Home / Marathi Biography / काजोलची न ऐकलेली कहानी | Kajol Biography in Marathi

काजोलची न ऐकलेली कहानी | Kajol Biography in Marathi

काजोल  / Kajol हि भारतीय अभिनेत्री आहे जिने आपल्या सुन्दर अभिनयाने व नृत्याने अनेक सिनेमा रसिकांची मन जिंकली. काजोल हिने अनेक अवार्ड सुद्धा जिंकले आहेत. ज्यामध्ये ६ फिल्मफेयर, १२ फिल्मफेयर नामांकन यांचा समावेश आहे. यासोबतच तिने ५ वेळा बेस्ट अॅक्टरेस फिल्मफेयर अवार्ड सुद्धा जिंकला आहे. जो एक रेकॉर्ड मानल्या जातो. भारत सरकारने तिला २०११ मध्ये चौथा सर्वोच्च सन्मान पद्मश्री ने सन्मानित केले होते.

Kajol Biography

काजोलची न ऐकलेली कहानी – Kajol Biography in Marathi

काजोलचा जन्म मुंबई यथील मुखर्जी-समर्थ ह्या फिल्मी परिवारात झाला. तिची आई तनुजा समर्थ ह्या एक सुंदर अभिनेत्री होत्या. काजोलचे वडील शोमु मुखर्जी प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर – प्रोडुसर होते. २००८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. काजोल हिस एक धाकटी बहिण तनिशा आहे जी एक अभिनेत्री आहे.

काजोल चा संबंध प्रसिद्ध समर्थ परिवाराशी आहे. ज्याने आपल्या सर्व पिढ्या फिल्मी दुनियात काम करीत आलेले आहे. काजोलची आजी शोभा समर्थ एक उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. काजोल ची मावशी नूतन एक प्रतिष्ठित अभिनेत्री होत्या. काजोलचे काका जोय मुखर्जी व देव मुखर्जी उत्कृष्ट अभिनेता व निर्माता होते. तिचे आजोबा दादा सशाधार मुखर्जी एक फिल्म निर्माता होते.

काजोलच्या चुलत बहिण भावात – राणी मुखर्जी, शिबानी मुखर्जी ,मोहनीश बहल जे प्रसिध्द नायिका व नायक आहेत. जे सर्व बोलीवूड्शी संबंधित आहेत.

काजोलच्या मते तिचे बालपणी ती खूपच खोळकर आणि उत्साही होती. किशोरावस्थेमध्ये ती फारच जिद्दी होती. बालपणीच मातापिता विभक्त झाले असले तरी तिच्या आजीने तिच्या आईची कमी तिला कधीच वाटू दिली नाही. आपल्या महाराष्ट्रीयन व बंगाली यांच्या मिलापाच्या सांस्कृतिक वातावरणात काजोल वाढली आहे. वडिलांकडील सर्व मंडळीशी भेटायची व त्यांची ती फारच लाडली होती.

काजोलचे शिक्षण पांचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट बोर्डिंग स्कूल येथे झाले. खेळामध्ये फार आवड असलेली काजोल चांगली धावक होती. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ती नृत्य व अभिनय करायची बारावीत असताना बेखुदी (१९९२) या चित्रपटात राहुल रवैल या नायकासोबत चित्रपट नायिका म्हणून काम सुरु केले.

अभिनयाचा शौक आता करियर बनला पाहिजे यासाठी तिने बारावी पूर्ण करून फक्त अभिनय करायचा असे ठरविले. सोबतच अभिनयाचे धडे हि घेतले रक्तातच अभिनय असल्यामुळे हे क्षेत्र तिला फारशे वेगळे वाटले नाही. बाजीगर (१९९३) हि फिल्म सुपरहिट ठरली. यानंतर तिने फिल्म इंदास्त्रीस अनेक सुपरहिट रोमांटिक चित्रपट दिले.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५) हि फिल्म तिच्या करीयरची सर्वोत्कुष्ट फिल्म ठरली. शाहरुख सोबत तिची जोडी खूपच पसंत केली गेली. त्यानंतर दीग्गज स्तर सलमान सोबत प्यार किया तो डरना क्या (१९९८) प्यार तो होना हि था (१९९८), कुछ कुछ होता है (१९९८) तसेच कभी ख़ुशी कभी गम (२००१) फिल्म तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाची साक्ष देतात.

१९९७ मधील गुप्त आणि १९९८ मधील इश्क, दुश्मन हे चित्रपट हित ठरले यामधे काजोल नायकापेक्षा अधिक दमदार दिसली तिच्या सहज अभिनयाने आलोचकांचे तोंड बंद केले होते. १९९९ साली अभिनेता अजय देवगन यांच्याशी विवाहानन्तर ती आपल्या परिवारातच मग्न झाली. तिला एक गोंडस मुलगी व् एक मुलगा आहे. २००८ साली फ़ना ही चित्रपट हित ठरला. नंतर यु, मी और हम केलि. २०१० मधे माय नेम इज खान ही फिल्म केलि जी हीट ठरली.

काजोल भारतीय फिल्म इंडस्ट्रीची सर्वात यशस्वी अभिनेत्री मधून एक गणल्या जाते.

फिल्मी दुनियेसोबतच काजोल सामाजिक कार्यात सहभागी होते. विधवा व अनाथ बालकांसाठी विविध संघटनांशी ते जुलेलेली आहे. महाराष्ट्र सरकारने २००८ मध्ये काजोलला या योगदानासाठी कर्मवीर पुरस्कार देवून सन्मानित केले.

टी.व्ही.शो “रॉक अॅड रोल फमिली” ची काजोल जज बनली. आपल्या पतीच्या देवगन एनटरटेंटमेन्ट एंड सोफ्टवेअर लिमिटेड ची चेयरपर्सन आहे.

काजोल चे व्यक्तिगत आयुष्य

काजोल बालपणापासून उत्साही आणि खंबीर मनाची मुलगी होती. जोडीदार निवडतांना अजय देवगण यास डेट करून लगेच लग्न उरकवले. त्यांच्या रंगाच्या वेगळेपनास झुगारून मला जे योग्य वाटत ते मी करतेच हे सिद्ध केले. पंजाबी परिवाराचा अजय एक प्रसिध्द अभिनेता व नावाजलेल्या विरू देवगण या फाईटमास्टर निर्मात्याचा मुलगा. स्वभावाने शांत व शरमेचा अजय काजोलला भावला.

अंततः २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये काजोल आणि अजय यांचा विवाह झाला. लग्न सोहळा महाराष्ट्रीयन पद्धतीने केल्या गेला.

काजोलचे सर्वोत्तम चित्रपट

  • दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
  • प्यार तो होना हि था
  • कुछ कुछ होता है
  • कभी ख़ुशी कभी गम
  • माय नेम इज खान
  • वी आर फॅमिली
  • दिलवाले

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी काजोल बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा काजोलची न ऐकलेली कहानी  –  Kajol Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Kajol Biography – काजोल यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

प्रसिध्द कवयित्री संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती…

Sant Muktabai Information in Marathi महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखले जाते या संतामध्ये ज्याप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *