अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काही घोषवाक्ये 

Andhashraddha Nirmulan Ghosh Vakya

श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नाही. आपली श्रद्धा असेल तर अशक्य वाटणारे कार्यही शक्य होऊन जाते, पण तेच जर अंधश्रद्धा असेल तर शक्य असणारे काम सुद्धा अशक्य वाटते. म्हणून श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नाही.

समाजाच्या मनामध्ये असलेल्या भीतीचा काही लोक फायदा घेतात, आणि ते लोक त्यावर स्वतःची भाकरी सुद्धा शेकतात. तर आपण अश्या काही लोकांच्या फासात न अडकता स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवा, आणि स्वतःचे कार्य करत रहा.

अंधश्रद्धेचा जन्म हा श्रद्धेतूनच झाला आहे, म्हणून डोक्याचे दरवाजे उघडे ठेवूनच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवा, कारण अंधश्रद्धा समाजाला लागलेली एक कीड आहे, आणि ती कीड ही दिवसेंदिवस पसरू न देता आपण त्यावर काहीतरी औषध शोधून काढायला हवे.

आजच्या काळात यावर औषध म्हणजे फक्त जागरुकताच होऊ शकते. म्हणून या लेखाद्वारे मी आपल्याला काही घोषवाक्ये सांगू इच्छितो ज्यामुळे समाजाला अंधश्रद्धे पासून दूर करण्यास मदत होईल

  अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काही घोषवाक्ये – Andhashraddha Nirmulan Ghosh Vakya in Marathi

Andhashraddha Nirmulan

तर चला सुरुवात करूया!

 1. नका करू अंधश्रद्धेचा ध्यास, होईल जीवन नष्ट हमखास.
 2. संपवा आता अंधश्रद्धेचा अंधकार, ज्ञानानेच करा उद्याचा दिवस साकार.
 3. नवसांनी जर पुत्र होती, तर का करावे लागले असते पती.
 4. भूत असे अज्ञानाच्या मनात, ते पाहे त्याला या जगात.
 5. तीळ गुळ खाऊया, अंधश्रद्धेला पळवू या.
 6. शिक्षणाकडे वळा, अंधश्रद्धेपासून दूर पळा.
 7. धरू विज्ञानाची कास, अंधश्रद्धेला पळवू हमखास.
 8. मांजर जाईल त्याच्या स्तीतीत, तुम्ही जगू नका त्याच्या भीतीत.
 9. विज्ञानाचे नियम पाळा, अंधश्रद्धेला टाळां.
 10. पदार्थ आहेत लिंबू आणि मिरची, सुरक्षा नाही करत ते गाडी आणि घराची. 
 11. धरुनी कास श्रद्धेची, वाट लावा अंधश्रद्धेची.
 12.  जिवंतपणी खाऊ घाला, मेल्यावर कावळ्याची गरज नाही त्याला.  
 13. भूल पाडेल तुम्हाला तांत्रीकांचे मॅजिक, पण तुम्ही तेथे लावा विज्ञानाचे लॉजिक.
 14. थांबा सिग्नल लाल झाल्यावर, नका थांबू मांजर आडवे गेल्यावर.
 15. मर्यादेपेक्षा असते ती श्रद्धा, अन सत्याला नाकारते ती अंधश्रद्धा.
 16. मांत्रिकाचे मंत्र, बिघडवू शकतात जीवनाचे यंत्र,
 17. आपल्या रस्त्यावरून का हटता, अंधश्रद्धेकडे का वळता.
 18. अंधश्रद्धेवर करू मात, धरून आपल्या विज्ञानाची साथ.
 19. अंधश्रद्धेत जगू नका, चांगले जीवन वाया घालवू नका.
 20. विज्ञानाची जोड धरा, अंधश्रद्धेला दूर करा.

आपल्या आजूबाजूला जर आपल्याला कोणीही अंधश्रद्धेला थारा देताना आढळल्यास त्याला समजावून सांगायचे प्रयत्न करा, आपल्यामुळे एकाही व्यक्तीचे मत परिवर्तन झाले तर आपण खूप काही मिळवले आणि या समाजात जागरुकता पसरविण्यासाठी आपला तो खारीचा वाटा असेल म्हणून प्रयत्न करा.

आशा करतो आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल, आवडल्यास या लेखाला शक्य होईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना या लेखाला शेयर करायला सुद्धा विसरू नका. आणि माझी मराठी ला आवर्जून भेट दया.

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here