Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १३ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 13 August Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा विश्व डावखुरा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. विश्वात डाव्या हाताने काम करण्याचा फायदा आणि तोटा यातील महत्व लोकांना समजावून  सांगण्यासाठी दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक डावखुरा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याव्यतिरिक्त, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १३ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 13 August Today Historical Events in Marathi

13 August History Information in Marathi
13 August History Information in Marathi

१३ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 August Historical Event

  • इ.स. १६४२ साली डच खगोलशास्त्रज्ञ क्रिश्चियन ह्यूगेंस(Christian Hughes) यांनी मंगळाच्या दक्षिण ध्रुवाचे शिखर शोधले.
  • सन १९१३ साली ब्रिटीश शास्त्रज्ञ हॅरी ब्रेअर्ली शेफिल्ड (Harry Brearley Sheffield ) यांनी स्टेनलेस स्टील चा शोध लावला.
  • सन १९५४ साली हाफिज जुलुंध्री यांनी लिहिलेल्या गीताला पाकिस्तान देशाचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याचे सर्वप्रथम रेडिओ पाकिस्तानवर जाहीरपणे प्रकाशण करण्यात आले.
  • सन १९६० साली आफ्रिका देश फ्रेंच वसाहती मधून स्वतंत्र झाला.
  • सन १९६१ साली पूर्व जर्मनीने आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होत असलेले स्थलांतर रोखण्यासाठी सीमा बंद करण्याकरिता बर्लिनची भिंत बांधण्यास सुरुवात केली.
  • सन २००४ साली ग्रीस मधील अथेन्स या प्रांतात २८ व्या ऑलम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१३ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८८८ साली दूरदर्शन संचाचे जनक स्कॉटिश अभियंता व संशोधक जॉन लोगी बेअर्ड(John Logie Baird) यांचा जन्मदिन
  • इ.स. १८९० साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी बालकवी व निसर्ग कवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचा जन्मदिन
  • इ.स. १८९८ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कवी, शिक्षणतज्ज्ञ, मराठी संपादक आणि प्रखर वक्ते प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९९ साली ब्रिटीश चित्रपट दिग्दर्शक व निर्माता सर अल्फ्रेड जोसेफ हिचकॉक(Alfred Hitchcock) यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व मराठी चित्रपट दिग्दर्शक विश्वनाथ चिंतामण बेडेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९२६ साली क्युबा राष्ट्राचे क्रांतिकारक व राजकारणी तसचं, क्युबा राष्ट्राचे माजी राष्ट्राध्यक्ष फिदेल कास्त्रो यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री, भरतनाट्यम नर्तक, कर्नाटकी गायक, नृत्यदिग्दर्शक आणि माजी संसद सदस्या वैजयंतीमाला यांचा जन्मदिन.
  • सन १९६३ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री व निर्माता श्रीदेवी यांचा जन्मदिन.
  •  त्यांनी तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
  • सन १९८३ साली भारतीय बुद्धीबळ (९ वे) ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्मदिन.

१३ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 August Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १७९५ साली मराठा माळवा राज्याच्या शासिका महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन.
  • सन १९३६ साली ब्रिटीश कालीन भारतातील मुंबई प्रांतातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य क्रांतिकारक महिला मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन.
  • भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ‘वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकविला होता.
  • सन १९४६ साली प्रख्यात इंग्लिश विज्ञानकथाकार व लेखक एच. जी. वेल्स (H. G. Wells) यांचे निधन.
  • सन १९८० साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी भाषिक अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक व लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे तथा पु. भा. भावे यांचे निधन.
  • सन १९८५ साली अमेरिकन उद्योजक व उद्योगपती तसचं, मॅरियट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट(John Willard Marriot) यांचे निधन.
  • सन १९८८ साली  भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व पटकथा लेखक तसचं, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे निधन.
  • सन २००० साली प्रसिद्ध पाकिस्तानी पॉप गायक-गीतकार, वकील आणि सामाजिक कार्यकर्ता नाझिया हसन यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved