भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय

APJ Abdul Kalam chi Mahiti

“आपल्या मनाशी ठरविलेल्या संकल्पाला तडीस नेण्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ आणि एकाग्र व्हावे लागेल.”

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपती पदावर येणारे अकरावे तेसच राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नसणारे पहिले व्यक्ती होते.

भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी दिले असलेले महत्वपूर्ण योगदान आणि त्यांनी केल्या असलेल्या उत्कृष्ट कामगिरींमुळे भारत देश आज सुद्धा त्याचं स्मरण करीत असतो.

भारतातील जनतेच्या मनात त्यांच्याप्रती आजसुद्धा भरपूर आदर आहे. तसेच  भरतीय जनतेचे ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे एयरोस्पेस वैज्ञानिक होते. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारताला एक नविन दिशा दाखवली होती.

APJ Abdul Kalam chi Mahiti

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे खूप महान व्यक्ती होते. ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी ”अग्नी” मिसाईल चे उडाण करून आपल्या देशाची शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिली होती.

याच करणामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते.  अब्दुल कलाम हे खूप दूरदृष्टीचा विचार करणारे महान वैज्ञानिक होते, तसेच त्यांचे व्यक्तिमत्व खूपच महान होत.

अब्दुल कलाम हे महान व्यक्तिमत्व असणारे एक प्रभावशाली वक्ता होते. तसेच ते प्रमाणिक आणि कुशल राजनितिज्ञ सुद्धा होते.

त्याच्याकडून सर्वांनाच प्रेरणा मिळते, कारण त्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर संघर्ष केला आहे.

आलेल्या परिस्थितीशी सामना करून त्यांनी आपल्या आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठले आहे.

आजसुद्धा त्यांचे प्रेरणादायी विचार लाखो युवकांना आयुष्यात समोर जाण्यासाठी त्या युवकांच्या मनात एक ऊर्जा आणि जिद्द निर्माण करतात.

चला तर जाणून घेऊया भारताच्या या महामहीम व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाशी जोडल्या असलेल्या काही विशेष गोष्टी…

भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय – Dr APJ Abdul Kalam Information in Marathi

APJ Abdul Kalam

वास्तविक नाव (Real Name) अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम
जन्मतिथी (Birthday) १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर, तमिळनाडू, ब्रिटीश भारत
वडिलांचे नाव (Father Name) जैनुलाब्दिन मारकयार
आईचे नाव (Mother Name) आशिमा जैनुलाब्दिन
विवाह (Wife Name) अविवाहित
शैक्षणिक योग्यता (Education) १९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून,

एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून

भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली.

मृत्यू तिथी(Death) २७ जुलै २०१५, शिलांग, मेघालय, भारत.-

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म, त्यांचा परिवार आणि त्यांचे सुवातीचे जीवन – APJ Abdul Kalam Information in Marathi

 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ साली तामीळनाडू राज्यातील रामेश्वर शहरातील धुनषकोड़ी गावात एका मच्छीमार कुटुंबात झाला होता.

त्यांचे पूर्ण नाव अवुल पकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम होते.  ते त्यांच्या परिवारातील जैनुलअबिदीन आणि अशिअम्मा यांचे सर्वात लहान संतान होते.

अब्दुल कलाम यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची नव्हती. त्यामुळे त्यांचे वडिल मच्छीमार लोकांना आपली नाव भाड्याने देऊन आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत असत.

अब्दुल कलाम हे त्यांचा परिवारातील सर्वात लहान सदस्य होते. त्यांना तीन मोठे भाऊ आणि एक लहान बहीण होती.

घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्यांना सुरवातीपासूनच खूप परिश्रम करावे लागले होते.

आपली खालावलेली परिस्थिती पाहून ते कधीच गडबडले नाहीत. याउलट ते   त्यांच्या अंगी असलेल्या दृढनिश्चय सोबतच प्रामाणिकपणे मेहनत करीत   आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत राहिले. अश्याप्रकारे समोर जाऊन त्यांनी आपल्या जीवनात फार मोठे यश सम्पादन केले.

अब्दुल कलाम यांनी शिक्षणासाठी केलेले संघर्ष – APJ Abdul Kalam Education

अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वर शहरातील धुनषकोड़ी गावी  एका गरीब कुटुंबात झाला असल्याने त्यांना आपल्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी  खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला.

कलाम आपले शालेय शिक्षण घेत असतांना पेपर वाटायचे काम करीत असत,

आणि त्यातून मिळणाऱ्या पैस्यातून ते त्यांचा शालेय खर्च भागवत असत.

कलाम यांनी त्यांचे सुरवातीचे शालेय शिक्षण रामनाथपुरम स्च्वार्त्ज़ मैट्रिकुलेशन शाळेत पूर्ण केले.

यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण १९५० साली तामिळनाडूतील  तीरुचीरापिल्ली येथे असणाऱ्या सेंट जोसेफ्स महाविद्यालया मधून  भौतीकशास्त्र विषयाची पदवी घेतली.

आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम यांनी १९५४ ते  १९५७ च्या कालावधी दरम्यान मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून एरोनॉटिकल इंजिनियरींग मध्ये डिप्लोमा केला होता.

अश्या प्रकारे त्यांनी कठिण परिस्थिती असतांना देखील आपले शिक्षण घेणे सुरूच ठेऊन काही कालावधी नंतर, अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिक च्या रुपात आपली ओळख संपूर्ण जगाला करून दिली.

अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वात सर्वोच्च पद असणारे देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषविले होते.

ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीच सबंध नव्हता.

अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (डीआरडीओ) मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरु करून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती.

अब्दुल कलाम यांची विचारर्श्रेणी खूपच दूरवरची असल्याने ते नेहमीच काही तरी नविन आणि मोठ करण्याचे उद्देश्य आपल्या मनाशी बाळगत असत.

त्यांनी आपल्या वैज्ञानिक्तेच्या कारगीर्दीत सुरवातीलाचा एका छोट्याशा हेलिकॉप्टर चे डिजाईन तयार करून लोकांमध्ये स्वतःचा ठसा उमटून दिला होता.

“संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (DRDO) येथे काही काळ नौकरी केल्यानंतर ते “इंडियन कमेटी फॉर स्पेस रिसर्च” चे सदस्य सुद्धा राहिले होते.

यानंतर १९६२ मध्ये ते भारताचे महत्वपूर्ण संगठन असलेल्या “भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संगठन” (ISRO) सोबत जुळले होते.

१९६२ पासून १९८२ च्या कालावधी पर्यंत ते इस्रो सोबत जुळलेले होते, या दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची पडे सांभाळली होती.

अब्दुल कलाम यांना भारताच्या सेटैलाइट लॉन्च व्हीकल परियोजनेच्या निर्देशक पदाच्या कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती.

कलाम हे त्याठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टर च्या पदावर कार्यरत असतांना त्यांनी भारतात आपले पहिले “स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV3” तयार केले होते. यानंतर या यानाला १९८० मध्ये पृथ्वीच्या कक्षे जवळ स्थानापन केले होते.

About APJ Abdul Kalam

अब्दुल कलाम यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर त्यांना भारताच्या “अंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लब” चे सदस्य बनविण्यात आले.

विलक्षण प्रतिभावंतांचे धनी असणारे अब्दुल कलाम यांनी “स्वदेशी गाईडेड मिसाईल” चे डिजाईन तयार केले होते.

या डिजाईन साठी त्यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला होता.

स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापरत करून त्यांनी अग्नी आणि पुर्थ्वी सारख्या मिसाईल तयार करून, त्यांनी फक्त विज्ञान क्षेत्रांतच आपले महत्वपूर्ण योगदानच नाही दिले तर, त्यांनी भारत देशाला संपूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी देखील आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.

यानंतर  १९९२ पासून १९९९ च्या कालावधी दरम्यान जेव्हा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती.

त्यावेळेला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताचे रक्षा मंत्री यांचे रक्षा सल्लागार म्हणून देखील काम केले होते.

याचदरम्यान अब्दुल कलाम यांच्या निर्देषणात दुसऱ्यांदा राजस्थान मधील पोखरण या ठिकाणी अणूच्या यशस्वीपणे चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

अश्यातऱ्हेने भारत देश अण्वस्त्र निर्मिती करणारा, अणुशक्ती संपन्न आणि समृद्ध देश बनला.

भारताच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदावर कार्य केलेल्या अब्दुल कलामांनी  भारतातील वैज्ञानिक क्षेत्रामध्ये उन्नती आणि विकासाकरता विजन २०२० दिले आहे(होते).

डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना १९८२ साली ”डीफेन्स रिसर्च डेवलपमेंट लेबोरेट्री”(DRDL) चे संचालक बनविण्यात आले होते.

याच दरम्यान त्यांना “अन्ना युनिवर्सिटी ” तर्फे डॉक्टर ही पदवी देऊन गौरविण्यात आले होत.

अब्दुल कलाम यांनी डॉ. वी.एस. अरुणाचलम यांच्या बरोबर इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेवलपमेंट(IGMDP) च्या कार्यक्रमाची योजना तयार केली होती.

याशिवाय अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली स्वदेशी क्षेपणास्त्रांचा विकास करण्यासाठी एक संघटना तयार करण्यात आली होती.

त्याचठिकाणी सर्वात पहिले मध्यम आणि मर्यादित ठिकाणापर्यंत मार करणारे क्षेपणास्त्रे बनवण्यावर जोर देण्यात आला.

यानंतर जमिनीवरून हवेत वार करणारे टैंकभेदी मिसाईल आणि रिएंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च वेहकिल(रेक्स) बनवण्यावर जोर देण्यात आला होता.

दूरदृष्टी विचारशैलीचे व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलामांच्या नेतुत्वात सण १९८८ साली पृथ्वी, सण १९८५ मध्ये त्रिशूल आणि सण १९८८ मध्ये “अग्नी” क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली होती.

तसेच अब्दुल कलामांच्या अध्यक्षतेत आकाश, नाग नावाची क्षेपणास्त्र सुद्धा बनवण्यात आली होती.

APJ Abdul Kalam Charitra

अब्दुल कलाम यांनी रशियाच्या संगतीने सण 1998  साली भारताने ब्रम्होस प्राइवेट लिमिटेड ची स्थापना करून, सुपरसोनिक क्रूज मिसाइल वर काम करण्यास सुरवात केली होती.

ब्रम्होस क्षेपणास्त्रा बद्दल सांगायचे म्हणजे हे क्षेपणास्त्र जमीन, आकाश, आणि समुद्र या तिन्ही ठिकाणी मारा करू शकते.

याच वर्षी अब्दुल कलाम यांनी हृदय चिकीत्सक सोमा राजू यांच्या सोबत मिळून एक स्वस्त “कोरोनरी स्टेंट”  चा विकास केला, ज्याला “कलाम-राजू स्टेंट”  हे नाव देण्यात आले.

अब्दुल कलाम यांनी विज्ञान क्षेतात दिले असलेले आपले महत्वपूर्ण योगदान आणि त्यात त्यांना मिळालेल्या यशा बद्दल आज त्यांचे नाव जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये मोजले लागले.

आज त्यांची ख्याति “मिसाइल मॅन”  च्या रुपाने जगाच्या चोहोदीशांना पसरलेली आहे.

त्यांनी विज्ञान क्षेत्रात दिल्या असलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना भरपूर  मोठ मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे देशाचे पहिले राष्ट्रपती अब्दुल कलाम – APJ  Abdul as President

भारताचे “मिसाइल मॅन”  म्हणून जगात प्रसिद्ध असणारे अब्दुल कलाम यांनी भारताच्या “अग्नी” क्षेपणास्त्राला उडान दिले होते.

तसेच त्यांनी भारताला “अणु शक्ती” च्या बाबतीत एक संपन्न राष्ट बनविले.

विज्ञान आणि भारतीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे ते संपूर्ण विश्वात इतके प्रसिद्ध झाले होते

की, राजनीतिक जगतात त्यांच्या नावाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची राजकारण्यांमध्ये जणू स्पर्धाच रंगली होती.

अब्दुल कलाम यांची प्रसिद्धी पाहून त्यांना सण २००२ साली NDA च्या युती सरकारने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले होतं, आणि विरोधी पक्षाने सुद्धा त्यांचा कुठल्याच प्रकारे विरोध न करता राष्ट्रपती पदासाठी स्वीकार केला.

अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपती पदाच्या विरोधात लक्ष्मी सहगल उभ्या होत्या, आणि अब्दुल कलाम यांनी त्यांचा भरपूर मतांनी पराभव करून विजय मिळवला होता.

त्यांनी सण २००२ साली भारताचे 11 राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.

APJ Abdul Kalam Information

अब्दुल कलाम हे भारताचे पहिले असे राष्ट्रपती झाले होते, ज्यांचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा कसलाच संबंध नव्हता. त्याचप्रमाणे ते देशातील पहिले असे वैज्ञानिक होते जे राष्ट्रपती पदावर विराजमान झाले.

भारताच्या राष्ट्रपती पदी विराजमान होणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक असल्याने देशातील सर्वच वैज्ञानिकांची मान अभिमानाने उंचावली गेली.

देशाचा पहिला नागरिक या नात्याने देशातील सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या व्यक्तींपैकी अब्दुल कलाम तिसरे असे राष्ट्रपती होते, ज्यांना राष्ट्रपती पद स्वीकारण्याआधीच भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान “भारत रत्न” देऊन सन्मानित करण्यात आल होतं.

त्यांच्या आधी हा पुरस्कार डॉ. जाकिर हुसैन आणि डॉ. राधाकृष्णन यांना त्यांच्या राष्ट्रपती बनण्याआधीच देऊन सन्मानित करण्यात आल होतं.

अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर विराजमान असतांना सुद्धा लोकांना भेटत असत. सर्वसाधारण लोकांच्या प्रती त्यांच्या मनात खूपच भाव होता त्यामुळे ते लोकांच्या समस्ये बाबत नेहमी तत्पर राहत होते.

आपल्या या लाडक्या राष्ट्रपतींना जेव्हा देशातील नागरिक पत्र पाठवीत असत,  त्यावेळेला ते स्वत: त्या पत्रांना उत्तर देण्यासाठी आपल्या हातांनी पत्र लिखाण करीत असत.

याच कारणामुळे ते देशाच्या जनतेत लोकप्रिय होते, आणि त्यांना “लोकांचे राष्ट्रपती” (पीपुल्स प्रेसिडेंट) देखील म्हटल्या जात होतं.

अब्दुल कलाम यांच्या मतानुसार, राष्ट्रपती पदावर असतांना त्यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयातील सर्वात कठीण निर्णय होता तो …….

अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर असतांना त्यांनी २००१ साली संसदेवर हल्ला करणाऱ्या मध्ये दोषी ठरलेल्या कश्मीरी आतंकवादी अफजल गुरु सोबतच २१ लोकांनी दयेची याचिका त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

परंतु त्यांनी २१ पैकी फक्त एकाच याचिकेवर दया दाखवल्यामुळे त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

राष्ट्रपती पद सोडल्यानंतरचा प्रवास – APJ Abdul Kalam after President

भारताचे महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळविणारे डॉ. अब्दुल कलाम यांनी भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून पाच वर्ष कार्यभार सांभाळला होता.

देशाच्या प्रती आपली सेवा देऊन सुद्धा ते आपल्या कामाप्रती खूपच प्रामाणिक आणि निष्ठावंत राहिले.

राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी  अध्यापन, संशोधन, लेखन, सार्वजनिक सेवा यासारख्या कामांमध्ये त्यांनी  मोठ्या जोमाने आणि प्रामाणिकपणाने कार्य केले.

अब्दुल कलाम यांनी गेस्ट प्राध्यापक म्हणून बऱ्याच इन्स्टिट्यूट मध्ये आपले योगदान दिल होतं, जसे की, ते अतिथी प्राध्यापक म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलांग, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद यासारख्या संस्थेशी संबंधित ते जुडले गेले होते.

अब्दुल कलाम यांनी प्राध्यापक असतांना आयआयटी हैदराबाद, अण्णा विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) येथेही त्यांनी माहिती तंत्रज्ञान शिकवले.

या व्यतिरिक्त अब्दुल कलाम यांनी बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थानचे सहकारी म्हणून देखील काम केल होतं.

तिरुअनंतपुरम मधील भारतीय अंतरिक्ष विज्ञान व तंत्रज्ञान चे कुलगुरू पद सुद्धा त्यांनी सांभाळल होतं.

About APJ Abdul Kalam

तसेच चेन्नई येथील अण्णा विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून  जीवनाच्या शेवटच्या क्षणा  पर्यंत काम करत राहिले.

अब्दुल कलाम यांचे विचार खूपच प्रभाशाली होते, त्यांची आपल्या देशाबद्दल असणारी विचारशैली नेहमी सकारात्मक होती.

ते आपल्या देशाच्या विकास आणि प्रगती बद्दल विचार करणारे महान व्यक्ती होते.

अब्दुल कलाम यांनी आपल्या देशातील तरुणांचे भविष्य उज्वल करिता आणि आपला भारत देश भ्रष्टाचारमुक्त बनवा या उद्देश्याने त्यांनी “व्हाट कैन आई गिव”(“मी काय देऊ शकतो”) हा उपक्रम राबवला होता.

अब्दुल कलाम यांनी देशातील जनतेच्या मनात स्वत:  बद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण केली होती. अश्या या महान नेत्याला आपल्या देशातील विद्यार्थ्यान प्रती खूपच आकर्षण होतं.

अश्या या महान नेत्याची आपल्या देशातील विध्यार्थ्यान प्रती असणारी आपुलकीची भावना पाहून अब्दुल कलाम यांना त्यांच्या या स्वभावाबद्दल  संयुक्त राष्ट्रानेही त्यांचा वाढदिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुस्तके – APJ Abdul Kalam Books

भारताचे महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळविणारे अब्दुल कलाम यांनी आपल्या देशासाठी खूप मोठ योगदान दिल आहे.

ते एका महान वैज्ञानिका बरोबर एक कुशल राजनेता देखील होते.

अब्दुल कलाम हे प्रख्यात अध्यापका सोबतच एक महान लेखक सुद्धा होते. कलाम साहेबांना सुरवातीपासूनच लिखाण करण्याची खूप आवड होती.

त्यांनी लिहिल्या असलेल्या काही पुस्तकांबद्दल आम्ही आपणाला सागणार आहोत जी खालील प्रमाणे आहेत-

 • ‘इंडिया २०२०: अ विजन फॉर द न्यू मिलिनियम’,
 • ‘इग्नाइटेड माइंडस: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया’,
 • ‘विंग्स ऑफ़ फायर: ऐन ऑटोबायोग्राफी’,
 • ‘इंडोमिटेबल स्पिरिट’
 • ‘मिशन इंडिया’
 • एडवांटेज इंडिया
 • ”यू आर बोर्न टू ब्लॉसम”
 • ‘इन्सपायरिंग थोट्स’
 • ”माय जर्नी”
 • ”द ल्यूमिनस स्पार्क्स”
 • रेइगनिटेड

अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांचे कर्तुत्व – APJ Abdul Kalam Awards

अब्दुल कलाम यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान दिल आहे.

त्यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील तितकेच महत्वपूर्ण योगदान दिल आहे.

यामुळेच त्यांना देशातील सर्वात मोठ्या असणाऱ्या “भारत रत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आल होतं.

या पुरस्कारा बरोबर त्यांना पद्म भूषण, पद्म विभूषण पुरस्कारा सारख्या अनेक पुस्काराने सन्मानित केल गेल आहे.

याव्यतिरिक्त अब्दुल कलाम यांना जगातील ३५ पेक्षा जास्त विध्यापिठांनी डॉक्टरेट पदवी(मानद)  देऊन त्यांना गौरविण्यात आल आहे.

डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खालील प्रमाणे आहे:-

अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार:-

पुरस्कार मिळण्याचे वर्ष                   पुरस्कार

 • वर्ष १९९७  – भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न देऊन गौरविण्यात आलं.
 • वर्ष १९९० – भारत सरकार मार्फत पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.
 • वर्ष १९८१ – भारत सरकारने पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरविल.
 • वर्ष २०११ – IEEE होनोअरी मेंबरशिप(मानद सदस्यता)
 • वर्ष १९९७ – इंदिरा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
 • वर्ष १९९८  – भारत सरकार तर्फे वीर सावरकर पुरस्कार देण्यात आला.
 • वर्ष २००० – अलवर रिसर्च सेंटर, चेन्नईतर्फे रामानुजन पुरस्कार देण्यात आला.
 • वर्ष २०१५ – संयुक्त राष्ट्र संघाने कलाम जी यांची जयंती “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून मान्य केली.

अब्दुल कलाम यांनी आपल्या साधेपणा आणि दयाळूपणाच्या स्वभावामुळे देशातील जनतेच्या मनात स्वत: बद्दल आपुलकीची भावना निर्माण केली होती.

“मिसाईल मॅन” म्हणून ख्याती मिळविणारे एक महान नेता, महान वैज्ञानिक, तसेच आध्यापका बरोबर एक प्रख्यात लेखक म्हणून सुद्धा अब्दुल कलाम यांनी आपल्या सकारात्मक विचारांची छाप देशातील जनतेत सोडली होती.

अश्या तऱ्हेच्या वेगवेगळया भूमिका पार पडणाऱ्या अब्दुल कलाम यांचा स्वभाव खूपच साधा आणि सरळ होता.

त्यांच्या कामात ते कधीच दिर्घाई करत नसत, आपल्या कामाप्रती ते खूप बारकाईने विचार करून ते काम पूर्ण करीत असत.

अब्दुल कलाम यांची सुरवातीची परिस्थिती खूपच हलाकीची होती, त्यामुळे त्यांना बऱ्याच मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

ते आलेल्या परीस्थीशी मोठ्या जिद्दीने संघर्ष करीत राहिले.  अब्दुल कलाम यांनी आपल्या मनाशी बाळगलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ते एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे समोर जात राहिले.

अश्याप्रकारे त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करत देशाचे एक महान वैज्ञानिक आणि पहिले राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे पहिले राष्ट्रपती बनले होते. ते देशातील सर्व जनतेसाठी एक प्रेरणादायी बनले होते.

आपल्या देशातील पहिल्या अग्नी क्षेपणास्त्राला उडण देणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक बनले होते.

त्यांच्या अंगी असणाऱ्या महान विचार शैली आणि स्पष्टवक्तेपणा मुळे ते प्रत्येकांना मंत्रमुग्ध करत असत.

त्यांचे विचार नवयुवकांनच्या मनात काही नविन करण्यासाठी उत्साह निर्माण करतात.

अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टी विचारशैली च्या बद्दल आपल्याला अंदाज घ्यायचा असल्यास आपल्याला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे आणि विचारांचे वाचन केल्यानंतरच समजू शकतो.

अब्दुल कलाम यांना अस म्हणायचं होत की- 

“स्वप्न ते नाहीत जे तुम्ही झोपेत असतांना पाहता, तर स्वप्न ही अशी असायला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला झोपच आली नाही पहिजे”.

याव्यतिरिक्त अब्दुल कलाम यांनी दिले असलेले सकारात्मक विचार आहेत जी नवयुवकांच्या मनात जीवनात समोर जाण्यास त्यांना उत्साह निर्माण करतात आणि आपले लक्ष पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात.

अब्दुल कलाम याचे महान विचार- APJ Abdul Kalam Thoughts

 • “आपण करत असलेल्या कामात अपयश आल्यास पुन्हा प्रयत्न करणे कधीच थांबू नका”. या ठिकाणी FAIL ( अपयश) चा अर्थ होतो- First Attempt in Learning.
 • आपल्याला मिळालेल्या पहिल्या यशा नंतर आराम करण्याबाबत कधीच विचार करू नका.
 • कारण यानंतर जर आपल्याला अपयश मिळाले तर सर्व लोक हेच म्हणतील की याच्या पहिले मिळालेले यश हे नशिबाने मिळाले असेल.
 • सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टी बद्दल वेगवेगळ्याप्रकारे विचार करणे.
 • जर आपणास सूर्या सारखे चमकायचे असेल तर पहिले त्याच्यासारखं जळाव लागेल.
 • आपण आपल्या आयुष्यात हार कधीच नाही पत्कारली पहिजे, आणि जीवनात येणाऱ्या समस्यांन समोर कधीच हरू नका.
 • कोणतेही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात आत्मविश्वास असणे आवश्यक आहे, मग ते माउंट एवरेस्ट चे शिखर असो किंवा आपल्या व्यवसायाचे.

अब्दुल कलाम यांचे निधन – APJ Abdul Kalam Death 

आपल्या भारत देशाला “अणुशक्ती संपन्न” बनवणारे अब्दुल कलाम यांना विद्यार्थ्यांन सोबत वेळ घालवणे खूप आवडत असे.

प्रत्येक वेळेस त्यांनी एक प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांची जिज्ञासा शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले.

25 जुलै 2015 रोजी कलाम जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलांग (आयआयएम, शिलांग) येथे आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देत असतांना अचानक पणे त्यांची तब्येत खराब झाली.

यानंतर त्यांना तात्काळ शिलांग येथील दवाखान्यात भरती करण्यात आलं.

दवाखान्यात भरती केल्यानंतरही त्यांच्या तब्येतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा होत नव्हती.

परिणामी याच ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनातील अंतिम श्वास घेतला.

अब्दुल कलाम यांची ख्याती संपूर्ण जगतात खूपच प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या अन्तविधीसाठी देशातील लाखो लोकांचा जथा त्याठिकाणी आला होता.

आपल्या लाडक्या राजनेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोकांचा जमाव त्याठिकाणी जमा झाला होता.

अब्दुल कलाम यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या रामेश्वर मधील पैतृक गावात करण्यात आला होता.

APJ Abdul Kalam

अश्याप्रकारे महान व्यक्तिमत्व असणाऱ्या या महान वैज्ञानिक राजनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. आज सुद्धा अश्या या महान राजनेत्याच्या आठवणी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत.

अब्दुल कलाम यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीने भारतात जन्म घेणे, ही नक्कीच आपल्या देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे.

अब्दुल कलाम यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकण्यासारख आहे, त्यांनी त्यांच्या जीवनात केला असलेला शिक्षणासाठी चा संघर्ष आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी प्रेरणा देतो.

भारताच्या या महान वैज्ञानिक आणि पूर्व राष्ट्रपती असणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना माझीमराठीच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here