Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १२ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

 12 September Dinvishes

मित्रांनो, आज १२ सप्टेंबर आजच्या इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी देश विदेशात अनेक घटना घडल्या त्या घटनांची संपूर्ण माहिती तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन व निधन पावणाऱ्या व्यक्तींबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १२ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 12 September Today Historical Events in Marathi

12 September History Information in Marathi
12 September History Information in Marathi

१२ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 September Historical Event

  • इ.स. १७८६ साली ब्रिटीश इस्ट इंडियाचे अधिकारी लॉर्ड कॉर्नवॉलिस(Charles Cornwallis) हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले.
  • इ.स. १८७३ साली टाइपराइटर पहिल्यांदा ग्राहकांना विकण्यात आले.
  • सन १९५९ साली रशियन मानवरहित चांद्रयान ल्युना २ हे लूना 8 के 72 एस / एन आय 1-7 बी रॉकेटच्या साह्याने प्रक्षेपित करण्यात आले.
  • सन १९६६ साली भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी डार्डानेल्स खाडी पार केली.
  • सन २००५ साली हाँगकाँग मध्ये डिस्नेलँड पार्क सुरु करण्यात आला.
  • सन २०११ साली हल्ल्यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एक समर्पण समारंभ पार पडल्यानंतर न्यूयॉर्क शहरातील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु करण्यात आलं.

१२ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९४ साली भारतीय आधुनिक बंगाली साहित्यातील प्रतिष्ठित लेखक व कादंबरीकार बिभूतिभूषण बंधोपाध्याय यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९७ साली रेडियम धातूचा शोध लावणाऱ्या प्रख्यात अमेरिकन नोबल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ इरीन ज्योलियो-क्युरी(Irène Joliot-Curie) यांचा जन्मदिन.
  • सन १९१२ साली देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे पती व भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार तसचं, नॅशनल हेराल्ड आणि नवजीवन या वृत्तपत्राचे प्रकाशक फिरोज गांधी यांचा जन्मदिन.
  • सन १९३० साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय मल्ल्याळ भाषिक कवी, साहित्यिक समिक्षक तसचं, प्राचीन भारतीय सौंदर्यशास्त्र आणि साहित्य परंपरा क्षेत्रांचे अभ्यासक डॉ. के. अयप्पा पाणिकर यांचा जन्मदिन.
  • सन १९६६ साली भारतीय-अमेरिकन संगणक वैज्ञानिक व  हार्वर्ड जॉन ए. पॉलसन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड एप्लाइड सायन्सेसमध्ये गॉर्डन मॅकके कॉम्प्यूटर सायन्सचे प्राध्यापक मधु सूदन यांचा जन्मदिन.

१२ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 September Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९२६ साली महाराष्ट्रीयन मराठी साहित्यसंशोधन आणि ग्रंथाकार. महाराष्ट्र सारस्वत ह्या प्राचीन मराठी साहित्येतिहासग्रंथाचे कर्ते तसचं, ठाणे येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संस्थापक विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.
  • सन १९५२ साली लोकप्रिय भारतीय कर्नाटकी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्यातील गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांचे निधन.
  • सन १९७१ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध शंकर-जयकिशन जोडीतील एक लोकप्रिय संगीत दिग्दर्शक जयकिशन द्याभाई पंचाल यांचे निधन.
  • सन १९८० साली महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट सृष्टीतील व रंगमंच अभिनेते सतीश दुभाषी यांचे अपघाती निधन झाले.
  • सन १९९२ साली पद्मविभूषण पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय जयपूर येथील अत्रोली घराण्यातील शास्त्रीय गायक मल्लिकार्जुन बी मंसूर यांचे निधन.
  • सन १९९६ साली भारतीय चित्रपट, दूरदर्शन व रंगमंच अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved