कोरफड ची माहिती आणि फ़ायदे

Aloe Vera

आपल्याला परिचित असलेली औषधी वनस्पती म्हणजे कोरफड होय. कोरफडचे बरेच फायदे असल्याने ते घरोघरी पाहायला मिळते. कोरफड याचा औषधी म्हणून खूप जास्त प्रमाणात केला जातो. तसेच याची लागवड कशी होते, त्याचा औषधी म्हणून  कसा वापर केला जातो. कोरफड (Aloe Vera) विषयी अशी बरीच माहिती आपण समोर पाहणार आहोत.

कोरफड ची माहिती आणि फ़ायदे – Aloe Vera Information in Marathi

Aloe Vera Information in Marathi

शास्त्रीय नाव : (अ‍ॅलो व्हेरा) Aloe vera
इंग्रजी नाव : (अ‍ॅलो व्हेरा) Aloe vera

अ‍ॅलो व्हेरा ची माहिती – Korfad Information in Marathi

कोरफड ही वनस्पती झुडूपवर्गात मोडते. ही वनस्पती २० ते ७० सेंमी. उंचीची असते. हिची जाड पाने, रंगाने हिरवी व तांबूस असतात. कोरफडीची पाने ७० ते ७२ इंच लांब व २ ते ४ इंच रुंद असतात. यांच्या पानांच्या कडांना बारीक बारीक काटे असतात.

कोरफड चे फ़ायदे – Aloe Vera Benefits in Marathi

Aloe Vera Juice Benefits in Marathi

 • कोरफडीच्या पानांमधील रस व गर बाहेरून लावण्यासाठी तसेच पोटातून घेण्यासाठी सुद्धा वापरला जातो.
 • मार लागून जर सूज आली असेल तर त्याच्यावर कोरफडीचा गर व हळद पावडर गरम करून त्याचा लेप लावल्यास आराम मिळतो.
 • जखमेवरसुद्धा याचा गर लावल्यास जखम सुद्धा भरून येण्यास मदत होते.
 • डोळे आले असल्यास याचा गर डोळ्यांवर बांधल्यास आग व वेदना कमी होतात.
 • भाजल्यावर जी जखम होते त्याच्यावर जर कोरफडीचा गर लावला तर फार आराम मिळतो.

Aloe Vera Uses in Marathi

 • यकृताच्या अनेक रोगांवर कोरफडीचा गर जर योग्य प्रमाणात पोटातून घेतला तर आराम मिळतो.
 • कफनाशक, पित्तनाशक व वातनाशक म्हणून सुद्धा कोरफड वापरली जाते.
 • भूक न लागणे, अपचन होणे, जंत होणे अशा प्रकारच्या अनेक विकारांसाठी कोरफडीचा रस उपयोग केला जातो.
 • कोरफडीचा रस योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्त शुद्ध होते.
 • तसेच त्वचारोग सुद्धा कमी होतात.
 • कावीळ झालेल्या रोग्यांना कोरफड उपयुक्त असते.
 • त्याचप्रमाणे स्त्रीरोगात सुद्धा स्त्रियांना कोरफड उपयुक्त असते; परंतु कोरफड हे उष्ण असल्याने ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी कोरफडीचा गर जास्त प्रमाणात घेऊ नये.

Aloe Vera Benefits for Skin and Hair

 • कोरफडीचा गर केसांना लावून अर्ध्यातासाने केस धुतले की केस हे अतिशय मऊ असे होतात, कोंडा नाहीसा होतो, केस गळत थांबत.
 • कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरमे कमी होतात.
 • आयुर्वेदातसुद्धा कुमारी आसव, कुमारिका वटी अशा प्रकारचे कल्प तयार करण्यासाठी या कोरफडीचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो.

इतर माहिती :

कोरफडीच्या पानांमध्ये बुळबुळीत द्रव असतो. हे झुडूप जुने झाल्यावर यामधून एक उभा लांब असा दांडा उगवतो. कोरफड प्रामुख्याने आफ्रिका व स्पेन येथे मोठ्या प्रमाणात आढळते. अरबस्तान. भारत, चीन तसेच पाश्चात्त्य देशांमध्येही ती येते. आपल्या घरासमोर किंवा बागेतसुद्धा कोरफडीची लागवड केली जाते. कोरफडीचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत. कोरफडीचा रस हा कडू असतो. पानांच्या आतील गर हा पांढरा चिकट व पातळ असतो.

लागवड :

याची लागवड करताना पाने मुळासह घ्यावी लागतात. या झुडपाला (मुळांना फुटणाऱ्या) बिया नसतात. या झुडपाच्या पानांना पातेसुद्धा म्हणतात. जुनी पाती सुकल्यावर नवीन पाती उगवतात. त्यामुळे ही वनस्पती नेहमीच ताजीतवानी राहते.

कोरफड विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ about Aloe Vera

1. कोरफडचे वर्णन कश्या प्रकारे केले आहे ?
उत्तर – कोरफड ही वनस्पती झुडूपवर्गात मोडते. ही वनस्पती २० ते ७० सेंमी. उंचीची असून हिची पाने जाड, रंगाने हिरवी व तांबूस असतात. तसेच यांच्या पानांच्या कडांना बारीक बारीक काटे सुद्धा असतात.

2. कोरफडचे शास्त्रीय नाव काय आहे ?
उत्तर – कोरफडचे शास्त्रीय नाव (अॅलो व्हिरा) Aloe vera हे आहे.

3. कोरफड मध्ये कोणते पोषक घटक असतात ?
उत्तर – झिंक, कँल्शियम, लोह, पोट्याशीयम, आणि सेलेनियम यासारखी खनिजे तसेच व्हीट्यामिन ए, सी, बी1, बी2, बी3, बी6, फॉलीक ऑसिड इत्यादी पोषक घटक असतात.

4. कोरफडची कोणकोणती नावे आहेत ?
उत्तर – कोरफडची कुमारी, अॅलो व्हिरा असे नावे आहेत.

1 thought on “कोरफड ची माहिती आणि फ़ायदे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top