Ambat Chuka
सर्व हवामानात येणारी ही पालेभाजी आहे. आंबट चुक्याची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत केली तरी तो चांगला उगवतो. चुक्याचे झाड साधारणपणे ५ इंच ते १ फुटापर्यंत वाढते. चुक्याची पाने जाडसर असतात. चुक्याची पाने आकाराने लहान व गोल असतात. चुक्याचा रंग हिरवा असतो. चुका चवीने आंबट असतो. पानांना व देठाला आंबट चव असते. संपूर्ण भारत देशात चुक्याची लागवड केली जाते.
आंबट चुक्याची माहिती – Ambat Chuka in Marathi
हिंदी नाव : | मूला |
इंग्रजी नाव : | Radish |
आंबट चुक्याचा उपयोग – Uses
(१) चुका चवीला आंबट असल्याने पालकाच्या भाजीबरोबर मिसळून चुका व पालकाची मिक्स भाजी करतात.
(२) अळूच्या भाजीला आंबट चव येण्यासाठी चुका वापरतात.
जीवनसत्त्वे :
(१) चुक्यामध्ये प्रोटिन व कॅल्शियम असते.
(२) चुक्यामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्वे असतात.
आंबट चुक्याचे फायदे – Benefits
गरोदर स्त्रिया व लहान बालकांना आहारात चुक्याची भाजी दिल्यास त्यांना भरपूर जीवनसत्त्व मिळते.