जगाला पहिल्यांदा शून्याची ओळख देणारे आर्यभट्ट यांच्या विषयी संपूर्ण माहिती.

Aryabhatta Information in Marathi

जगाला सर्वात आधी शून्याची ओळख देणारे भारतीय, तसेच ग्रह नक्षत्र आणि तारे यांचे ज्ञान असणारे इसवी सन १५०० च्या पूर्वीचे महान व्यक्तिमत्व, आपण सर्व या महान व्यक्तिमत्वाला ओळखत असणारच ते आहेत महान खगोलशास्त्री आणि गणितज्ञ आर्यभट्ट. ज्यांनी जगाला सर्वात आधी बऱ्याच गोष्टींचे ज्ञान दिले.

तर आजच्या लेखात आपण या महान व्यक्तिमत्वाविषयी माहिती पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेली माहिती आवडणार, तर चला अश्या एका महान खगोलशास्त्री आणि गणितज्ञ यांच्या जीवनावर थोडासा प्रकाश टाकू.

जगाला पहिल्यांदा शून्याची ओळख देणारे आर्यभट्ट यांच्या विषयी संपूर्ण माहिती – Aryabhatta Information in Marathi

Aryabhatta Information in Marathi
Aryabhatta Information in Marathi

आर्यभट्ट यांचे सुरुवातीचे जीवन – Aryabhatta Biography in Marathi

आर्यभट्ट यांचा जन्म कधी झाला याविषयी कुठेही असा ठोस पुरावा नाही परंतु आर्यभट्ट यांनी त्यांच्या “आर्यभटिया” या ग्रंथात असा उल्लेख केला आहे कि जेव्हा कलियुगाचे ३६०० वर्ष संपले होते तेव्हा त्यांचे वय २३ वर्ष होते, तर यावरून त्यांचा जन्म इसवी सन ४७६ ला झाला असेल असे इतिहासकार मानतात.

त्यांचा जन्म तेव्हाच्या अश्मक प्रदेशात झाला होता, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात. असे काही स्त्रोतावरून माहिती मिळते, आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी ते कुसुमपुरा येथे गेले होते. कुसुमपुरा म्हणजे आताचे बिहार मधील पटना शहर.

तेव्हाच्या काळात असलेले नालंदा विश्वविद्यापीठ येथे त्यांनी त्यांचे शिक्षण घेतले असे समजते. कारण भारतीय गणितज्ञ भास्कर कुसुमपुरा ला तेव्हाचे पाटलीपुत्र सांगितले होते. तेव्हा तेथे गुप्त साम्राज्र होते,

आर्यभट्ट यांचे कार्य – Aryabhatta Works

आपण आज सहज समजतो आणि मानतो सुद्धा कि पृथ्वी अंडाकृती आहे आणि तिच्या स्वतःच्या ध्रुवावर फिरते. तेच नाही तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून दिवस रात्र होतात, हे सुद्धा आपण आता मानतो,

आपण समजतो कि हि गोष्ट सर्वात आधी जगाला मध्ययुगातील खगोलशास्त्री निकोलस कॉपरनिकस नी सांगितली पण निकोलस कॉपरनिकस यांच्या १ हजार वर्ष अगोदर आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात फक्त हेच नव्हते सांगितले कि पृथ्वी गोल आहे, तर तिचे आकारमान सुद्धा सांगितले होते तर आपण विचार करू शकता कि आर्यभट्ट यांनी त्या काळात कसे या गोष्टीचे संशोधन केले होते,

हे तर काहीच नाही त्यांनी त्या काळात हिंदू धर्मामधील चंद्र ग्रहण आणि सूर्य ग्रहणाला त्यांनी चुकीचे सिद्ध करून दाखवले होते, त्यांनी तेव्हाच्या काळात हे सांगितले होते कि सूर्याचा प्रकाश दुसऱ्या ग्रहावर पडतो तेव्हा तो ग्रह प्रकशित होतो. त्यामुळे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसते.

तेव्हाच्या काळात आणखी त्यांनी निर्माण केलेल्या एका सूत्रावरून, एका वर्षात ३६५.२९५१ दिवस असतात असे सांगितले होते. त्यांना खागोलशास्त्रात आणि गणितामध्ये एक विशेष आवड होती, त्यांनी गणितामध्ये सुद्धा बरेचसे सूत्र शोधून काढले आहेत, ज्यामुळे आपण आजही एखाद्या वर्तुळाचे परीघ आणि आणखी काही गोष्टींचे मोजमाप करू शकतो.

सोबतच आर्यभट्ट यांनी आर्किमिडीज़ पेक्षाही अचूक अशी “पाय” ची किमंत सांगितली होती, ती अशी होती ३.१४१६. परंतु नालंदा विश्वविद्यालयाला जाळण्यात आले होते तेव्हा तेथील काही महत्वाची ग्रंथे जाळल्या गेली होती, त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातील बरेचश्या गोष्टी आज नष्ट झालेल्या आहेत, आणि त्यामुळे त्यांनी केलेले काही नवीन प्रयोग आपल्यापर्यंत पोहचले नाहीत. आर्यभट्ट यांचे निधन इसवी सन ५५० च्या जवळपास झाल्याचे इतिहासात दिसून येते.

१५ एप्रिल १९७५ साली आर्यभट्ट यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त भारताने “आर्यभट्ट” नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
भारतीय अवकाश संशोधन करणारी संस्था इस्रो ने २००९ मध्ये पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये शोधलेल्या तीन जिवाणूंपैकी एका जीवाणुला “बॅसिलस आर्यभट’ असे नाव दिले.

आंतरराष्ट्रीय खगोलीय संस्थेने चंद्रावरील एका छिद्राला ‘आर्यभट्ट’ असे नाव दिले आहे.

तर हि होती भारताच्या महान एका गणितज्ञ तसेच खगोलीय वैज्ञानिक आर्यभट्ट यांच्या विषयी थोडक्यात माहिती तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here