Monday, May 5, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ११ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

11 October Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी आपल्या इतिहास काळात घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना तसेच, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य याबद्दल जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ११ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 11 October Today Historical Events in Marathi

11 October History Information in Marathi
11 October History Information in Marathi

११ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 October Historical Event

  • इ.स. १७३७ साली कलकत्ता शहरात विनाशकारी चक्रीवादळ आलं होत.
  • सन १९१० साली थिओडोर रुझवेल्ट(Theodore Roosevelt) हे विमानात प्रवास करणारे पहिले अमेरिकेचे अध्यक्ष बनले.
  • सन १९६८ साली अमेरिकेच्या प्रथम मानवनिर्मित ओपोलो मिशन ‘अपोलो७’ चे प्रक्षेपण प्रथम दूरदर्शन वर दाखविण्यात आले.
  • सन २००१ साली ‘पोलरॉईड कार्पोरेशन’ ने दिवाळखोरी जाहीर केली.
  • सन २०१९ साली आंध्रप्रदेश राज्याच्या कुरुनुल या ठिकाणी थर्ड जनरेशन एंटीटैंक गाईडेड मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले.

११ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७७ साली भारतीय बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद बंडोपाध्याय यांचा जन्मदिन.
  • सन १९०२ साली महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी, सिद्धांतवादी, समाजवादी राजकीय नेते जयप्रकाश नारायण यांचा जन्मदिन.
  • सन १९१६ साली भारतीय सर्वोच्च नागरिक भारत रत्न पुरस्कार सन्मानित थोर भारतीय समाजसुधारक,संघप्रचारक, संसद सदस्य नानाजी देशमुख यांचा जन्मदिन.
  • सन १९१६ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेत्री, रंगमंच आणि दूरदर्शन कलाकार रतन पेडणेकर उर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्मदिन.
  • सन १९४२ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, दूरदर्शन संचालक, पार्श्वगायक व माजी राजकारणी महानायक अमिताभ बच्चन यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसचं, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगणक वैज्ञानिक, आयटी नेते आणि शिक्षणतज्ञ तसचं, सी. डॅक या प्रगत संगणकीय विकसीन केंद्राचे संस्थापक विजय भटकर यांचा जन्मदिन.
  • सन १९५१ साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता मुकुल आनंद यांचा जन्मदिन.

११ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 October Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९६८ साली ग्रामगीता या ग्रंथाची रचनाकरणारे थोर महाराष्ट्रीयन समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उर्फ माणिक बंडोजी इंगळे यांचे निधन.
  • सन १९८४ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू व आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर उर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन.
  •  सन २००२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गुजराती भाषिक चित्रपट दिग्दर्शिका आणि अभिनेत्री तसचं,  “नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमन” च्या माजी अध्यक्ष दीना पाठक यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved