• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Thursday, August 18, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

अशोक स्तंभाबद्दल संपूर्ण माहिती

Ashok Stambh Information in Marathi

प्राचीन भारतातील एक महत्वाचे आणि बलशाली साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्याचे सम्राट अशोक महान व उदार शासक होते. शिल्पकलेची आवड असल्याने त्यांनी आपल्या साम्राज्यात स्थापत्यकलेचे अनेक उत्तम नमुने उभारले. त्याचेच एक उदाहरण म्हणजे सम्राट अशोक यांच्या काळातील स्तंभ. या स्तंभांना आपण अशोक स्तंभ म्हणून ओळखतो.

अशोक स्तंभाबद्दल थोडक्यात माहिती – Ashok Stambh Information in Marathi

Ashok Stambh Information in Marathi
Ashok Stambh Information in Marathi

अशोक स्तंभाबद्दल थोडक्यात माहिती – About Ashok Stambh

नाव (Name) अशोक स्तंभ (Ashoka Pillar)
निर्माता (Built by) सम्राट अशोक (Emperor Ashoka)
स्थान (Location) बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. (Bihar, Madhya Pradesh, Uttar Pradesh etc.)
प्रसिद्ध स्तंभ (Famous Pillar) सारनाथ (उत्तर प्रदेश) (Sarnath, Uttar Pradesh)
वजन (Weight) ५० टन (अंदाजे) (50 Tonn approx.)
उंची (Height) सरासरी १२-१५ मी. (12-15 m average)

अशोक स्तंभाचा इतिहास – Ashok Stambh History

मौर्य साम्राज्याचे तिसरे शासक सम्राट अशोक यांनी अशोक स्तंभांची निर्मिती केलेली आहे. त्यांनी भारतात असे अनेक स्तंभ निर्माण केलेले आहेत. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणून हे स्तंभ खूप प्रसिद्ध आहेत. बौद्ध धर्माची अखंडतेचे प्रतिक म्हणून हे स्तंभ उभारण्यात आलेले आहेत.

अशोक स्तंभाचे वर्णन – Pillars of Ashoka Definition

या स्तंभावर चार सिंह आहेत. हे चारही सिंह चार दिशांना तोंड करून उभे आहेत. या सिंहांच्या खाली हत्ती, घोडा, सिंह आणि बैल इ. प्राण्यांचे चित्र कोरले आहे. यांशिवाय स्तंभावर २४ आरे असलेले चक्र देखील पाहायला मिळते. या चक्राला अशोक चक्र असे संबोधतात. स्तंभावर कमळाचे फुल देखील कोरलेले आहे.

अशोक स्तंभावरील प्राणी : Ashoka Pillar Animals

अशोक स्तंभावर कोरलेल्या प्रत्येक प्राण्याचे एक विशिष्ट महत्व आहे.

  • सिंह : सिंह म्हणजे शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतिक आहे. हे सिंह गर्जना करत आहेत असे दर्शविल्या गेलेले आहे. ही गर्जना म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार असा अर्थ मानल्या जातो. तसेच बौद्ध धर्मात सिंहाला खूप महत्वाचे मानले गेले आहे.
  • घोडा : घोडा म्हणजे गती आणि उर्जेचे प्रतिक आहे.
  • बैल : बैल म्हणजे कठोर परिश्रम, मेहनत आही स्थिरतेचे प्रतिक आहे.
  • हत्ती : हत्ती म्हणजे अफाट सामर्थ्याचे प्रतिक आहे.

या प्राण्यांशिवाय स्तंभावर २४ आरे असलेले एक चक्र देखील आहे. या चक्राला अशोक चक्र म्हणतात. चक्रातील २४ आरे मनुष्यातील २४ गुणांचे वर्णन करतात. काही इतिहासकारांच्या मते हे २४ आरे दिवसातील २४ तास दर्शवितात. म्हणून या चक्राला ‘समय’ चक्र देखील म्हणतात.

भारतातील काही प्रसिद्ध अशोक स्तंभ आणि त्यांचे ठिकाण – Ashok Stambh Location

  1. सारनाथ (उत्तर प्रदेश)
  2. फिरोजशहा कोटला (दिल्ली)
  3. अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
  4. सांची (मध्य प्रदेश)
  5. लौरीया नंदनगड (पटना)
  6. वैशाली (बिहार)

यांपैकी सारनाथ येथील स्तंभ खूप प्रसिद्ध आहे. भारताचे राष्ट्रीय प्रतिक म्हणजेच आपली राजमुद्रा, सारनाथ येथील अशोक स्तंभावरूनच घेतलेली आहे.

अशोक स्तंभाबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Quiz on Ashok Stambh

१. अशोक स्तंभाची निर्मिती कुणी केली आहे? (Who made Ashoka Stambh?)

उत्तर: सम्राट अशोक यांनी अशोक स्तंभाची निर्मिती केली आहे.

२. अशोक स्तंभ कुठे आहे? (Where is Ashoka Pillar Located?)

उत्तर: भारतात अनेक ठिकाणी अशोक स्तंभ आहेत. परंतु उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथील अशोक स्तंभ खूप प्रसिद्ध आहे.

३. अशोक स्तंभाची उंची किती आहे ? (Ashoka Pillar Height)

उत्तर: अशोक स्तंभाची सरासरी उंची १२-१५ मी. आहे.

४. अशोक स्तंभावर कुठल्या प्राण्यांचे चित्र कोरलेले आहे?

उत्तर: सिंह, बैल, हत्ती आणि घोडा.

५. भारतातील प्रसिद्ध अशोक स्तंभ कोणता?

उत्तर: सारनाथ येथील अशोक स्तंभ.

६. अशोक स्तंभावर किती सिंह बघायला मिळतात?

उत्तर: ४ सिंह.

Editorial team

Editorial team

Related Posts

जाहिरात लेखन कसे करावे
Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
July 10, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved