Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

Vijaya Lakshmi Pandit Information in Marathi

Vijaya Lakshmi pandit in Marathi
Vijaya Lakshmi Pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार – Vijaya Lakshmi Pandit Information in Marathi

नाव (Name)विजया लक्ष्मी पंडित
जन्म (Birthday)१८ ऑगस्ट १९००
जन्मस्थान (Birthplace)अलाहाबाद
वडील (Father Name)मोतीलाल नेहरू
आई (Mother Name)स्वरूप राणी नेहरू
भाऊ (Brother Name)जवाहरलाल नेहरू
पती (Husband Name)रणजीत सीताराम पंडित
मृत्यु (Death)१ डिसेंबर १९९०

विजया लक्ष्मी पंडित यांची माहिती – Vijaya Lakshmi Pandit Biography

मोतीलाल नेहरू यांची मुलगी आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची बहिण म्हणजे विजया लक्ष्मी पंडित. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९०० रोजी अलाहाबाद येथे झाला.स्वरूप कुमारी नेहरू हे त्यांचे मूळ नाव. परंतु विवाहानंतर परंपरेनुसार त्यांचे नाव बदलून विजया लक्ष्मी ठेवण्यात आले. त्यांचे पती रणजीत सीताराम पंडित हे काँग्रेस चे नेते व प्रसिद्ध भारतीय वकील होते.

विजया लक्ष्मी पंडित यांची राजकीय कारकीर्द : Vijaya Lakshmi Pandit Political Career

कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्या सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय झाल्या. दरम्यान त्यांना ३ वेळा तुरुंगवास सुद्धा झाला होता.विजया लक्ष्मी या एक उत्तम राजकारणी म्हणून प्रसिद्ध होत्या. स्वातंत्र्यपूर्व भारतात कॅबिनेट चा दर्जा मिळालेल्या पहिल्या महिला होत्या. भारतीय राजकारणात सक्रीय झाल्यानंतर १९४६ साली त्यांना भारतीय राज्यघटना समितीमध्ये नेमण्यात आले.शिवाय त्यांनी भारतीय राजदूत म्हणून मोस्को, वॉशिंग्टन आणि मेक्सिको इ. देशात काम पाहिले आहे. १९६२ ते १९६४ पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार संभाळला. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून काम केले आहे. विजया लक्ष्मी १९६४ ते १९६८ पर्यंत लोकसभा सदस्य म्हणून कार्यरत होत्या.

विजया लक्ष्मी पंडित यांचे विचार : Vijaya Lakshmi Pandit Quotes

  • “जेवढा घाम गळला जाईल, तेवढेच रक्त कमी सांडेल”
  • “स्वातंत्र्य हे भित्र्यांसाठी नसते”
  • “शिक्षण म्हणजे फक्त उपजिविकेचे साधन नसून मनुष्याला शुद्ध करून सत्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य आहे.”
  • “टीका, अडचणी आणि विरोध यांच्यावर मत करून वर येण्यात एक वेगळाच आनंद आहे.”
  • “माझ्यासाठी भारत म्हणजे, सौंदर्य आणि उदारता असलेली, आदरातिथ्य आणि अनेक संस्कृतींचा स्वीकार केलेली भूमी.”
  • “कोणे असे मानू शकते कि इतिहासातील काही वर्षांचा काही फरक पडत नाही, परंतु आपण अशा युगात जगात आहे कि जिथे प्रत्येक क्षणाची किंमत आहे आणि विलंबाची भरपाई म्हणजे मानवाचा जीव असेल”
  • “तुरुंगाचा अनुभव चांगला आहे, पण त्यात एक कमतरता आहे…. वैवाहिक जीवनाचे नुकसान आणि भरपाई काहीच नाही. ”
काही महत्वाची प्रश्ने :१. विजया लक्ष्मी पंडित यांचे विवाहापूर्वीचे नाव काय होते ?उत्तर : स्वरूप कुमारी नेहरू.२. विजया लक्ष्मी यांच्या वडिलांचे व आईचे नाव काय होते ?उत्तर : वडील मोतीलाल नेहरू व आई स्वरूप राणी नेहरू.३. जवाहरलाल नेहरू यांच्या बहिणीचे नाव काय होते ?उत्तर : विजया लक्ष्मी पंडित आणि क्रिष्णा हठीसिंह.४. संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ?उत्तर : विजया लक्ष्मी पंडित.५. विजया लक्ष्मी यांच्या मुलीचे नाव काय ?उत्तर : नयनतारा सहगल.६. विजया लक्ष्मी पंडित यांच्या पतीचे नाव काय ?उत्तर :
रणजीत सीताराम पंडित.
Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved