्टम स्थापित केले गेले.
  • सन १९१४ साली प्रथम विश्वयुद्धात क्यूबा, उरुग्वे, मेक्सिको आणि अर्जेंटिना या देशांनी तटस्थ राहण्याची घोषणा केली.
  • सन १९६५ साली पकिस्तानच्या वाढत चाललेल्या घुसखोरीमुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली.
  • सन १९६२ साली देशांतील संपावर गेलेल्या कामगारांना चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी आणि पासपोर्टविना देश सोडून जाण्याच्या आरोपाखाली नेल्सन मंडेला यांना तुरुंगवास भोगावा लागला.
  • सन १९९१ साली दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान होणाऱ्या न्यायमूर्ती लीला सेठ या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
  • सन २०११ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या वैज्ञानिकांनी सायन्स मासिकेमध्ये मंगळ ग्रहावर प्राणी असल्याचा दावा केला.

५ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८५० साली फ्रेंच लघुकथाकार व लेखक गाय दी मोपासां(Guy de Maupassant) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८५२ साली ब्रिटीश कालीन भारतातील उडीसा राज्यातील राष्ट्रवादी स्वातंत्रता सेनानी आचार्य प्यारे मोहन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८५८ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन खरे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९० साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन इतिहासकार, लेखक आणि वक्ते तसचं, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू दत्तात्रय वामन पोतदार उर्फ दत्तो वामन पोतदार यांचा जन्मदिन.
  • सन १९०१ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री पं. द्वारका प्रसाद मिश्रा यांचा जन्मदिन.
  • सन १९१५ साली पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, सन्मानित प्रख्यात हिंदी कवी व शिक्षणतज्ञ शिवमंगल सिंग ‘सुमन’  यांचा जन्मदिन.
  • सन १९३० साली अमेरिकन अंतराळवीर आणि वैमानिकी अभियंता तसचं, चंद्रावर पाय ठेवणारे पहिले व्यक्ती नील एल्डन आर्मस्ट्राँग(Neil Armstrong) यांचा जन्मदिन.
  • सन १९३३ साली महाराष्ट्रातील मराठी लेखिका व समिक्षक, तसचं, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विजया राजाध्यक्ष यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी वीरेन डंगवाल यांचा जन्मदिन.
  • सन १९६९ साली माजी भारतीय क्रिकेटपटू बापू कृष्णराव व्यंकटेश प्रसाद यांचा जन्मदिन.
  • सन १९७५ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री काजोल यांचा जन्मदिन.

५ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 5 August Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८९५ साली जर्मन तत्त्ववेत्ता, इतिहासकार, साम्यवादी, सामाजिक शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार आणि व्यवसायिक फ्रेडरिक एंगेल्स(Friedrich Engels) यांचे निधन.
  • सन १९५० साली भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी व आसाम राज्याचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांचे निधन.
  • सन १९९२ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकीय नेते तसचं, भारतीय समाजवादी पक्षाचे संस्थापक अच्युत पटवर्धन यांचे निधन.
  • सन २००० साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार लाला अमरनाथ यांचे निधन.
  • सन २०१४ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार प्राण कुमार शर्मा यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved